टाटा मोटर्सची ईयर-एंड ऑफर, Tiago ते Safari पर्यंतच्या गाड्यांवर 65,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट

वर्ष 2021 आता संपत आहे आणि अशा परिस्थितीत, भारतातील अनेक ऑटोमोबाईल निर्मात्या कंपन्या त्यांच्या वाहनांवर वर्षअखेरीस सूट देत आहेत. टाटा मोटर्सने त्यांच्या लाइनअपमधील निवडक वाहनांवर काही आकर्षक सवलती आणि डील्स देऊ केल्या आहेत.

टाटा मोटर्सची ईयर-एंड ऑफर, Tiago ते Safari पर्यंतच्या गाड्यांवर 65,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट
Tata-Altroz-EV
Follow us
| Updated on: Dec 17, 2021 | 4:39 PM

Year Ender 2021: वर्ष 2021 आता संपत आहे आणि अशा परिस्थितीत, भारतातील अनेक ऑटोमोबाईल निर्मात्या कंपन्या त्यांच्या वाहनांवर वर्षअखेरीस सूट देत आहेत. टाटा मोटर्सने त्यांच्या लाइनअपमधील निवडक वाहनांवर काही आकर्षक सवलती आणि डील्स देऊ केल्या आहेत. Tata Motors या डिसेंबरमध्ये त्यांच्या प्रवासी वाहनांवर जास्तीत जास्त 65,000 रुपयांपर्यंतच्या डील्स आणि बेनिफिट्स देत आहे. (Tata Motors Year End 2021 sale : Discounts offer on Tiago Nexon Harrier Safari up to 65000 rupees)

तुम्ही जर नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही खाली दिलेल्या ऑफर पाहा. Tata Tiago वर 3,000 रुपयांच्या कॉर्पोरेट डिस्काउंटसह 10,000 रुपयांचा रोख डिस्काऊंट उपलब्ध आहे. या मिनी हॅचबॅकवर 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील उपलब्ध आहे. Tiago NRG वर कोणतीही ऑफर उपलब्ध नाही.

Tata Tigor वर 10,000 रुपयांचा रोख डिस्काऊंट

टाटा टिगॉरवर 10,000 रुपयांची रोख सूट दिली जात आहे. कारवर 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट दिली जात आहे. तथापि, Tigor EV वर कोणतीही सूट किंवा ऑफर उपलब्ध नाही. तसेच, अलीकडेच लाँच झालेल्या Tata Punch आणि Altroz ​​वरदेखील कोणत्याही अधिकृत ऑफर्स देण्यात आलेल्या नाहीत.

Tata Nexon वर शानदार डिस्काउंट

Tata Nexon च्या पेट्रोल व्हेरियंटवर 3,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस उपलब्ध आहे तर त्याच्या डिझेल व्हेरियंटवर (डार्क एडिशन व्हेरिएंट वगळून) 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आहे. याशिवाय यावर 5,000 रुपयांची कॉर्पोरेट सूटही दिली जात आहे.

Tata Nexon (Nexon EV) चं इलेक्ट्रिक व्हर्जन ‘XZ+ Lux’ व्हेरिएंटवर 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि ‘XZ+’ ट्रिमवर 5,000 रुपयांचा डिस्काऊंट मिळत आहेत. या महिन्यात या इलेक्ट्रिक SUV वर कोणतीही रोख किंवा कॉर्पोरेट सूट उपलब्ध नाही.

Tata Harrier आणि Tata Safari वर 65,000 रुपयांपर्यंतच्या डिल्स

टाटा हॅरियरवर 20,000 रुपयांची रोख सूट मिळत आहे. यासोबतच या कारवर 40,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट देण्यात येत आहे. टाटा सफारीवर देखील अशाच ऑफर दिल्या जात आहेत. यामध्ये 5,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट आणि 40,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 20,000 रुपयांची रोख सवलत समाविष्ट आहे.

इतर बातम्या

Mileage Cars : सेलेरियो ते टाटा पंच.., 2021मध्ये लॉन्च झालेल्या ‘या’ आहेत जबरदस्त टॉप पेट्रोल कार

NCAP क्रॅश टेस्टमध्ये Hyundai Verna सपशेल नापास, कारला 0-स्टार सेफ्टी रेटिंग

रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट हरवलंय? जाणून घ्या डुप्लिकेट RC बनवण्याची ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धत

(Tata Motors Year End 2021 sale : Discounts offer on Tiago Nexon Harrier Safari up to 65000 rupees)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.