Sugarcane Sludge : अतिरिक्त ऊसावर तोडगा काय? ऊस उत्पादकांसाठी महत्वाची बातमी

ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात येत असताना सर्वकाही सुरळीत असणे गरजेचे होते पण ऊसतोड शिल्लक असल्यामुळे शेतकऱ्यांसह कारखानदारही चिंतेत आहेत. यंदा राज्यात विक्रमी साखरेचे उत्पादन झाले आहे. असे असतानाही अतिरिक्त ऊस तोडणीचा मुद्दा हा कायम आहे. पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात ऊसाचे गाळप रखडल्याने त्याला तुरे तर फुटले आहेतच पण आता उत्पादनातही घट होऊ लागली आहे.

Sugarcane Sludge : अतिरिक्त ऊसावर तोडगा काय? ऊस उत्पादकांसाठी महत्वाची बातमी
यंदा ऊसाचे गाळप विक्रमी झाले असून सर्वाधिक साखरेचे उत्पादनही महाराष्ट्रातून होत आहे.
Follow us
| Updated on: Feb 27, 2022 | 1:45 PM

पुणे : ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात येत असताना सर्वकाही सुरळीत असणे गरजेचे होते पण (Sugarcane cane) ऊसतोड शिल्लक असल्यामुळे शेतकऱ्यांसह (Sugar Factory) कारखानदारही चिंतेत आहेत. यंदा राज्यात विक्रमी साखरेचे उत्पादन झाले आहे. असे असतानाही अतिरिक्त ऊस तोडणीचा मुद्दा हा कायम आहे. पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात ऊसाचे गाळप रखडल्याने त्याला तुरे तर फुटले आहेतच पण आता (Decrease in production also) उत्पादनातही घट होऊ लागली आहे. मात्र, गाळपाविना शेतकऱ्यांचा ऊस फडात ठेवला जाणार नाही. शिवाय साखर आयुक्तांची परवानगी घेतल्याशिवाय संचालकांना कारखाने हे बंद करता येणार नाहीत. त्यामुळे क्षेत्र वाढले असले तरी गाळप हे पूर्णच होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. खुद्द सहकार मंत्र्यांनीच शेतकऱ्यांना आश्वासन दिले असून वाढीव काळामुळे घटत्या वजनाचे काय हा सवाल कायम आहे.

6 लाख टन ऊस अजूनही फडातच

15 ऑक्टोंबर रोजी सुरु झालेला यंदाचा गाळप हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. या दरम्यानच्या काळात सर्वाधिक गाळप हे महाराष्ट्रात झाले आहे. असे असली तरी अजून 6 लाख टन ऊसाचे गाळप हे शिल्लक आहे. त्यामुळे गाळप होते की नाही याची धास्ती शेतकऱ्यांना आहे. तांत्रिक बिघाडामुळे काही साखर कारखाने हे बंद आहेत. त्यामुळे गाळपाचा प्रश्न अधिक तीव्रतेने समोर येत आहे. राज्यात अजून 6 लाख ऊसाचे गाळप शिल्लक आहे. त्यानुसार त्या क्षेत्रातील कारखाने हे सुरुच राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

परवानगी नंतरच गाळप होणार बंद

गाळप बंद करण्यापूर्वी साखर कारखान्याच्या संचालकांना साखर आयुक्त यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. यापूर्वीच साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी त्यासंबधात कारखाना व्यवस्थापनाशी पत्रव्यवहार केला आहे. शिवाय कारखाना क्षेत्रातील ऊसाचे गाळप शिल्लक राहणार नाही याची जबाबदारी त्या कारखान्यांचीच राहणार आहे. यंदा क्षेत्रात वाढ झाल्याने ही समस्या उद्भवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हीताचा निर्णय घेणेच योग्य राहणार आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सर्व चित्र समोर असणार असे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले आहे.

साखर उद्योगामध्ये अनुकूल स्थिती

यंदा ऊसाला रास्त आणि किफायतशीर दर मिळाला आहे. पोषक वातावरणामुळे देशातच ऊसाचे क्षेत्र वाढले आहे शिवाय उत्पादनही वाढत आहे. ब्रिझलमधील दुष्काळी स्थिती आणि कोरोनाच्या निर्बंधामध्ये येत असलेली शिथीलता यामुळे साखर उद्योगाला चालना मिळत आहे. आता हंगामाच्या सुरवातीलाच ऊसतोडणीचे नियोजन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

ही कसली दुश्मनी? रात्रीतूनच केळी बागा उध्वस्त, दर वाढूनही रावेरच्या शेतकऱ्यांसमोर काय आहे समस्या?

Agricultural University : काय सांगता? कापसाची तोडणी अन् बांधावरच होणार जिनिंग-प्रेसिंग, शेतकऱ्यांना काय फायदा?

Agricultural Pump : थकबाकी अदा करुनही विद्युत पुरवठा खंडीत, नांदेडमध्ये सरकारला घरचा आहेर..!

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.