AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जळगाव आढावा : एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन संपूर्ण जिल्हा जिंकणार?

2014 च्या निवडणुकीत जळगाव (Jalgaon Assembly seats) जिल्ह्यातील 11 मतदारसंघांपैकी सहा जागा भाजपने जिंकल्या, तर तीन जागांसह शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर होती. पण 2014 नंतर आतापर्यंत बरची परिस्थिती बदलली आहे.

जळगाव आढावा : एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन संपूर्ण जिल्हा जिंकणार?
| Edited By: | Updated on: Sep 10, 2019 | 6:20 PM
Share

जळगाव : उत्तर महाराष्ट्रातील आणखी एक महत्त्वाचा जिल्हा जळगाव (Jalgaon Assembly seats) हा कायम भाजपला बालेकिल्ला राहिलाय. 2014 च्या निवडणुकीत जळगाव (Jalgaon Assembly seats) जिल्ह्यातील 11 मतदारसंघांपैकी सहा जागा भाजपने जिंकल्या, तर तीन जागांसह शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर होती. पण 2014 नंतर आतापर्यंत बरची परिस्थिती बदलली आहे. शिवाय भाजपने जिल्ह्यातील वाट्याला येणाऱ्या सर्व जागा जिंकण्याचा निर्धार केल्याने चुरस निर्माण झाली आहे.

चोपडा

या मतदारसंघात शिवसेनेचे चंद्रकांत सोनवणे यांनी राष्ट्रवादीच्या माधुरी पाटील यांचा पराभव केला. सोनवणे यांना 54 हजार 176 आणि माधुरी पाटील यांना 42 हजार 241 मतं मिळाली होती.

रावेर

रावेरमधून भाजपचे हरीभाऊ जावळे यांनी मोठा विजय मिळवला. त्यांना एकूण 35.9 टक्के म्हणजे 65962 मतं मिळाली. त्यांनी काँग्रेसचे शिरीष चौधरी यांचा पराभव केला होता.

भुसावळ

भाजपचे संजय सावकारे यांनी या मतदारसंघात एकूण 56.02 टक्के म्हणजेच 87818 मतं घेत राष्ट्रवादीचे राजेश झालटे यांचा पराभव केला. मुख्य लढत ही भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यातच झाली. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार संजय ब्राह्मणे यांना केवळ 7598 मतं मिळाली.

जळगाव शहर

या मतदारसंघात उमेदवारांचीच संख्या अधिक होती. तरीही भाजपचे सुरेश भोले यांनी 88 हजार 363 मतं घेऊन विजय मिळवला. तर शिवसेनेचे सुरेश जैन हे 46049 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर होते.

जळगाव ग्रामीण

या मतदारसंघातून शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांनी एकूण 84020 मतं घेत राष्ट्रवादीच्या गुलाबराव देवकरांचा पराभव केला. यावेळी पुन्हा एकदा दोन्ही गुलाबरावांमध्ये लढत होण्याची शक्यता आहे.

अंमळनेर

अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी यांनी सर्वच पक्षाच्या उमेदवारांना मात देत 68149 मतांसह विजय मिळवला. या मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर भाजपचे अनिल पाटील होते.

एरंडोल

राष्ट्रवादीने एरंडोलमध्ये सतीश पाटील यांच्या रुपाने दणदणीत विजय मिळवला. दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनेचे चिमणराव पाटील होते.

चाळीसगाव

या मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांनी तब्बल 94754 मतं मिळवली होती. दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले राजीव देशमुख यांच्यावर त्यांनी मात केली.

पाचोरा

पाचोऱ्यातून शिवसेनेचे किशोर पाटील यांनी विजय मिळवला होता. तर राष्ट्रवादीचे दिलीप वाघ दुसऱ्या क्रमांकावर होते.

जामनेर

जामनेरमध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी तब्बल 1 लाख 3 हजार 498 मतं घेत विजय मिळवला होता. तर राष्ट्रवादीचे दिगंबर पाटील दुसऱ्या क्रमांकावर होते. दिगंबर पाटील यांना 67 हजार 730 मतं मिळाली होती.

मुक्ताईनगर

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरमधून 9708 मतांनी विजय मिळवला होता. खडसेंना शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी टक्कर दिली. शिवसेना उमेदवाराला 75 हजार 949 आणि खडसेंना 85657 मतं मिळाली होती.

जळगाव – 11 (Jalgaon MLA list)

10 – चोपडा- चंद्रकांत सोनावणे (शिवसेना)

11 – रावेर- हरिभाऊ जावळे (भाजप)

12 – भुसावळ- संजय सावकारे (भाजप)

13 – जळगाव शहर- सुरेश भोळे (भाजप)

14 – जळगाव ग्रामिण- गुलाबराव पाटील (शिवसेना)

15 – अमळनेर- शिरीष चौधरी (अपक्ष)

16 – एरंडोल- बापू सतिश पाटील (राष्ट्रवादी)

17 –  चाळीसगाव- उन्मेश पाटील (भाजप)

18 – पाचोरा- किशोर पाटील (शिवसेना)

19 – जामनेर- गिरीष महाजन (भाजप)

20 – मुक्ताईनगर- एकनाथ खडसे (भाजप)

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.