AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kia Seltos Facelift चे काउंटडाउन सुरू; लवकरच भारतात होणार लाँच

किआ सेल्टोसचे फेसलिफ्ट व्हर्जन लवकरच भारतात लाँच करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. हे नवीन व्हर्जन अद्यावत व आकर्षक असणार आहे. यात, अनेक नवीन फीचर्स दिसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अपकमिंग किआ सेल्टोस फेसलिफ्टमध्ये एक्सटीरिअर आणि इंटेरियर डिझाइन अतिशय आकर्षक असणार आहे.

Kia Seltos Facelift चे काउंटडाउन सुरू; लवकरच भारतात होणार लाँच
Kia Seltos Facelift चे काउंटडाउन सुरूImage Credit source: Twitter
| Edited By: | Updated on: Aug 28, 2022 | 11:41 AM
Share

कोरियन कार निर्माता कंपनी किआ (Kia) भारतातीत आपले मार्केट शेअर दिवसेंदिवस वाढविण्याच्या प्रयत्नांमध्ये आहे. कंपनी अनेक गाड्या भारतात लोकप्रिय ठरल्या आहेत. कंपनी पेट्रोल व डिझेलसह इलेक्ट्रिक सेगमेंटमध्येही आपले नशिब आजमावण्यासाठी तयार आहे. कंपनीच्या सेल्टोस, करेंन्स, किआ सोनेट आदी गाड्या या आधीही लोकप्रिय ठरल्या आहेत. दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये या कंपनीच्या कारच्या लोकप्रियतेचा आलेख झपाट्याने वाढत आहे. हे पाहता कंपनी आपली लाइनअप सतत वाढवत आहे आणि कंपनी मिड-रेंज सेगमेंटमध्ये (Mid-range segment) आपली नवीन कार लॉन्च करणार आहे, ज्याचे नाव या कारचे नाव किआ सेल्टोस फेसलिफ्ट (Kia Seltos Facelift) असेल. या कारमध्ये अनेक चांगले फीचर्स, अपडेटेड डिझाइन आणि इतर फीचर्स पाहायला मिळतील, या अपकमिंग कारबद्दल या लेखात चर्चा करणार आहोत.

काय असेल खास?

आंतरराष्ट्रीय स्तरावर, नुकतेच कंपनीने आपली Kia Seltos Facelift बंद केली आणि आता ही कार लवकरच भारतात दाखल होईल, अशी अपेक्षा आहे. ह्युंदाई क्रेटाच्या स्पर्धेत येणारी ही कार अनेक बदलांसह लॉन्च केली जाऊ शकते. यासोबतच नवीन तंत्रज्ञानही यात पाहायला मिळणार आहे. भारतात त्याची किंमत काय असेल याबद्दल कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

1) Kia च्या या नवीन कारमध्ये फ्रंट साईटने अद्ययावत एलईडी लाईट, अपग्रेटेड बंपर आणि ॲल्युमिनियम स्किड प्लेट्सचा वापर करण्यात आला आहे.

2) एक्सटीरिअर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात नवीन डिझाइन केलेले एलईडी डीआरएल लाईट्स उपलब्ध असतील. या लाईटमुळे बंपरमध्येही बदल करण्यात आले आहेत. या शिवाय कारमध्ये शार्प एलईडी टेल लॅम्पचाही वापर करण्यात आला आहे.

3) अपकमिंग कारमध्ये नवीन कार्पोरेट लोगोंचा वापर करण्यात येणार आहे. यामध्ये एलईडी आकाराचे लाईट्‌सचा वापर करण्यात येणार आहेत, यामुळे कारला स्पोर्टी लुक मिळून ती अधिक आकर्षक दिसू शकेल.

4) डॅशबोर्डबद्दल बोलायचे झाल्यास, यात युजर्सना कर्व स्क्रीनचा पर्याय उपलब्ध होणार आहे. नुकत्याच लाँच झालेल्या EV6 मध्येही अशा प्रकारच्या स्क्रीनचा वापर करण्यात आला आहे.

5) इंजिनबद्दलही अनेक बदल करण्यात आले आहेत. कारमध्ये 1.5 लीटरचे चार सिलेंडर पेट्रोल इंजिन वापरण्यात आले आहे, ते 115 PS पॉवर आणि 144 Nm च्या पीक टॉर्कसह येईल.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.