AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नंदुरबार आढावा : काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजप पुन्हा झेंडा फडकवणार?

गेल्या निवडणुकीत भाजपने या जिल्ह्यात मोठं यश मिळवत दोन जागांवर विजय मिळवला. शिवाय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही भाजपच्या डॉ. हीना गावित यांनी विजय मिळवला होता.

नंदुरबार आढावा : काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजप पुन्हा झेंडा फडकवणार?
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Sep 10, 2019 | 5:34 PM
Share

नंदुरबार : जिल्ह्यातील सर्व चार विधानसभा मतदारसंघ (Nandurbar assembly seats) राखीव आहेत. सत्ताधारी भाजपकडे दोन आणि काँग्रेसकडे दोन जागा (Nandurbar assembly seats) आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपने या जिल्ह्यात मोठं यश मिळवत दोन जागांवर विजय मिळवला. शिवाय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही भाजपच्या डॉ. हीना गावित यांनी विजय मिळवला होता.

अक्कलकुवा

या मतदारसंघात काँग्रेसचे के. सी. पाडवी यांनी 15777 मतांनी विजय मिळवला होता. तर दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादीचे उमेदवार पी. व्ही. रुपसिंग होते. रुपसिंग यांनी 48 हजार 635 आणि विजयी उमेदवार पाडवी यांनी 64 हजार 410 मतं मिळवली होती. या मतदारसंघात भाजपचा उमेदवार तिसऱ्या आणि शिवसेनेचा उमेदवार चौथ्या क्रमांकावर राहिला होता.

शहादा

भाजपचे उदयसिंह पाडवी यांनी काँग्रेसचे पद्माकर वळवी यांचा पराभव केला होता. पाडवी यांनी 58 हजार 556 आणि वाळवी यांना 57 हजार 837 मतं मिळाली होती.

नंदुरबार

नंदुरबार विधानसभा मतदारसंघावरही भाजपने झेंडा फडकावला होता. भाजपचे विजयकुमार गावित यांनी या मतदारसंघात काँग्रेसचे कुणाल वासवे यांचा पराभव केला होता.

नवापूर

या मतदारसंघात काँग्रेसचे सुरुपसिंग नाईक यांनी राष्ट्रवादीचे शरद गावित यांचा 21817 मतांनी पराभव केला होता.

नंदुरबार : एकूण जागा 04 (Nandurbar MLA list)

1 – अक्कलकुवा – के सी पाडवी (काँग्रेस)

2 – शहादा – उदयसिंह पाडवी (भाजप)

3 – नंदुरबार – विजयकुमार गावित (भाजप)

4 – नवापूर – सुरूपसिंग नाईक (काँग्रेस)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...