AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Glanza मध्ये काही नवीन बदल, सुरक्षितता वाढवली, जाणून घ्या

टोयोटाने सेफ्टी आणि स्टाइलिंग वाढवण्यासाठी आपल्या प्रीमियम हॅचबॅक Glanza मध्ये काही नवीन फीचर्स जोडले आहेत. कंपनीने ग्राहकांसाठी नवे प्रेस्टीज पॅकेजही आणले आहे.

Glanza मध्ये काही नवीन बदल, सुरक्षितता वाढवली, जाणून घ्या
glanza
| Edited By: | Updated on: Jul 16, 2025 | 3:52 PM
Share

टोयोटा किर्लोस्कर मोटर (TKM) ने आपल्या लोकप्रिय हॅचबॅक टोयोटा Glanza मध्ये काही नवीन बदल केले आहेत. सुरक्षितता वाढवण्यासाठी आणि ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी कंपनीने सर्व व्हेरियंटमध्ये 6 एअरबॅग स्टँडर्ड केल्या आहेत, तर नवीन प्रेस्टीज पॅकेज देखील सादर करण्यात आले आहे.

या पॅकेजमुळे कार आणखी स्टायलिश आणि कम्फर्टेबल होईल. ग्राहकांना चांगला अनुभव देण्यासाठी हे बदल करण्यात आल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. ही कार चांगली दिसते आणि मायलेजही अप्रतिम आहे. आता 6 एअरबॅग्समुळे ती आणखी सुरक्षित झाली आहे.

नव्या प्रेस्टीज पॅकेजची ठळक फीचर्स

टोयोटा Glanza चे नवे प्रेस्टीज पॅकेज एक अ‍ॅक्सेसरी बंडल आहे. यामुळे कार आणखी स्टायलिश आणि कम्फर्टेबल दिसेल. तसेच दैनंदिन वापरात ही सुविधा अधिक सोयीची ठरणार आहे. हे पॅकेज थोड्या काळासाठीच उपलब्ध असेल. हे खास पॅकेज तुम्ही 31 जुलै 2025 पर्यंतच खरेदी करू शकाल.

Glanza च्या प्रेस्टीज पॅकेजमध्ये प्रीमियम डोअर व्हिझर, बॉडी साइड मोल्डिंग आणि रियर लॅम्प गार्निशचा समावेश आहे. इतर फीचर्समध्ये बाहेरील रियर व्ह्यू मिरर आणि फेंडर्ससाठी क्रोम गार्निश, रियर स्किड प्लेट्स, लाइटेड डोअर सिल्स आणि लोअर ग्रिल गार्निश यांचा समावेश आहे. नव्या फीचर्ससह टोयोटा Glanza ची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 6.90 लाख रुपये आहे.

Glanza च्या 2 लाख युनिट्सची विक्री

टोयोटा Glanza ने भारतात सहा वर्ष पूर्ण केली असून 2 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री झाली आहे. प्रीमियम हॅचबॅकमध्ये 1.2 लीटर के-सीरिज पेट्रोल इंजिन आहे जे ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशनसह 22.94 किमी प्रति लीटर मायलेज देते. तर सीएनजी पर्यायात याचे मायलेज 30.61 किमी प्रति किलो आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर या कारमध्ये 9 इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टिम, हेड-अप डिस्प्ले, 360 डिग्री कॅमेरा, टोयोटा आय-कनेक्टचे 45 हून अधिक कनेक्टेड फीचर्स आहेत.

आकर्षक डिझाइनची कार

टोयोटा Glanza ची रचना शहरी जीवनशैलीनुसार करण्यात आली आहे. एक्सटीरियरबद्दल बोलायचे झाले तर यात टोयोटाचे सिग्नेचर ग्रिल, एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प्स आणि 16 इंचाचे अलॉय व्हील्स आहेत. स्पोर्टिंग रेड, इंस्टा ब्लू, सिल्व्हर, गेमिंग ग्रे आणि कॅफे व्हाईट या दोन रंगांमध्ये तसेच ड्युअल टोन इंटिरिअरमध्ये उपलब्ध आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने यात 6 एअरबॅग, व्हेइकल स्टॅबिलिटी कंट्रोल, हिल होल्ड असिस्ट आणि मजबूत टीईसीटी बॉडी स्ट्रक्चर देण्यात आले आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.