AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तूर खरेदी केंद्र : सुविधांपेक्षा अडचणी अधिक, खरेदी केंद्रावर विक्री सोडा नोंदणीही नाही, नेमके कारण काय?

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला किमान आधारभूत दर मिळावा म्हणून नाफेडच्या वतीने हमीभाव केंद्र ही उभारली जातात. त्याच अनुशंगाने राज्यात 186 ठिकाणी तूर खरेदी केंद्र उभारण्यात आली आहेत. शिवाय कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच मंडळाच्या ठिकाणी 20 डिसेंबरपासून नोंदणीलाही सुरवात झाली होती तर 1 जानेवारीपासून प्रत्यक्ष खरेदीला. शासनाने ही सुविधा करुनही शेतकरी हे खरेदी केंद्राकडे फिरकलेच नाहीत. यंदा 2.71 लाख टन तूर खरेदीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. मात्र, खरेदी केंद्रावर विक्री सोडा शेतकऱ्यांनी साधी नोंदणीही केलेली नाही.

तूर खरेदी केंद्र : सुविधांपेक्षा अडचणी अधिक, खरेदी केंद्रावर विक्री सोडा नोंदणीही नाही, नेमके कारण काय?
राज्यात नाफेडच्या माध्यमातून खरेदी केंद्र उभारण्यात आले आहेत. मात्र, शेतकऱ्यांकडून खुल्या बाजारपेठेतच तुरीची विक्री होत आहे.
| Edited By: | Updated on: Feb 26, 2022 | 11:06 AM
Share

वाशिम : शेतकऱ्यांच्या शेतीमालाला किमान आधारभूत दर मिळावा म्हणून (NAFED) नाफेडच्या वतीने हमीभाव केंद्र ही उभारली जातात. त्याच अनुशंगाने राज्यात 186 ठिकाणी (Tur Crop) तूर खरेदी केंद्र उभारण्यात आली आहेत. शिवाय कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच मंडळाच्या ठिकाणी 20 डिसेंबरपासून नोंदणीलाही सुरवात झाली होती तर 1 जानेवारीपासून प्रत्यक्ष खरेदीला. (Central Government) शासनाने ही सुविधा करुनही शेतकरी हे खरेदी केंद्राकडे फिरकलेच नाहीत. यंदा 2.71 लाख टन तूर खरेदीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. मात्र, खरेदी केंद्रावर विक्री सोडा शेतकऱ्यांनी साधी नोंदणीही केलेली नाही. जिल्ह्यातील सहा केंद्रावर केवळ 1236 शेतकऱ्यांनी नोंद केली आहे. प्रत्यक्षात तूर घेऊन शेतकरी इकडे फरकलेलेच नाहीत. एकाही शेतकऱ्याने खरेदी केंद्रावर तुरीची विक्री केलेली नाही हे भयाण वास्तव समोर आले आहे. खरेदी केंद्रावर तुरीला 6 हजार 300 रुपये दर ठरवून देण्यात आला आहे तर खुल्या बाजारपेठेत यापेक्षा अधिकचा दर असल्याने शेतकरी फिरकत नसल्याचे चित्र आहे. आता खरेदी केंद्र उभारुन दोन महिने झाले असले तरी हे चित्र असल्याने सुविधांपेक्षा यामध्ये अडचणीच असल्याचे समोर आले आहे.

काय आहे नेमकी अडचण..?

शासकीय खरेदी केंद्रावर धान्य विकण्यापूर्वी त्याची नोंदणी करणे गरजचे आहे. नोंदणी प्रसंगी शेतकऱ्यांना 7/12 उतारा, 8 अ, पिकपेरा आणि बॅंकेचे पासबुकची झेरॅाक्स ही खरेदी केंद्रावर जमा करावी लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची सर्व माहिती ही नाफेडकडे राहणार आहे. त्यामुळे शेतीमालाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करता यावेत म्हणून ही प्रक्रिया केली जाते. एवढे सर्व करुनही खुल्या बाजारपेठेत तुरीला 6 हजार 300 एवढाच दर आहे तर खरेदी केंद्रावरही हाच दर मिळत आहे. मात्र, खुल्या बाजारपेठेत तुरीचा काटा झाला की लागलीच पैसे हे व्यापाऱ्यांकडून मिळतात तर दुसरीकडे खरेदी केंद्रावर विक्री केली तर मात्र, 15 दिवसांपेक्षा अधिकचा काळ वाट पहावी लागते.

खरेदी केंद्रावर 1 क्विंटल तुरीचीही खरेदी नाही

हंगामाच्या सुरवातील बाजारपेठेतील दर आणि नाफेडने जाहिर केलेले दर यामध्ये तफावत असल्याने शेतकऱ्यांनी नोंदणी केली मात्र, खरेदी केंद्र उभारताच खुल्या बाजारपेठेतील तुरीच्या दरात वाढ झाली. खरेदी केंद्रावरील दर आणि खुल्या बाजारपेठेतील दर एकसमानच झाल्याने शेतकऱ्यांनी खुल्या बाजारातच तूर विक्रीवर भर दिला होता. त्यामुळे गेल्या दीड महिन्याच्या कालावधीमध्ये वाशिम जिल्ह्यातील एकाही खेरदी केंद्रावर तुरीची खरेदी झालेली नाही. वाशिम जिल्ह्यामध्ये नाफेड केंद्रांतर्गत वाशिम, मानोरा, मालेगाव, रिसोड तर व्हीसीएमएस अंतर्गत कारंजा, मंगरुळपीर येथे शासकीय खरेदी केंद्र सुरू आहेत.

नियम-अटींमुळे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ

खरेदी केंद्रावर कागदपत्रांची पूर्तता आणि शेतीमालाचा दर्जा याची तपासणी ही होतेच. आर्द्रतेचे प्रमाण हे 10 टक्केपेक्षा जास्त असल्यास धान्याची खरेदी केली जात नाही.शिवाय खरेदी झाली तरी शेतकऱ्यांना दोन महिने पैसेही मिळत नाहीत. तर दुसरीकडे खुल्या बाजारात कोणत्याही अटी नाहीत. तिकडे वजन काटा झाला की दुसऱ्याच क्षणी शेतीमालाचे पैसे दिले जातात. दरामध्ये कसलीच तफावत नसल्याने शेतकरी खुल्या बाजारपेठेला महत्व देत आहेत.

संबंधित बातम्या :

Sugar Factory : ऊसाचे गाळप रखडले, चिंता कशाला..! काय आहेत शेतकऱ्यांकडे पर्याय?

रब्बी अंतिम टप्प्यात तरी शेतकऱ्यांना प्रतिक्षा हक्काच्या पाण्याची, पाटबंधारे विभागाने ‘लिफ्ट’च दिली नाही

GMO Myths vs Reality : जनुकीय विकसित जीव विषयी कोणत्या गोष्टी जाणून घ्यायला हव्यात, वास्तव आणि मिथक नेमका फरक काय?

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.