सरकारचा मोठा निर्णय! वाहन चालकाच्या बाजूला बसणाऱ्या व्यक्तीसाठी लागू होणार ‘हे’ नियम…

कार बनवणाऱ्या सर्व कंपन्यांना कारच्या पुढच्या सीटसाठी एअरबॅग अनिवार्य करण्याचा आदेश सरकारकडून जारी केला जाऊ शकतो.

सरकारचा मोठा निर्णय! वाहन चालकाच्या बाजूला बसणाऱ्या व्यक्तीसाठी लागू होणार ‘हे’ नियम...
मोटारकारच्या पुढच्या सीटसाठी एअरबॅग अनिवार्य करण्याचा विचार सरकार करत आहे.
Follow us
| Updated on: Dec 18, 2020 | 5:43 PM

मुंबई : कार बनवणाऱ्या सर्व कंपन्यांना कारच्या पुढच्या सीटसाठी एअरबॅग अनिवार्य करण्याचा आदेश सरकारकडून जारी केला जाऊ शकतो. सध्याच्या माहितीनुसार, सरकारच्या या आदेशांमध्ये इकॉनॉमी मॉडेल्सच्या गाड्यांचादेखील समावेश असू शकतो. मोटारकारच्या पुढच्या सीटसाठी एअरबॅग अनिवार्य करण्याचा विचार सरकार करत आहे. महत्त्वाचे म्हणजे 1 जुलै 2019पासून कारमध्ये ड्रायव्हरच्या भागात एअरबॅग अनिवार्य केल्या गेल्या आहेत (Airbags For both front seat can be mandatory for all cars).

समितीची प्रस्तावाला मंजुरी

या प्रस्तावाला मोटारींच्या गुणवत्तेसाठी तयार केलेल्या तांत्रिक समितीने मान्यता दिली असून, आता शासनाने मसुदा अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये ही अधिसूचना ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टँडर्डला (एआयएस) पाठविली गेली आहे, जे सुरक्षा उपायांकडे लक्ष देतात. वाहनांमध्ये अधिक सुरक्षा उपाययोजना केल्या पाहिजेत जेणेकरुन अपघातातील प्रवाशांचे संरक्षण होऊ शकेल, यासाठी संपूर्ण जगाचे एकमत आहे, असे एका सरकारी अधिकाऱ्याच्या वतीने सांगण्यात आले आहे.

कोणत्याही परिस्थिती सुरक्षा उपायांशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही भारत सरकारने स्पष्ट केले आहे. नव्या नियमांची अंमलबजावणी करतांना रस्ते वाहतूक मंत्रालय वेळ-मर्यादेवर काम करत असल्याचे, सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. सरकारशी संबंधित सूत्रांच्या माहितीप्रमाणे, हा असा नियम अंमलात आणण्यासाठी जवळपास वर्षभराचा कालावधी लागणार आहे.

किआ कंपनीचा नवा विक्रम; भारतात इतक्या कार्सची विक्री

एक एअरबॅग अनिवार्य

सध्याच्या तरतुदींमध्ये एकल एअरबॅग अनिवार्य करण्यात आल्या आहेत. परंतु, इतकी सुरक्षा व्यवस्था पुरेशी नाहीत. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पुढच्या सीटवर बसलेल्या प्रवाश्यालाही अपघातादरम्यान गंभीर जखमी होण्याचा किंवा मृत्यूचा धोका तितकाच आहे. स्पीड अ‍ॅलर्ट, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स आणि सीट बेल्ट्स अशा उपाययोजना कमी किंमतीत सुरक्षितता सुनिश्चित केल्या जाऊ शकतात. मात्र, वाहन मानकांनुसार पुढच्या सीटवरील प्रवाश्याच्या सुरक्षेसाठी अद्याप एअरबॅग अनिवार्य केलेल्या नाहीत. एआयएसमध्ये संशोधन आणि प्रस्तावित चाईल्ड लॉक सिस्टम सर्व चारचाकी वाहनांमध्ये लागू करता येणार नाही. ही यंत्रणा सध्या केवळ व्यावसायिक वाहनांमध्ये वापरली जाते.

(Airbags For both front seat can be mandatory for all cars)

हेही वाचा :

तुम्हीही चालवू शकता परदेशात गाडी, अमेरिकेसह ‘या’ देशांत भारतीय ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ला मान्यता

Non Stop LIVE Update
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.