Car Discount : काय सांगता ? भारताच्या नंबर 1 कारवर मिळत आहे तब्बल 65 हजारांपर्यंत डिस्काऊंट, इथे वाचा डिटेल्स
Maruti Suzuki Swift Discount : मारुती सुझुकी स्विफ्ट ही भारतातील सर्वाधिक विकली जाणारी कार आहे. जर तुम्हाला ही कार खरेदी करायची असेल तर तुम्हाला त्यावर 65,000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकेल.

नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) जबरदस्त डिस्काउंट ऑफर आणली आहे. ही ऑटो कंपनी, देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या मारुती स्विफ्ट (Maruti Swift) या कारवर 65,000 रुपयांपर्यंतची सूट (Discount) देत आहे. मार्च 2023 च्या विक्रीच्या नोंदीनुसार, मारुती स्विफ्ट हॅचबॅकची भारतात सर्वाधिक खरेदी झाली आहे. जर तुम्हाला ही लोकप्रिय कार आवडत असेल तर तुम्ही मोठ्या सवलतीचा लाभ घेऊ शकता. 65,000 रुपयांपर्यंतच्या सवलतींसह, स्विफ्टच्या विक्रीत आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
मार्च 2023 मध्ये, मारुती सुझुकी स्विफ्टच्या एकूण 17,559 युनिट्सची विक्री झाली आहे. त्याच्या विक्रीत 28.89 टक्क्यांनी मोठी वाढ झाली आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये या कारच्या केवळ 13,623 युनिट्सची विक्री झाली होती. मारुती स्विफ्टवर उपलब्ध असलेल्या सवलतीचे संपूर्ण तपशील जाणून घेऊया.
Maruti Suzuki Swift Discount: डिस्काऊंट ऑफर्स
- मारुती स्विफ्टवर 65,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. मात्र, LXi आणि AMT आवृत्तीवर 45,000 रुपयांपर्यंत सूट देण्यात आली आहे. यामध्ये 10,000 रुपयांपर्यंत रोख सूट, 15,000 रुपयांपर्यंतचा कॉर्पोरेट बोनस आणि 20,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस असेल.
- तुमच्या माहितीसाठी, आम्ही तुम्हाला हे सांगू इच्छितो की, मारुती सुझुकी स्विफ्टच्या सीएनजी (CNG) व्हेरिअंटवरही सध्या सूट उपलब्ध आहे. स्विफ्टच्या सीएनजी व्हर्जनवर 10,000 रुपयांची रोख सूट देण्यात येणार आहे. सीएनजी मॉडेलवर कॉर्पोरेट सूट आणि एक्सचेंज ऑफर हे मात्र उपलब्ध नसतील.
- मारुती स्विफ्टच्या इतर व्हेरिअंट 30,000 रुपयांपर्यंत रोख सवलत मिळेल. याशिवाय, 15,000 रुपयांचा कॉर्पोरेट बोनस आणि 20,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील मिळेल. अशा प्रकारे, कंपनी एकूण 65,000 रुपयांची सूट देत आहे.
- मारुती सुझुकी स्विफ्टबद्दल सांगायचे झाले तर, गेल्या महिन्यात या कारला सर्वाधिक पसंती मिळाली आहे. त्याची पुढील आवृत्ती 2024 मध्ये लॉन्च केली जाऊ शकते. नेक्स्ट जनरेशन मॉडेल 1.0 लिटर 3 सिलेंडर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनसह ऑफर केले जाऊ शकते.
- मारुती फ्राँक्सप्रमाणेच या स्विफ्टची पुढील आवृत्ती 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन किंवा 6 स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअर बॉक्ससह बाजारात आणली जाऊ शकते. मारुती सुझुकी स्विफ्टची एक्स-शोरूम किंमत 5.99 लाख रुपयांपासून सुरू होते.
