AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rail Budget 2025: सर्वसामान्यांनाही करता येणार लग्झरी ट्रेनचा प्रवास, ब्‍लू प्रिंट तयार, रेल्वेमंत्र्यांनी दिली माहिती

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, वंदे भारत स्लीपर-चेअर कार, अमृत भारत आणि नमो भारत 350 ट्रेनची निर्मिती सुरु आहे. त्याला अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे या ट्रेनची निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. या गाड्या मागील अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या गाड्यांपेक्षा वेगळ्या आहेत.

Rail Budget 2025: सर्वसामान्यांनाही करता येणार लग्झरी ट्रेनचा प्रवास, ब्‍लू प्रिंट तयार, रेल्वेमंत्र्यांनी दिली माहिती
| Updated on: Feb 02, 2025 | 4:49 PM
Share

Rail Budget 2025: देशात वंदे भारत ट्रेन आल्यानंतर तिची मागणी वाढली आहे. लग्झरी आणि सेमी हायस्पीड प्रकारात ही ट्रेन आहे. परंतु या ट्रेनचे तिकीट दर जास्त आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना तिचा प्रवास करता येत नाही. परंतु लवकरच देशातील सर्वसामान्य जनताही लक्झरी ट्रेनने प्रवास करणार आहे. रेल्वे मंत्रालय विशेष तसेच सामान्य गाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी आधुनिक सुविधांनी सुसज्ज गाड्या चालवणार आहे. यामुळे सर्व वर्गातील लोक आरामात आणि सुरक्षितपणे प्रवास करू शकतील. रेल्वे मंत्रालयाने यासाठी ब्लू प्रिंट तयार केली आहे. त्याला अर्थसंकल्पात मंजुरी मिळाल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, सध्या सर्वात आलिशान ट्रेन ही वंदे भारत एक्सप्रेस आहे. त्यामुळेच या ट्रेनला देशात सर्वाधिक मागणी आहे. आता त्याचे स्लीपर व्हर्जनही लवकर सुरु होणार आहे. यामुळे लांबचा प्रवास करणारे लोकांना त्याचा फायदा होईल. या ट्रेनची संख्याही वाढवण्यात येत आहे.

अमृतभारत लग्झरी ट्रेनची चाचणी पूर्ण

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, सर्वसामान्यांसाठी वंदेभारतसारख्या सुविधा असलेल्या अमृतभारत ही ट्रेन आहे. या ट्रेनची एक वर्षापासून चाचणी सुरु होती. आता ती पूर्ण झाली आहे. या श्रेणीतील दोन गाड्या गेल्या वर्षी धावल्या होत्या. आता अमृतभारत ट्रेनची संख्या वाढवली जात आहे. तसेच नमो भारत ट्रेनची दोन प्रमुख शहरांदरम्यानची चाचणी यशस्वी झाली आहे. ही ट्रेन गुजरातमधील गुज ते अहमदाबाद दरम्यान चालवली जात आहे. या ट्रेनची संख्याही वाढवली जाणार आहे आहे. या ट्रेनमुळे मोठ्या शहरांमधून जवळच्या शहरांमध्ये जाणे सोपे होणार आहे.

350 लग्झरी ट्रेन तयार होणार

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, वंदे भारत स्लीपर-चेअर कार, अमृत भारत आणि नमो भारत 350 ट्रेनची निर्मिती सुरु आहे. त्याला अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे या ट्रेनची निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. या गाड्या मागील अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या गाड्यांपेक्षा वेगळ्या आहेत. अमृत भारतच्या 100 रेल्वे गाड्या, नमो भारतच्या 50 रेल्वे गाड्याआणि 200 वंदे भारत (स्लीपर आणि चेअरकार) यांचा समावेश आहे. या गाड्या दोन ते तीन वर्षांत तयार होतील.

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....