PM Awas Yojana 2021: पीएम आवासांतर्गत 3.61 लाख घरांना मंजुरी; ‘असा’ करा अर्ज

पंतप्रधान आवास योजनेंतर्गंत केंद्र सरकारने शहरी भागांमध्ये तब्बल 3.61 लाख घरांच्या निर्मितीसाठी परवानगी दिली आहे. ज्यांच्या नावावर पूर्वचे एखादे घर नाही, अशा व्यक्तींना घर खरेदीसाठी पीएम आवास योजनेंतर्गंत सबसीडी देण्यात येते.

PM Awas Yojana 2021: पीएम आवासांतर्गत 3.61 लाख घरांना मंजुरी; 'असा' करा अर्ज


नवी दिल्ली: PM Awas Yojana 2021: पंतप्रधान आवास योजनेंतर्गंत केंद्र सरकारने शहरी भागांमध्ये तब्बल 3.61 लाख घरांच्या निर्मितीसाठी परवानगी दिली आहे. ज्यांच्या नावावर पूर्वचे एखादे घर नाही, अशा व्यक्तींना घर खरेदीसाठी पीएम आवास योजनेंतर्गंत सबसीडी देण्यात येते. केंद्रीय मान्यता व संनियंत्रण समितीच्या 56 व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला  आहे.

केंद्रीय मान्यता व संनियंत्रण समितीच्या बैठकीत निर्णय

मंगळवारी केंद्रीय मान्यता व संनियंत्रण समितीची बैठक दिल्लीमध्ये पार पडली. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे. दरम्यान याच बैठकीमध्ये शहरी भागात  3.61 लाख घरांच्या निर्मितीसाठी देखील परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की, पंतप्रधान आवास योजना ही एक केंद्राची महत्त्वाची योजना आहे. यो योजनेतंर्गंत शहरी व ग्रामीण भागामध्ये घरी खरेदीसाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येते. मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये पीएम आवास योजनेंतर्गत आणखी 3.61 लाख घरांच्या निर्मितीला परवानगी देण्यात आली आहे.

योजनेच्या लाभासाठी ‘असा’ करा अर्ज

सर्व प्रथम तुम्ही तमच्या मोबाईलवर पीएम आवासचे अ‍ॅप डाऊनलोड करा

अ‍ॅप डाऊनलोड झाल्यानंतर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर करा

मोबाईल नंबर लिंक झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल

हा ओटीपी तुम्हाला अ‍ॅपमध्ये सबमीट करावा लागेल

ओटीपी टाकल्यानंतर पुढील आवश्यक ती माहिती भरा

माहिती भरल्यानंतर तुमची या योजनेतंर्गत नोंद होते

नोंदणी केलेल्या व्यक्तीमधून काही व्यक्तींची निवड होते

निवड झालेल्या व्यक्तींची माहिती ही या योजनेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाते

कोणाला मिळेल लाभ?

ज्या व्यक्तीच्या नावावर अद्याप एकही घर नाही, अशा व्यक्तीला घर खरेदी करायचे असल्यास त्याला या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी लागेल. सर्व कागद पत्रांची पूर्तता केल्यानंतर कागदपत्रांचे व्हेरिफिकेशन होते.  सर्व कागदपत्रे वैध असल्यास या योजनेचा लाभ मिळू शकतो. ज्यांच्या नावावर पूर्वीचे घर आहे, अशा व्यक्तींना घर खरेदीच्या अनुदानासाठी अपात्र ठरवण्यात येते.

संबंधित बातम्या 

इलेक्ट्रीक वाहन निर्मिती प्रोत्साहन; पेट्रोल,डिझेलच्या गाड्यांवर बंदी नाही, गडकरींचे स्पष्टीकरण

साखर उद्योगाला दिलासा; 303 मेट्रिक टन साखरेच्या निर्यातीला परवानगी

भारतीय रेल्वे कात टाकतेय! आता तुम्ही ट्रेनही घेऊ शकता भाड्यानं, रेल्वे मंत्र्यांची भारत गौरवची घोषणा

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI