क्रेटा ठरली सर्वाधिक विकली जाणारी कार, गेल्या 7 महिन्यात किती गाड्यांची विक्री?
ह्युंदाई क्रेटाने भारतीय कार बाजारात धुमाकूळ घातला आहे. ही एसयूव्ही जानेवारी ते जुलै 2025 या कालावधीत सर्वाधिक विकली जाणारी वाहन ठरली असून एकूण 1,17,458 ग्राहकांनी क्रेटा खरेदी केली आहे.

ह्युंदाई क्रेटाची क्रेझ कायम आहे. क्रेटाने एक असा विक्रम केला आहे की ती सर्वाधिक पसंतीची कार बनली आहे की काय, असं तुम्हाला वाटू शकतं. या ह्युंदाई क्रेटाने भारतीय कार बाजारात धुमाकूळ घातला आहे. हो. ही एसयूव्ही जानेवारी ते जुलै 2025 या कालावधीत सर्वाधिक विकली जाणारी कार ठरली आहे, एकूण 1,17,458 ग्राहकांनी क्रेटा खरेदी केली आहे. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.
ह्युंदाई क्रेटा… कार बाजाराचा चेहरामोहरा बदलून टाकणारी कार. होय, क्रेटाने भारतीय बाजारपेठेत यापूर्वी 10 वर्ष पूर्ण केली आहेत आणि या कालावधीत किती महिने आले जेव्हा या एसयूव्हीने उर्वरित सेगमेंटच्या वाहनांना धूळ खात अव्वल स्थान मिळविले. क्रेटाची विजयाची मालिका यंदाही कायम असून 2025 च्या जानेवारी ते जुलै या कालावधीत क्रेटा सर्वाधिक विकली जाणारी कार ठरली आहे.
8 टक्के अधिक विक्री
ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडने (HMIL) सांगितले की, त्यांची क्रेटा एसयूव्ही यावर्षी जानेवारी ते जुलै दरम्यान भारतात सर्वाधिक विकली जाणारी वाहन ठरली आहे. क्रेटाने इतर सर्व विभागांना मागे टाकले आहे. केर्टाची विक्री 1,17,458 युनिट्स झाली आहे, जी मागील वर्षाच्या तुलनेत 8 टक्क्यांनी वाढली आहे.
किंमत आणि यूएसपी
ह्युंदाई क्रेटाच्या पेट्रोल आणि डिझेल मॉडेलव्यतिरिक्त इलेक्ट्रिक मॉडेल्सचीही विक्री केली जाते. क्रेटाच्या पेट्रोल व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 11.11 लाख रुपयांपासून सुरू होऊन 20.34 लाख रुपयांपर्यंत जाते. तर क्रेटाच्या डिझेल व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 12.69 लाख रुपयांपासून 20.50 लाख रुपयांपर्यंत आहे.
यावर्षी लाँच झालेल्या क्रेटा इलेक्ट्रिकची एक्स शोरूम किंमत 17.99 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 24.38 लाख रुपयांपर्यंत जाते. ह्युंदाई क्रेटा लूक आणि फीचर्स सोबतच पॉवर आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत जबरदस्त आहे.
‘क्रेटाने लोकांच्या हृदयात निर्माण केले खास स्थान’
ह्युंदाई क्रेटाच्या यशाबद्दल बोलताना ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडचे संचालक तरुण गर्ग म्हणाले, “ह्युंदाई क्रेटाचा दहावा वर्धापनदिन साजरा करत असताना आम्ही आमच्या ग्राहकांच्या विश्वासाने आणि प्रेमाने भारावून गेलो आहोत.
जानेवारी ते जुलै 2025 या कालावधीत भारतातील सर्व सेगमेंटमध्ये सर्वाधिक विकली जाणारी प्रवासी वाहने म्हणून क्रेटाचा उदय ही केवळ आकडेवारी नाही. ह्युंदाई क्रेटाने लोकांच्या हृदयात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे आणि आम्ही ग्राहकांना अधिक चांगला अनुभव देण्यासाठी काम करत राहू. ह्युंदाई येत्या काळात आणखी नवीन वाहने आणण्याच्या तयारीत आहे.
