AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Washim : शेतकऱ्याचा नाद खुळा..! टोमॅटोची विक्री अन् झाडांची ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक, आता आयुष्यभर टोमॅटोची लागवड

आगोदर कोरोनामुळे ओढावलेल्या परस्थितीने टोमॅटोला मार्केट मिळाले नाही तर गतवर्षी तोडणीच्या दरम्यानच पावसाने हजेरी लावल्याने वावरातच टोमॅटोचा लाल चिखल झाला होता. दरवर्षीच्या नुकसानीमुळे यंदा टोमॅटोचे उत्पादन घटले आणि इकडे बाजारात टोमॅटोचा दर शंभरीपार गेला. याच प्रतिकूल परस्थितीमध्येही गंगावणे यांनी दीड एकरात टोमॅटो लागवड केली.

Washim : शेतकऱ्याचा नाद खुळा..! टोमॅटोची विक्री अन् झाडांची ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक, आता आयुष्यभर टोमॅटोची लागवड
टोमॅटो मधून विक्रमी उत्पन्न मिळाल्याने शेतकऱ्याने टोमॅटो झाडांची ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक काढली
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Jun 07, 2022 | 9:31 AM
Share

वाशिम : शेती व्यवसायात अपयशाने खचून न जाता परीश्रम आणि (Crop Change) नवनविन प्रयोगामध्ये सातत्य ठेवल्यास काय होते हे वाशिम तालुक्यातील देपूळच्या शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. गेल्या दोन वर्षात (Tomato) टोमॅटोचा वावरातच लाल चिखल झाला असतानाही ऋषिकेश गंगावणे यांनी सलग तिसऱ्या वर्षी दीड एकरात टोमॅटोचा लागवडीचा प्रयोग केला होता. यंदा (Tomato Rate) टोमॅटोला असा काय दर मिळाला आहे की त्याने गंगावणे यांचे जीवनच बदलून गेले आहे. विक्रमी उत्पन्न मिळाल्यावर शेतकरी काय करु शकतो हे त्यांनी दाखवून दिले आहे. टोमॅटो उतारई करण्यासाठी त्यांनी टक्क टोमॅटोच्या झाडांची ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक काढली. एवढेच नाही टोमॅटो झाडे जाळून न टाकता ती पाण्यात विसर्जित केली. आता नफा-तोट्याची तमा न बाळगता दरवर्षी टोमॅटो लागवड करण्याचा त्यांनी निर्धारच केला आहे.

दोन वर्ष नुकसानीचे, यंदा दीड एकरात 7 लाखाचे उत्पन्न

आगोदर कोरोनामुळे ओढावलेल्या परस्थितीने टोमॅटोला मार्केट मिळाले नाही तर गतवर्षी तोडणीच्या दरम्यानच पावसाने हजेरी लावल्याने वावरातच टोमॅटोचा लाल चिखल झाला होता. दरवर्षीच्या नुकसानीमुळे यंदा टोमॅटोचे उत्पादन घटले आणि इकडे बाजारात टोमॅटोचा दर शंभरीपार गेला. याच प्रतिकूल परस्थितीमध्येही गंगावणे यांनी दीड एकरात टोमॅटो लागवड केली. विक्रमी दरामुळे खर्च वजा जाता त्यांना 7 लाखाचा निव्वळ नफा झाला आहे. त्यामुळे दरवर्षी परस्थिती बदलते शेतकऱ्यांनी प्रयत्न आपल्या निर्णयावर ठाम राहिल्यास उत्पन्न हे मिळतेच असा विश्वास गंगावणे यांना आला आहे.

टोमॅटो झाडांची मिरवणूक, शेतकऱ्याचा आनंद गगणात मावेना

अपेक्षेपेक्षा अधिकचे उत्पन्न मिळाल्यावर शेतकरी काय करेल याचा थांगपत्ता लागणार नाही. आता दीड एकरात 7 लाखाचा नफा म्हणल्यावर या पिकाची उतराई करण्यासाठी गंगावणे यांनी ढोल-ताशाच्या गजरात टोमॅटोच्या झाडांची मिरवणूक काढली. या उत्पादनामुळेच आपल्या जीवनात बदल झाला आहे त्याची जाणीव ठेवण्यासाठी त्यांनी सबंध गावातून मिरवणूक तर काढलीच पण टोमॅटो झाडांचे पाण्यात विसर्जण केले. इतर वेळी काढणी झाली की टोमॅटोची झाडे ही फडातच जाळली जातात. पण याला फाटा देत गंगावणे यांनी या झाडांचे पाण्यात विसर्जन केले.

सिंचनाच्या सोईमुळे भाजीपाल्यावर भर

वाशिम तालुक्यातील देपूळ शिवारात सिंचनाची सोय असल्याने अधिकतर शेतकरी हे भाजीपाल्यावर भर देतात. मात्र, गेल्या दोन वर्षापासून निसर्गाचा लहरीपणा आणि कोरोनामुळे निर्माण झालेली परस्थिती यामुळे शेतकऱ्यांनी वेगळा पर्याय निवडला होता. पण गंगावणे यांनी प्रयत्न सोडले नाहीत. त्यामुळे टोमॅटो उत्पादनातून हा चमत्कार घडला आहे. आता गंगावणे यांचे उत्पादन पाहून शेतकरी पुन्हा भाजीपाल्यावर भऱ देतील.टोमॅटो पासून एक हजार कॅरेटच उत्पन्न मिळालं शिवाय चांगले दर मिळाले आहेत.त्यामुळं मागील दोन वर्षात झालेलं नुकसान भरून निघालं आहे. त्यामुळे नुकसान-फायदा याचा विचार न करता आयुष्यभर दर हंगामात टोमॅटोची लागवड कऱणार असल्याचा निर्धार त्यांनी केला आहे.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...