AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bikes : 125cc बाईक हव्या! Hero, Bajaj, TVSचे उत्तम पर्याय, वाचा तुमच्या कामाची बातमी

भारतात स्पोर्टी लुक आणि चांगल्या मायलेज बाइक्सची चर्चा होते.

Bikes : 125cc बाईक हव्या! Hero, Bajaj, TVSचे उत्तम पर्याय, वाचा तुमच्या कामाची बातमी
125cc बाईकImage Credit source: social
| Updated on: May 17, 2022 | 12:05 PM
Share

मुंबई : भारतातील दुचाकी कंपन्या (India Two wheeler companies) तरुणांना आकर्षीत करण्यासाठी वेगवेगळे लूक दुचाक्यांना (Two wheeler) देत असतात. वेगवेगळे आकार आणि गाडीच्या स्पीडवरुन ग्राहक त्या दुचाकीकडे आकर्षीत होतात. मुलांना वेगवान धावणारी आणि स्टायलीश दुचाकी हवी असते. याचाच विचार करुण दुचाकी बनवली जाते. भारतीय दुचाकी कंपन्या हिरो सुपर स्प्लेंडर, हिरो ग्लॅमर, हिरो पॅशन, होंडा सीबी शाइन, होंडा एसपी 125, केटीएम ड्यूक 125(ktm duke 125), बजाज पल्सर 125 निऑन, आणि 5एनएस यासह 125 सीसी सेगमेंटनं लोकांसाठी एक स्थान निर्माण केलं आहे. TVS Raider 125. लोकप्रिय मोटारसायकली सादर करण्यात आल्या आहेत, ज्या लूक आणि फीचर्स तसेच मायलेजच्या बाबतीत चांगल्या आहेत. त्यांच्या किंमती आणि फीचर्स आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

भारतातील 125cc बाईक

भारतात स्पोर्टी लुक आणि चांगल्या मायलेज बाइक्सची चर्चा होते. तेव्हा लोकांसमोर 125cc मोटरसायकलची प्रतिमा दिसते. 125 सीसी बाईक सामान्य बजेट बाईकपेक्षा अधिक शक्तिशाली असल्या तरी त्या दिसायलाही चांगल्या आहेत. भारतात Hero MotoCorp सोबत Honda, Bajaj Auto, TVS मोटर कंपनी आणि KTM सारख्या कंपन्यांनी एकापेक्षा जास्त 125 cc मोटारसायकल सादर केल्या आहेत. ज्यांची विक्री देखील चांगली होते. जर तुम्ही आजकाल स्वतःसाठी 125 सीसी ची बाइक शोधत असाल तर आज आम्ही तुम्हाला टॉप 5 बाईकच्या किंमतींची ओळख करून देत आहोत.

Hero, Honda आणि KTM बाईक्स

सर्वाधिक विकल्या जाणार्‍या 125 cc बाइक्सबद्दल बोलायचं झाल्यास Hero Super Splendor ची किंमत 86 हजार 869 ते 94 हजार 435 रुपये आहे (एक्स-शोरूम ) त्याच वेळी हिरो ग्लॅमरची किंमत 89 हजार 402 रुपयांपासून ते 98 हजार 59 रुपयांपर्यंत आहे. Hero नंतर, Honda ने 125 cc सेगमेंटमध्ये 2 मस्त बाईक देखील सादर केल्या आहेत. यामध्ये Honda Shine ची किंमत 89 हजार 565 ते 93 हजार 931 रुपये आहे. त्याच वेळी, Honda SP 125 ची किंमत 95 हजार 124 रुपये ते 99 हजार 490 रुपये आहे. तुमच्यासाठी स्पोर्ट्स बाइक सेगमेंटमध्ये KTM Duke 125 देखील आहे. ज्याची किंमत 1.92 लाख ते 1.95 लाख रुपये आहे. या सर्व एक्स शोरूम किमती आहेत.

बजाज आणि TVS

बजाज आणि टीव्हीएसच्या लोकप्रिय मोटारसायकली भारतातील लोकप्रिय 125 cc बाइक्सबद्दल बोलायचं झाल्यास बजाज ऑटोनं या सेगमेंटमध्ये दोन सर्वोत्तम बाइक्स सादर केल्या आहेत. यामध्ये बजाज पल्सर 125 निऑनची किंमत 90 हजार 164 ते 1.5 लाख रुपये आहे. त्याच वेळी, बजाज पल्सर NS 125 ची किंमत 1.13 लाख ते 1.20 लाख रुपयांपर्यंत आहे. मागील वर्षी, TVS ने TVS Raider 125 ही 125 cc सेगमेंटमधील एक आलिशान बाईक लाँच केली होती. त्यांची किंमत 97 हजार 576 ते रु 1.03 लाख आहेत.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.