AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maruti Suzuki electric SUV : मारुतीची पहिली इलेक्ट्रीक SUV, पाहा शानदार सुविधा

Maruti Suzuki electric SUV : इलेक्ट्रिक SUV मध्ये मारुतीनेही उडी घेतली आहे.

Maruti Suzuki electric SUV : मारुतीची पहिली इलेक्ट्रीक SUV, पाहा शानदार सुविधा
दमदार इलेक्ट्रिक कार
| Updated on: Jan 11, 2023 | 6:53 PM
Share

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने नवीन वर्षांत ग्राहकांना मोठी भेट दिली आहे. कंपनीने ग्रेटर नोएडा सुरु असलेल्या ऑटो एक्स्पोमध्ये (Auto Expo 2023) पहिल्या इलेक्ट्रिक कारची झलक दाखवली. मारुती सुझुकीच्या कार मॉडेलमध्ये आतापर्यंत कोणतीच इलेक्ट्रिक कार दाखल नव्हती. या कारचे नाव eVX SUV असे देण्यात आले आहे. अर्थात हे एक कॉन्सेप्ट मॉडेल आहे. याच आधारे मारुती, इलेक्ट्रिक कार (Maruti Electric Car) तयार करणार आहे. येत्या 1-2 वर्षात मारुतीच्या इलेक्ट्रिक कार रस्त्यावर धावतील.

ईव्ही सेगमेंटमध्ये कंपनी दाखल होताच, भविष्यातील मोठ्या प्रकल्पासाठी कंपनी 10 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. त्यातून नवीन इलेक्ट्रिक वाहनं तयार करण्यात येतील. इमेजिनेक्स या प्रकल्पातंर्गत कंपनी पर्यावरणानुकूल कार निर्मितीवर लक्ष केंद्रीत करत आहे.

ऑटो एक्स्पोमध्ये दाखल इलेक्ट्रिक कारमध्ये 60kWh बॅटरी पॅक आहे. ही बॅटरी एकदा चार्ज झाल्यावर कार 550 किमीपर्यंत धावणार आहे. हे इलेक्ट्रिक एसयुव्हीचे एक छोटे आणि कॉम्पक्ट मॉडेल आहे. शहरातील मोबिलिटीसाठी ही कार उपयोगी ठरेल.

या इलेक्ट्रिक कारमध्ये मारुती सुझुकीने 4×4 अशी आसन क्षमता दिली आहे. हे मॉडेल जवळपास बलेनोवर आधारीत आहे. या कारच्या बाहेरील बाजूस कर्वी लूक देण्यात आला आहे. लांब व्हिलबेस, छोटे ओव्हरहॅग्स आणि चांगला ग्राऊंड क्लिअरंस या कारमधील जमेच्या बाजू आहेत.

Maruti eVX मध्ये केबिनचा लूक जोरदार आणि लक्झरियस आहे. या इलेक्ट्रिक कारमध्ये ग्राहकांना अडव्हान्स फिचर मिळतील. कॉन्सेप्ट eEVX SUV व्यतिरिक्त या ऑटो एक्स्पोमध्ये इतरही कार ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

या ऑटो एक्स्पोमध्ये मारुती सुझुकीच्या ग्रँट विटारा, XL6, Ciaz, Ertiga, Brezza, WagonR Flex Fuel, Baleno आणि Swift सहित 16 कारचा समावेश आहे. ग्राहकांची त्यांना पसंती मिळत आहे.

Follow Us
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू.
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात.
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!.
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक.
नागपूरच्या पिंक मॅरेथॉनमध्ये अमृता फडणवीस यांची उपस्थिती
नागपूरच्या पिंक मॅरेथॉनमध्ये अमृता फडणवीस यांची उपस्थिती.
भर उन्हात बिबट्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती
भर उन्हात बिबट्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती.
शेतकरी कर्जमाफीवरून इम्तियाज जलील यांनी सरकारला धरलं धारेवर!
शेतकरी कर्जमाफीवरून इम्तियाज जलील यांनी सरकारला धरलं धारेवर!.
आजोबा पेक्षा नातू श्रीमंत!प्रतिज्ञापत्रात पार्थ पवारांची संपत्ती किती?
आजोबा पेक्षा नातू श्रीमंत!प्रतिज्ञापत्रात पार्थ पवारांची संपत्ती किती?.