AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पेट्रोल पंप विसरा आता, हायब्रिड अवतारात येत आहे 4 भन्नाट कार, इतका असणार मायलेज

मारुती सुझुकी लवकरच आपल्या कारना हायब्रिड सिस्टीमने लोड करणार आहे.याचा हा फायदा होईल की पेट्रोलसह चांगला मायलेज देखील मिळेल. चांगली बातमी म्हणजे ही सिस्टीम सेगमेंट कारसाठी असणार आहे.

पेट्रोल पंप विसरा आता, हायब्रिड अवतारात येत आहे 4 भन्नाट कार, इतका असणार  मायलेज
| Updated on: Aug 09, 2025 | 3:03 PM
Share

देशातील आघाडीची मारुती सुझुकी कार कंपनी तिच्या आगामी मॉडेलसाठी स्वत:चा स्ट्राँग हायब्रिड पॉवरट्रेन तयार करीत आहे.हा हायब्रिड सिस्टीम सिस्टीम खास करुन एंट्री आणि मिड-लेव्हल सेगमेंट कारसाठी असेल. ही हायब्रिड टेक्नॉलॉजी टोयोटाच्या सिरीज-पॅरलल हायब्रिड सिस्टमपेक्षा वेगळी असणार आहे. आणि किंमतीही कमी असणार आहे.मारुती फ्रँक्स ही इन-हाऊस डेव्हलप केलेली स्ट्राँग हायब्रिड पॉवर ट्रेनवाली पहिली कार असणार आहे. याची लाँचिंग डेट अद्यापही निश्चित झालेली नाही. परंतू 2026 मध्ये ही बाजारात येणार आहे.

यानंतर नव्या पिढीची मारुती बलेनो दुसऱ्या क्रमाकांवर असेल, नंतर मारुती नवीन स-4 मीटर MPV येईल. नव्या बलेनोत डिझाईन आणि इंटेरियरमध्ये मोठे बदलासह पेट्रोल-हायब्रिड इंजिन असण्याची शक्यता आहे. येणारी कॉम्पॅक्ट MPV,सुझुकी स्पेशियावर आधारित होऊ सकते, जी सध्या जपानमध्ये विकली जात आहे. दोन्ही मॉडेल 2026 लाँच होऊ शकतात. यामुळे 2026 पर्यंत मारुती जवळ तीन प्रकारच्या हायब्रिड टेक्नॉलॉजी असतील, माईल्ड हायब्रिड, मारुतीची स्वत:ची स्ट्राँग हायब्रिड आणि टोयोटाकडून घेतलेला हायब्रिड सिस्टीम.

स्विफ्ट देखील होणार हायब्रिड

मारुतीची सर्वाधिक विकली जाणारी स्विफ्ट हॅचबॅक आणि ब्रेझा सब-कॉम्पॅक्ट SUV ला देखील ही नवीन सिरीज हायब्रिड टेक्नॉलॉजी मिळणार आहे. नव्या जनरेशनची स्विफ्ट 2027 मध्ये हायब्रिड व्हर्जनमध्ये येईल. तर पुढच्या पिढीची ब्रेझा 2029 मध्ये या नव्या हायब्रिड टेक्नॉलॉजीसह लाँच होईल. दोन्ही मॉडेलमध्ये डिझाईन आणि इंटेरियरमध्ये मोठे बदल होणार आहेत.

इतका मायलेज देणार या कार

मारुती कंपनी एक सिरीज हायब्रिड सेटअप विकसित करत आहे. ज्यात इंजिन केवळ जनरेटर वा रेंज एक्सटेंडर तऱ्हेने काम करेल. हायब्रिड सिस्टीने तयार होणारी वीज थेट इलेक्ट्रीक मोटरला दिली जाईल, जी चाकांना फिरवेल. हा सेटअप सिरीज -पॅरलल सिस्टीम पेक्षा जास्त सोपा असेल. तर मारुतीच्या हाय-एंड SUVs मध्ये टोयोटावाला स्ट्राँग हायब्रिड सिस्टीम लावला जाईल. मारुती कार कंपनी आपल्या नव्या हायब्रिड सिस्टीमला Z12E तीन-सिलिंडर पेट्रोल इंजिन सह आणणार आहे, जे आता स्विफ्टमध्ये मिळते. बातम्यानुसार येणाऱ्या मारुतीच्या हायब्रिड कार 35 kmpl हून अधिक मायलेज देतील.

दमानियांचे ते आरोप खोटे? निलेश मगर म्हणाले त्या व्यवहाराशी माझा संबध..
दमानियांचे ते आरोप खोटे? निलेश मगर म्हणाले त्या व्यवहाराशी माझा संबध...
सामंत गुगली टाकण्यात हुशार, थातुरमातुर.... प्रकाश सुर्वेंचा घरचा आहेर
सामंत गुगली टाकण्यात हुशार, थातुरमातुर.... प्रकाश सुर्वेंचा घरचा आहेर.
विधानसभेत आसन व्यवस्थेवरून ठाकरेंची सेना अन् काँग्रेसमध्ये वाद
विधानसभेत आसन व्यवस्थेवरून ठाकरेंची सेना अन् काँग्रेसमध्ये वाद.
संदीप देशपांडेंकडून सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचार उघड, थेट...
संदीप देशपांडेंकडून सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचार उघड, थेट....
भास्कर जाधव विधानसभेत भडकले अन् कामकाजावरच आक्षेप, नेमकं घडलं काय?
भास्कर जाधव विधानसभेत भडकले अन् कामकाजावरच आक्षेप, नेमकं घडलं काय?.
तेव्हा अजित पवारांची सत्ता नव्हती, पण आता तर... दमानियांचा दावा काय?
तेव्हा अजित पवारांची सत्ता नव्हती, पण आता तर... दमानियांचा दावा काय?.
फडणवीस तेव्हा हुडी घालून मला.. शिंदेंनी सांगितला सेनाफुटीवेळीचा किस्सा
फडणवीस तेव्हा हुडी घालून मला.. शिंदेंनी सांगितला सेनाफुटीवेळीचा किस्सा.
कराड जामिनावर सुटल्यास...व्हायरल ऑडिओनंतर जरांगेंचा थेट सरकारलाच इशारा
कराड जामिनावर सुटल्यास...व्हायरल ऑडिओनंतर जरांगेंचा थेट सरकारलाच इशारा.
मातृत्वाला काळीमा... जन्मदात्या आईकडूनच पोटच्या 6 मुलांचा सौदा अन्...
मातृत्वाला काळीमा... जन्मदात्या आईकडूनच पोटच्या 6 मुलांचा सौदा अन्....
नागपूर पारडीत बिबट्याचा थरार, जेरबंद करण्यास असं सुरू रेस्क्यू ऑपरेशन
नागपूर पारडीत बिबट्याचा थरार, जेरबंद करण्यास असं सुरू रेस्क्यू ऑपरेशन.