तुम्हीही जर टाटाच्या गाड्यांचे फॅन असाल तर अवश्य ही बातमी वाचा; आजपासून होणार हा मोठा बदल

गाड्यांच्या किंमतीतील वाढ कंपनीच्या 'बिझनेस अ‍ॅगिलिटी प्लॅन'चा एक भाग आहे. कंपनीचे ग्राहक, डीलर आणि पुरवठादार यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी तसेच त्यांना चांगली सेवा देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे कंपनीने आपल्या अधिकृत निवेदनामध्ये म्हटले आहे.

तुम्हीही जर टाटाच्या गाड्यांचे फॅन असाल तर अवश्य ही बातमी वाचा; आजपासून होणार हा मोठा बदल
तुम्हीही जर टाटाच्या गाड्यांचे फॅन असाल तर अवश्य ही बातमी वाचा

नवी दिल्ली : टाटा मोटर्स येत्या 3 ऑगस्टपासून अर्थात आजपासून आपल्या सर्व गाड्यांच्या किंमती वाढवणार आहे. मॉडेल आणि व्हेरिएंटनुसार किंमती वाढण्याचे प्रमाण सरासरी 0.8 टक्के असेल. कंपनीने यासंदर्भात एक अधिकृत निवेदन काढले आहे. त्यात या दरवाढीची घोषणा केली आहे. गाड्यांच्या किंमतीतील वाढ कंपनीच्या ‘बिझनेस अ‍ॅगिलिटी प्लॅन’चा एक भाग आहे. कंपनीचे ग्राहक, डीलर आणि पुरवठादार यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी तसेच त्यांना चांगली सेवा देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे कंपनीने आपल्या अधिकृत निवेदनामध्ये म्हटले आहे. (If you are also a fan of Tata cars, you must read this news; This big change will happen from today)

आघाडी कार उत्पादक कंपनी असलेल्या टाटा मोटर्सने पुष्टी केली आहे की किंमतीमध्ये सुरक्षा प्रदान केली जात आहे. ही सुरक्षा केवळ 31 ऑगस्ट 2021 रोजी किंवा त्यापूर्वी रिटेल करण्यात आलेल्या वाहनांवर लागू आहे. कंपनीने ग्राहकांशी आपली वचनबद्धता कायम राखत ही सुरक्षा प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच टाटा मोटर्सच्या नवीन कायम श्रेणीमध्ये ग्राहकांनी दाखवलेल्या विश्वासाचा सन्मान करीत कंपनी संबंधित वाहनांना दरवाढीपासून संरक्षण देईल, ज्या वाहनांना 31 ऑगस्ट 2021 पूर्वी रिटेल केले जाईल, असेही कंपनीच्या निवेदनात म्हटले आहे. आपल्या व्यवसायाच्या आणि सहाय्यक इकोसिस्टमच्या भल्यासाठी टाटा मोटर्सने अलीकडेच घोषणा केली होती की, ग्राहक, डीलर्स आणि पुरवठादारांचे हितसंबंध जपण्यासाठी आणि चांगली सेवा देण्यासाठी सविस्तर ‘बिझनेस एजिलिटी प्लान’ सुरू केला आहे.

इनपुट खर्चात वाढ झाल्यामुळे गाड्या महाग होणार

टाटा मोटर्सने यापूर्वीच गाड्यांच्या किंमती वाढवणार असल्याचे संकेत दिले होते. टाटा मोटर्सच्या पॅसेंजर व्हेईकल बिझनेस युनिटचे अध्यक्ष शैलेश चंद्रा यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना याबाबत दुजोरा दिला होता. इनपुट खर्चात वाढ झाल्यामुळे गाड्या महाग होणार असल्याचे ते म्हणाले होते. गेल्या एक वर्षात स्टील आणि मौल्यवान धातूंच्या किंमतीत खूपच वाढ झाली आहे. त्यामुळे किमती वाढल्याचा आर्थिक परिणाम गेल्या एका वर्षात आमच्या महसुलाच्या 8 ते 8.5 टक्क्यांच्या श्रेणीत आहे, असे शैलेश चंद्र यांनी र्पीटीआयशी बोलताना स्पष्ट केले होते.

कच्चा मालाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे गाड्या महागल्या

गाड्यांच्या किंमती वाढवण्यामागे कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ हे कारण असल्याचे सांगितले जाते. या वर्षभरात ब्रँडची तिसऱ्यांदा दरवाढ झाली आहे. कंपनीने यापूर्वी मे 2021 मध्ये किंमती 1.8 टक्क्यांपर्यंत वाढवल्या होत्या. यावर्षी जानेवारी महिन्यातही कारच्या किमती 26,000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आल्या होत्या. या काळात टियागो, टिगोर, नेक्सन, नेक्सन ईव्ही आणि हॅरियर यांसारख्या कारच्या किंमतीत वाढवण्यात आल्या. गेल्या महिन्यात देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीनेही आपल्या काही कारच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली होती. होंडाने या महिन्यापासून भारतातील आपल्या सर्व कारच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. (If you are also a fan of Tata cars, you must read this news; This big change will happen from today)

इतर बातम्या

गाडी भाड्याने देतो सांगायचे, नंतर परस्पर विकायचे, नवी मुंबईतील चोरीच्या गाड्या विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

केडीएमसीच्या शून्य कचरा मोहिमेचे तीन तेरा, माजी नगरसेवकासह नागरिकांचा कचरा पेटवून निषेध

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI