AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhandara : धान पिकांसह भाजीपाला पाण्यात, शेतकऱ्यांवर दुहेरी संकट, काय आहेत मागण्या?

उत्पादनाबरोबरच शेतीमालासाठी गरज असते ती बाजारपेठेची. भंडारा जिल्ह्यातील वांग्याला नागपूर, गोंदिया याच बरोबर मध्य प्रदेशातून देखील मागणी असते. जवळच्या बाजारपेठेचा फायदा येथील शेतकऱ्यांना होतो. म्हणून शेतकऱ्यांनी हे धाडस केले होते. मात्र, अधिकच्या पावसामुळे मुख्य पिकांवर तर परिणाम झालाच आहे. पण भाजीपाल्याचे देखील न भरुन निघणारे नुकसान झाले आहे.

Bhandara : धान पिकांसह भाजीपाला पाण्यात, शेतकऱ्यांवर दुहेरी संकट, काय आहेत मागण्या?
भंडारा जिल्ह्यामध्ये शेत शिवारात पावसाचे पाणी साचल्याने भाजीपाल्याचे नुकसान होत आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Jul 19, 2022 | 10:06 AM
Share

भंडारा : निसर्गाच्या लहरीपणापासून राज्यातील कोणत्याच जिल्ह्याची सूटका झालेली नाही. सततच्या पावसामुळे (Kharif Season) खरीप हंगामाबाबच प्रश्न उपस्थित झाला आहे. भंडारा जिल्हा तसा (Paddy Crop) धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. सर्वाधिक क्षेत्रावर धानाचीच लागवड केली जाते. यंदा लागवडीला उशिर होत असला तरी शेतकऱ्यांचा भर हा याच पिकावर आहे. तर दुसरीकडे भंडाऱ्यातील (Vegetable) भाजीपाल्याला देखील वेगळेच महत्व असून येथील वांग्याला ही परजिल्ह्यातून आणि परराज्यातून मागणी असते. यंदा मात्र, खरिपातील पिके आणि भाजीपाला हा पाण्यातच आहे. राज्यात इतर ठिकाणी पावसाने उसंत घेतली असली तरी भंडारा जिल्ह्यामध्ये संततधार ही सुरुच आहे. त्यामुळे वांग्याची रोपे ही जागेवर कुजली आहेत तर दुसरीकडे धान लागवड ही वेळत होत नसल्याने उत्पादनावर परिणाम होईल अशी भीती व्यक्त होत आहे.

पीक पध्दतीमधील बदल नुकसानीचा

भंडारा जिल्ह्यात खरीप हंगमातील धान पीक हेच मुख्य पीक आहे. मात्र, याचबरोबर भाजीपाल्यातूनही उत्पादन वाढवावे या उद्देशाने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात वांग्याची लागवड केली होती. शिवाय लागवडीपासून पोषक वातावरण असल्याने वाढही जोमात झाली. मात्र, ऐन वांगी लागवडीच्या दरम्यानच पावसाने असा काय धडाका सुरु केली आहे की, सबंध वावरामध्ये पाणी साचून राहिलेले आहे. एक-दोन दिवस पाणी साचले असते तर उत्पादनावर परिणाम झाला नसता पण गेल्या 10 दिवसांपासून पीक पाण्यात आहे. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होणार आहे. शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल केला पण निसर्गाने सर्वकाही हिरावले असल्याची शेतकऱ्यांची भावना झाली आहे.

बाजारपेठेचा आधार म्हणून शेतकऱ्यांचे धाडस

उत्पादनाबरोबरच शेतीमालासाठी गरज असते ती बाजारपेठेची. भंडारा जिल्ह्यातील वांग्याला नागपूर, गोंदिया याच बरोबर मध्य प्रदेशातून देखील मागणी असते. जवळच्या बाजारपेठेचा फायदा येथील शेतकऱ्यांना होतो. म्हणून शेतकऱ्यांनी हे धाडस केले होते. मात्र, अधिकच्या पावसामुळे मुख्य पिकांवर तर परिणाम झालाच आहे. पण भाजीपाल्याचे देखील न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. काळाच्या ओघात शेतकरी आवश्यक ते बदल करुन उत्पादन आणि उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे पण त्याला निसर्गाचीही साथ मिळणे तेवढेच गरजेचे आहे.

शेतकऱ्यांचे सरकारकडे साकडे

यंदा शेती व्यवसायाबाबत सर्वकाही नुकसानीचे ठरत आहे. हंगामाच्या सुरवातीलाच अधिकच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता दुबार पेरणी किंवा भाजीपाल्याची पुन्हा लागवड ही शक्य होणार नाही. शिवाय पेरणी आणि मशागतीवर शेतकऱ्यांचा लाखोंचा खर्च झाला आहे. खरीप हंगामातील पिकांची पाहणी करुन नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहे. मात्र, अद्यापही पंचनाम्याला देखील सुरवात झालेली नाही.

Follow Us
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
Video : रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड, सिनेमांच्याआड पैशांची लपवालपवी?
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर शरद पवारांचं मोठं विधान
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून नेमकं काय म्हणाल्या?
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा, नेमकं काय म्हणाले?
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत..
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत केला गंभीर आरोप
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे...
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे आक्रमक
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत