AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिंगल चार्जमध्ये 160KM रेंज, चावीशिवाय स्टार्ट होणारी इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात, लायसन्सची गरज नाही

भारतात लोक घराजवळ कुठेही जाण्यासाठी, स्थानिक बाजारातून सामान आणण्यासाठी स्कूटर घेऊन जाणं पसंत करतात. कदाचित अशाच गरजा लक्षात घेऊन क्रेयॉन एनव्ही (Crayon Envy) कंपनीने भारतीय बाजारात एक लो स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे.

सिंगल चार्जमध्ये 160KM रेंज, चावीशिवाय स्टार्ट होणारी इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात, लायसन्सची गरज नाही
Crayon Envy Electric Scooter
| Updated on: Mar 22, 2022 | 1:10 PM
Share

मुंबई : भारतात लोक घराजवळ कुठेही जाण्यासाठी, स्थानिक बाजारातून सामान आणण्यासाठी स्कूटर घेऊन जाणं पसंत करतात. कदाचित अशाच गरजा लक्षात घेऊन क्रेयॉन एनव्ही (Crayon Envy) कंपनीने भारतीय बाजारात एक लो स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. ही स्कूटर चावीशिवाय सुरू केली जाऊ शकते. कंपनीने ही स्कूटर चार रंगांच्या पर्यायांमध्ये सादर केली आहे, ज्यामध्ये पांढरा, काळा, निळा आणि सिल्व्हर या रंगांचा समावेश आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची (Electric scooter) किंमत 64,000 रुपये ठेवण्यात आली आहे आणि ती अनेक उत्तम फीचर्स आणि उत्तम बूट स्पेससह येते. तसेच, यात कीलेस स्टार्टअप सिस्टम (Keyless start system) आहे. ही स्कूटर देशभरातील 100 हून अधिक किरकोळ ठिकाणी खरेदी केली जाऊ शकते. या स्कूटरला मोटर आणि कंट्रोलवर 24 महिन्यांची वॉरंटी मिळेल.

कंपनीने यामध्ये पुढे आणि मागे जाण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे, ज्याच्या मदतीने ही स्कूटर अगदी लहान जागेतही पार्क करता येते. या इलेक्ट्रिक स्कूटरवर 14 पैसे प्रति किलोमीटर इतका खर्च करावा लागेल. ही किंमत खूपच कमी आहे कारण आपल्या सर्वांना पेट्रोलच्या वाढलेल्या किंमती माहितच आहेत. सर्व दुचाकी फक्त पेट्रोल इंधनावर चालतात, त्यामुळे ही इलेक्ट्रिक स्कूटर एक परवडणारा पर्याय ठरू शकते.

Crayon Envy चे फीचर्स

या स्कूटरच्या टेक फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर यात जिओ टॅगिंग, सेंट्रल लॉकिंग सारखे फीचर्स आहेत. तसेच, या स्कूटरमध्ये डिजिटल स्पीडोमीटर आणि मोबाइल चार्जिंग पोर्ट आहे. डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर, यात मॅन्युअल हेडलाइट्स देण्यात आले आहेत, जे आकर्षक डिझाइनसह कमी प्रकाशातही चांगली व्हिजिबिलिटी देतात.

Crayon Envy मधील ड्रायव्हिंग मोड्स

या स्कूटरमध्ये कम्फर्ट सीट्स देण्यात आल्या आहेत आणि जे लोक जास्त वेळ रायडिंग करतात त्यांच्यासाठी ही स्कूटर एक चांगला पर्याय ठरू शकते. ही लो स्पीड स्कूटर आहे आणि तिचा टॉप स्पीड 25 किमी प्रतितास इतका आहे. ही स्कूटर चालवण्यासाठी चालक परवाना आवश्यक नाही.

Crayon Envy ची बॅटरी

स्कूटर 250 वॅट्स BLDC मोटरसह सुसज्ज आहे. यात ट्यूबलेस टायर, डिस्क ब्रेक आणि 150 मिमी ग्राउंड क्लीयरन्स देखील मिळतो. ही स्कूटर सिंगल चार्जवर 160 किमीची ड्रायव्हिंग रेंज देऊ शकते.

इतर बातम्या

अवघ्या 30 हजारात घरी न्या Bajaj Discover 150, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

5.5 लाखांची Hyundai कार 2.5 लाखात खरेदीची संधी, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

अवघ्या 38 हजारात खरेदी करा Honda Activa, जाणून घ्या कुठे मिळतेय शानदार डील

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.