पुढील महिन्यात लाँच होणार Nissan Magnite CNG कार, एक किलो CNG मध्ये देणार इतकं माइलेज
ग्राहकांमध्ये सीएनजी कार आता खूप लोकप्रिय झाली आहे. म्हणूनच ऑटो कंपन्यांनी त्यांच्या लोकप्रिय कारचे सीएनजी मॉडेल लाँच करण्यास सुरुवात केली आहे. तुमच्यासाठी, निसान आता त्यांच्या लोकप्रिय एसयूव्हीचे सीएनजी व्हर्जन लाँच करणार आहे, चला जाणून घेऊया नवीन सीएनजी व्हेरिएंट कधी लाँच होण्याची अपेक्षा आहे?

दिवसेंदिवस कारची मागणीत वाढ होत आहे. त्यातच सीएनजी कारची मागणी अधिक वाढू लागली आहे, म्हणूनच भारतीय ऑटो कंपन्यानी आता त्यांच्या लोकप्रिय मॉडेल्सच्या सीएनजी व्हर्जन देखील लाँच करत आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी, Nissan या कार कंपनीने रेनॉल्ट किगर, क्विड आणि ट्रायबरचे सीएनजी मॉडेल लाँच केले होते आणि आता कंपनी त्यांच्या लोकप्रिय एसयूव्ही मॅग्नाइटचे सीएनजी मॉडेल लाँच करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे Nissan Magnite CNG ही कार कधी लाँच होऊ शकते या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता आहे. चला जाणून घेऊयात…
निसान मॅग्नाइटच्या सीएनजी मॉडेलच्या लाँचिंगबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. अलीकडेच एका मीडिया रिपोर्टच्या माहिती नुसार या एसयूव्हीचे सीएनजी व्हर्जन पुढील महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये ग्राहकांसाठी लाँच केले जाऊ शकते. कंपनी या कारमध्ये डीलर लेव्हल अॅक्सेसरी किट म्हणून सीएनजी बसवणार आहे.
Nissan Magnite CNG मायलेज
ऑटोकारच्या अहवालानुसार, निसान मॅग्नाइटच्या मॅन्युअल ट्रान्समिशनसह 1.0 लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनमध्ये सीएनजी किट बसवण्यात येईल. तसेच मिळालेल्या अहवालानुसार ही एसयूव्ही एक किलो सीएनजीमध्ये 18 ते 22 किमी मायलेज देईल. सध्या या एसयूव्हीचे इंजिन सीएनजीवर किती पॉवर आणि टॉर्क जनरेट करेल याची माहिती समोर आलेली नाही.
सीएनजी किटची किंमत किती असेल?
Renault Kiger च्या सीएनजी किटसाठी ग्राहकांना 79,500 रुपये खर्च करावे लागतील. मॅग्नाइट सीएनजी किटसाठीही तेवढीच रक्कम आकारली जाईल अशी अपेक्षा आहे. Uno Minda ग्रुपकडून डीलरला सीएनजी किट पुरवले जाणार आहे.
वॉरंटी डिटेल्स
निसान मॅग्नाइट सीएनजीच्या या कारची तुम्हाला तीन वर्षांची किंवा १,००,००० लाख किलोमीटरची वॉरंटी देखील देण्यात येणार आहे. जर कारला सांगितल्या प्रमाणे तीन वर्ष पूर्ण होण्याआधी १,००,००० किलोमीटर जास्त चालवल्यास वॉरंटी संपेल. याशिवाय, सीएनजी किटवर एक वर्षाची वॉरंटी देखील दिली जाईल, डीलर्सना ग्राहकांच्या आरसीवर सीएनजी डिटेल्स अपडेट केले आहेत याची खात्री करावी लागेल.
