Honda CB 350 RS vs H’Ness CB 350 : तुमच्यासाठी परफेक्ट बाईक कोणती?

होंडा कंपनी आपल्या प्रीमियम मोटरसायकल पोर्टफोलिओचा भारतात वेगाने विस्तार करीत आहे. (Honda Motorcycle and Scooter India)

Honda CB 350 RS vs H’Ness CB 350 : तुमच्यासाठी परफेक्ट बाईक कोणती?
Honda CB 350 RS vs H’Ness CB 350
Follow us
| Updated on: Mar 17, 2021 | 10:12 AM

मुंबई : होंडा कंपनी आपल्या प्रीमियम मोटरसायकल पोर्टफोलिओचा भारतात वेगाने विस्तार करीत आहे. रेडलाईन डीलरशिपमधून रिटेल होणारी हॉर्नेट 2.0 बाईक लाँच झाल्यानंतर कंपनीने आता H’Ness CB 350 रोलआऊट केली आहे. जी CB350 RS प्रमाणेच आहे. दोन्ही बाईकचे इंजिन, प्लॅटफॉर्म आणि फ्रेम सारखी आहे. परंतु CB 350RS मध्ये काही महत्त्वपूर्ण गोष्टी अपडेट केल्या आहेत. (Honda CB 350 RS vs H’Ness CB 350 : Which 350cc bike is better)

Honda CB350RS मोटरसायकलची डिलिव्हरी सुरू करण्यात आली आहे. त्याच वेळी, H’Ness CB 350 मोटरसायकलचे स्पोर्टी व्हेरिएंट गेल्या महिन्यात भारतात लाँच केले गेले. BigWing Toplines (बिगविंग टॉपलाईन) आणि BigWing (बिगविंग) द्वारे होंडा कंपनी देशभरात त्यांच्या विविध मोटारसायकलींसाठी बुकिंग्स घेत आहे. चला तर मग जाणून घेऊया दोन 350 सीसी दुचाकींमध्ये नेमका काय फरक आहे.

Honda CB350 RS

होंडाने त्यांची नवीन स्क्रॅम्बलर बाईक CB350 RS ही 1.96 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतक्या किंमतीत सादर केली आहे. होंडाच्या बिगविंग शोरुमद्वारे या बाईकची देशभरात विक्री केली जाईल. नवीन स्क्रॅम्बलर CB350 RS या बाईकमधील इंजिनबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये कंपनीने 348.6cc क्षमतेचं सिंगल सिलिंडर युक्त एयर कूल्ड इंजन दिलं आहे, हे 5 स्पीड गियरबॉक्ससह सादर करण्यात आलं आहे. तसेच हे इंजिन 20.78bhp दमदार पॉवर आणि 30Nm टॉर्क जेनरेट करु शकतं.

सोबतच या बाईकमध्ये स्लिपर क्लचही देण्यात आलं आहे जे गियर शिफ्टिंग अजूनच स्मूथ बनवेल. फ्रंटला 310mm डिस्क आणि मागच्या बाजूला 240mm डिस्क ब्रेक देण्यात आला आहे. CB350 RS मध्ये डुअल चॅनल अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिमचा (ABS) वापर करण्यात आला आहे. तसेच डुप्लेक्स क्रॅडल चेसिसवर तयार करण्यात आलं आहे. या बाईकच्या फ्रंटला तुम्हाला टेलेस्कोपिक फॉर्क सस्पेंशन आणि बॅक साईडला हायड्रॉलिक सस्पेंशन मिळेल.

नवीन Honda CB350 RS मध्ये कंपनीने रुंद टायर वापरले आहेत, जे रायडिंग अजूनच कम्फर्टेबल आणि बॅलेन्स्ड बनवतात. सोबतच या बाईकमध्ये राऊंड शेप हेडलँप, ब्लॅक ऑऊट शॉक अॅब्जॉर्बर (Shock Absorber) क्रोम मफलर, डुअल टोन फ्यूल टँक आणि सिंगल पीस सीटसह नवे ग्राफिक्स मिळतील. या बाईकमध्ये तुम्हाला सिंगल पॉड इंस्ट्रूमेंट कंसोलसह अॅनालॉग आणि छोटा डिजिटल डिस्प्लेदेखील मिळेल. या कंसोलमध्ये तुम्हाला ABS, साईड स्टँड इंडिकेटर, इको इंडिकेटर, रियल टाईम मायलेज, अॅवरेज मायलेज, स्मार्टफोन वॉईस कंट्रोल सिस्टिम (HSVCS) आणि गियर पोजिशनची माहिती मिळेल.

कंपनीने या बाईकमध्ये स्मार्टफोन वॉईस कंट्रोल सिस्टिमही दिली आहे. याद्वारे तुम्ही ही बाईक तुमच्या स्मार्टफोनशी कनेक्ट करु शकता. बाईक फोनशी कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये HSVCS मोबाईल अॅप डाऊनलोड करावं लागेल. त्यानंतर तुम्ही तुमच्या फोनद्वारे या बाईकमधील अनेक फीचर्स हाताळू शकता.

Honda H’ness CB350

होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडियाने (Honda Motorcycle and Scooter India) ऑक्टोबर 2020 मध्ये लाँच केलेल्या Honda H’ness CB350 ने 10,000 यूनिट्स विक्रीचा टप्पा पार केला आहे. ही बाईक 350-500cc मोटरसायकल सेगमेंटमध्ये जबरदस्त पर्याय आहे. ही बाईक रॉयल एनफिल्ड क्लासिक 350, जावा क्लासिक आणि Benelli Imperiale 400 सारख्या बाईक्सना जोरदार टक्कर देत आहे.

या बाईकच्या DLX व्हेरिएंटची एक्स शोरूम किंमत 1.85 लाख रुपये इतकी आहे. तर या बाईकच्या DLX Pro व्हेरिएंटची किंमत 1.90 लाख रुपये आहे. हायनेस-सीबी 350 या बाईकमध्ये एक 350 सीसीचं पॉवरफुल 4 स्ट्रोक एअरकुल्ड, ओएचसी सिंगल-सिलेंडर आहे. त्यामध्ये पीजीएम-एफआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या बाईकमध्ये पुढे आणि मागे अधिक व्हिजिबिलिटीसाठी एलईडी सेटअप आहे. सोबतच बाईकमध्ये ड्युअल डिस्क ब्रेक, ड्युअल चॅनेल एबीएस आणि 15 लीटरचा फ्युल टँक आहे.

संबंधित बातम्या

अवघ्या 85 हजारात खरेदी करा 2.13 लाखांची Royal Enfield Thunderbird 500

शानदार फीचर्ससह Hero Xpulse 200T चं BS6 व्हर्जन लाँच, किंमत…

Honda च्या ‘या’ शानदार बाईकमध्ये आढळला दोष; कंपनीने गाड्या परत मागवल्या

(Honda CB 350 RS vs H’Ness CB 350 : Which 350cc bike is better)

Non Stop LIVE Update
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.