AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Air purifier helmet : प्रदूषित वातावरणातही घ्या शुध्द हवेचा अनुभव… ‘या’ हेल्मेटमध्ये एअर प्युरिफायरची सोय…

आजकाल जवळपास सर्वच कारच्या केबिनमध्ये एअर प्युरिफायरची सोय करण्यात आली आहे. आता यात दुचाकीधारकही मागे राहणार नाहीत. कारण एक मेड इन इंडिया हेल्मेट तुमचे दूषित हवेपासून संरक्षण करणार आहे. याव्दारे, 80 टक्के एअर फिल्टर होत असल्याचा दाव करण्यात आला आहे.

Air purifier helmet : प्रदूषित वातावरणातही घ्या शुध्द हवेचा अनुभव... ‘या’ हेल्मेटमध्ये एअर प्युरिफायरची सोय...
| Edited By: | Updated on: Sep 03, 2022 | 12:01 PM
Share

जगातील सर्वाधिक प्रदूषित (polluted) शहरांच्या यादीत भारतीय शहरांचा क्रमांक लागतो, हे अत्यंत लाजिरवाणे सत्य आहे. म्हणूनच एका भारतीय स्टार्टअपने दुचाकी चालकांना प्रदूषित हवेपासून वाचवण्यासाठी खास हेल्मेट तयार केले आहे. हेल्मेट (Helmet) स्वतःच हवा शुद्ध करीत असल्याचा दावा करण्यात आला आहे. हिवाळ्याच्या काळात हवेची स्थिती सर्वाधिक बिघडते. याचा लोकांच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो आणि अनेक लोकांचा यामुळे मृत्यूही होतो. त्यामुळे, एअर प्युरिफायर असलेले हेल्मेट (Air purifier helmet) स्कूटर-बाईकस्वारांना खूप दिलासा देणारे ठरणार आहे.

हेल्मेटमध्ये एअर प्युरिफायर

जगभरात प्रदूषण ही एक मोठी समस्या आहे. भारतातही एअर प्युरिफायरची मागणी वाढत आहे. आता तर कार कंपन्याही नवीन कारमध्ये केबिन एअर प्युरिफिकेशन सिस्टम बसवत आहेत. मात्र, दुचाकी चालकांबाबत अशी कुठलीही सोय झाली नव्हती. पण एका भारतीय स्टार्टअपने असे हेल्मेट तयार करण्यात यश मिळवले आहे, जे रायडरचे संरक्षण करण्यासोबतच हवा शुद्ध करते.

दुचाकीस्वारांना ताजी हवा

स्कूटर आणि बाइकस्वारांना भारतीय रस्त्यांवरील सर्वात भयानक प्रदूषणाचा सामना करावा लागतो. अशा स्थितीत 80 टक्के प्रदूषक घटक फिल्टर करण्याचा दावा करत एअर प्युरिफायर असलेले हेल्मेट बाजारात उपलब्ध आहे. एचटी ऑटोच्या मते, भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने आपल्या अहवालात लिहिले आहे, की हे हेल्मेट दुचाकीस्वारांना श्वास घेण्यासाठी ताजी व शुध्द हवा देण्यास सक्षम आहे.

काय किंमत आहे?

एअर प्युरिफायरसह हेल्मेटच्या डिझाइनबद्दल सांगायचे तर, त्यात एअर प्युरिफिकेशन युनिट बसविण्यात आले आहे. हे बदलता येण्यासारखे फिल्टर असून यात, बॅटरीवर चालणारा पंखा बसवला आहे. हेल्मेटचे एअर प्युरिफायर 6 तासांपर्यंत टिकू शकते. युजर्स हे हेल्मेट मायक्रो युएसबी स्लॉटद्वारे देखील चार्ज करू शकतात. हे हेल्मेट बाजारात 4,500 रुपयांना उपलब्ध आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.