Rabi Season : यंदाच्या सुगीमध्ये यंत्राचा वापर, मजूरांपेक्षा खर्च कमी अन् वेळेचीही बचत

Rabi Season : यंदाच्या सुगीमध्ये यंत्राचा वापर, मजूरांपेक्षा खर्च कमी अन् वेळेचीही बचत
रब्बी हंगामातील पीक काढणीसाठी यंदा हार्वेस्टरचा वापर वाढला आहे.

खरिपाप्रमाणेच अनेक संकटाची शर्यत पार करीत रब्बी हंगामही अंतिम टप्प्यात आला आहे. हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी ही मुख्य पीके एकाच वेळी काढणीला आलेली आहेत. दरवर्षी रब्बीतील सुगी म्हणजे दीड महिन्याचा खेळ असतो. यंदा मात्र ऐन सुगीच्या दिवसांमध्ये गेल्या 4 दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. पावसाच्या धास्तीने शेतीकामे उरकून घेण्यावर शेतकऱ्यांचा भर असून आता गव्हाची कापणी आणि मळणीची कामे ही हार्वेस्टरच्या माध्यमातूनच केली जात आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: राजेंद्र खराडे

Mar 26, 2022 | 2:44 PM

औरंगाबाद : खरिपाप्रमाणेच अनेक संकटाची शर्यत पार करीत (Rabi Season) रब्बी हंगामही अंतिम टप्प्यात आला आहे. हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी ही मुख्य पीके एकाच वेळी काढणीला आलेली आहेत. दरवर्षी रब्बीतील सुगी म्हणजे दीड महिन्याचा खेळ असतो. यंदा मात्र ऐन सुगीच्या दिवसांमध्ये गेल्या 4 दिवसांपासून (Cloudy Weather) ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. पावसाच्या धास्तीने शेतीकामे उरकून घेण्यावर शेतकऱ्यांचा भर असून आता गव्हाची कापणी आणि मळणीची कामे ही (Harvester) हार्वेस्टरच्या माध्यमातूनच केली जात आहे. यामुळे मजुरांवर होणारा खर्च तर टळला आहेच पण वेळेतही बचत शिवाय ढगाळ वातावरणाचा धोका टळत आहे. आतापर्यंत शेतकरी यंत्राचा वापर म्हणले की, पाठ फिरवत होता पण आता परस्थितीनेच यंत्राचा वापर करण्यास भाग पाडले आहे. म्हणून मजुरांची जागा यंत्राने घेतल्याचे चित्र मराठवाड्यात पाहवयास मिळत आहे.

परराज्यातून हार्वेस्टर मराठवाड्यात

हार्वेस्टर सारखे यंत्र अजूनही मराठवाड्यात अधिक प्रमाणात नाहीत. रब्बी आणि खरीप हंगाम सुरु होताच हरियाणा, पंजाब येथून या मिशनरी राज्यात दाखल होतात. त्यामुळे गव्हाची कापणी आणि मळणीचे काम हे सोपे झाले आहे. शिवाय मजुरांसाठीची शेतकऱ्यांची भटकंतीही थांबली आहे. यंदा ऐन सुगीच्या दिवसांमध्येच ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने हातातोंडाशी आलेला घास पुन्हा निसर्गाने हिसकावून घेऊ नये म्हणून यंत्राच्या सहायाने कामे उरकून घेण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे.

खर्चही कमी अन् नासाडीही टळली

एका एकरातील गहू करण्यासाठी मजुरांकडून काढणी, बांधणी आणि पुन्हा मळणी यासाठी किमान 10 मजूर तर आवश्यकच होते. मात्र, हेच काम हार्वेस्टर किमान अर्धा तासात करीत आहे. याकरिता शेतकऱ्यांना एकरी 2 हजार रुपये मोजावे लागतात. शिवाय मजुरांकडून होणारी पिकांची नासाडी टळली आहे. हंगाम सुरु होताच मजुरांची टंचाई हे नित्याचेच झाले आहे. यंदाच्या हंगामात मजूरी ही 500 वर गेली आहे.त्यामुळे पारंपरिक पध्दतीपेक्षा शेतकरी आता आधुनिकतेची कास धरु लागला आहे.

ढगाळ वातावरणाचा धोका कायम

उन्हाळा सुरु होताच पुन्हा एकदा निसर्गाने आपला लहरीपणा दाखवलेला आहे. भर उन्हाळ्यात पावसाळ्याप्रमाणे वातावरण झाले आहे. यामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भावाचा धोका तर कायम आहेच पण रब्बी हंगामातील काढणी कामे सुरु असून आता पावसाने हजेरी लावली तर मात्र, न भरुन निघणारे नुकसान होणार आहे. निसर्गाचा लहरीपणा असतो पण तो 2 दिवसांपुरता यंदा पण यावेळी गेल्या 8 दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे खरिपात जे झाले ते रब्बी हंगामात होऊ नये अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

संबंधित बातम्या :

Soybean Market : सोयाबीनच्या दरात वाढ, साठवणूक की विक्री प्रश्न कायम..!

Photo Gallery : कॅनॉलचे पाणी शेतशिवारात, पीकं वाचवताना शेतकऱ्याच्या काळजाचं पाणी..!

Latur : प्रतीक्षा संपली, उर्वरित 25 टक्केही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें