Repo affect Home sales | अनेकांच्या इमल्याच्या स्वप्नाला सुरुंग, व्याजदर वाढल्याने घर खरेदीला घरघर? काय म्हणतात तज्ज्ञ

Repo affect Home sales | रिझर्व्ह बँकेच्या रेपो दरवाढीचा परिणाम रिअल इस्टेटवर दिसून येणार आहे. बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांचे काय आहे मत, जाणून घेऊयात

Repo affect Home sales | अनेकांच्या इमल्याच्या स्वप्नाला सुरुंग, व्याजदर वाढल्याने घर खरेदीला घरघर? काय म्हणतात तज्ज्ञ
घर खरेदी मंदावणार?Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 06, 2022 | 11:35 AM

Repo affect Home sales | शुक्रवारी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI)मौद्रिक नीती समितीने रेपो दरात (Repo Rate) वाढीचा निर्णय घेतल्याने कर्ज महागणार हे निश्चित झाले होते. महागाई आटोक्यात आणण्यासाठी केंद्रीय बँकेने हे पाऊल उचलले आहे. बँकेने रेपो दरात 0.50 टक्क्यांची वाढ केली. त्यामुळे रेपो दर कोविड काळातील 5.40 टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. रेपो दरवाढीमुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. त्याचा सर्वाधिक फटका सामान्य माणसाला बसतो. रिअल इस्टेट तज्ज्ञांच्या मते, याचा परिणाम बाजारावर लागलीच दिसून येईल. कर्ज महागल्याने (Expensive Debt) ग्राहकांच्या क्रयशक्तीला आपोआप पायबंद बसेल. ग्राहक कर्ज घेताना कचरतील. एवढेच नाही तर घर घेण्याच्या विचारात असलेले नागरीक घर घेण्याची योजना काही दिवसांकरीता पुढे ढकलू शकतात, असे मत रिअल इस्टेट (Real Estate) क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. असे जर झाला तर त्याचा परिणाम पुन्हा आर्थिक सुधारणांवर पडणार हे स्पष्ट आहे.

रेपो दरातील वाढीचा थेट परिणाम परवडणाऱ्या आणि मध्यम उत्पन्न गटातील घरांच्या विक्रीवर थोडाफार दिसून येईल, असे रिअल इस्टेट कंपन्यांचे मत आहे. रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या पतधोरण आढाव्यात सलग तिसऱ्यांदा धोरणात्मक दरात वाढ केली आहे. एकूणच 2022-23 मध्ये आतापर्यंत रेपो दरात 1.4 टक्के वाढ करण्यात आली आहे.

काय आहे तज्ज्ञांचे मत

रेपो दरवाढीबाबत रिअल इस्टेट कन्सल्टन्सी कंपनी अनारॉकचे अध्यक्ष अनुज पुरी म्हणाले, ‘पॉलिसी रेटमध्ये 0.50 टक्के वाढ निश्चितच अधिक आहे. यामुळे गृहकर्जे अधिक महाग होतील. यासह गृहकर्जावरील सर्वात कमी व्याजदराचे दिवस ही संपले आहेत. कोरोना काळात बँकांनी व्याजदर कमी केल्याने घराच्या विक्रीने चांगला जोर पकडला होता. व्याजदर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले होते, असे त्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

‘कोलियर्स इंडिया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) रमेश नायर यांनीही मत मांडले, अनेक बँकांनी यापूर्वीच गृहकर्जाचे दर वाढवण्यास सुरुवात केली असून, हा कल असाच कायम राहण्याची अपेक्षा आहे. ‘गृहकर्जाच्या उच्च दरामुळे घर खरेदी करण्याची इच्छा असणाऱ्यांनी विचार करायला सुरुवात केली आहे. परवडणाऱ्या आणि मध्यम गृहनिर्माण श्रेणीत याचा परिणाम दिसून येणार नाही. परंतू हायफाय आणि लक्झरीयस श्रेणीतील घरांवर याचा मोठा परिणाम दिसून येईल.

नाइट फ्रँक इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल यांच्या मते, रेपो दरातील तिसऱ्या दरवाढीमुळे गृह खरेदीदार मागे हटतील. घर खरेदीवर त्याचा परिणाम दिसू शकतो. जेएलएल इंडियाचे मुख्य अर्थतज्ज्ञ सामंतक दास यांनी सांगितले की, गृह कर्जाच्या दरात आणखी 0.30 ते 0.40 टक्क्यांनी वाढ केल्यास निवासी क्षेत्रातील विक्री मंदावू शकते.

क्रेडाई एनसीआरचे अध्यक्ष मनोज गौर म्हणाले, ‘आरबीआयने रेपो रेटमध्ये 0. 50 टक्के वाढ केली आहे. कोविड पूर्व काळातील रेपो रेट दराच्या पातळीवर या बदलाने आणून सोडले आहे. पण यामुळे गृह खरेदीवर मोठा परिणाम होईल असे दिसून येत नाही. गृहनिर्माण क्षेत्राबरोबरच बँकांनी गृहकर्जाच्या व्याजदरात केलेली प्रत्यक्ष वाढ योग्य ठरणार असल्याने रिटेल क्षेत्राचीही भरभराट होईल, असा दावा त्यांनी केला.

Non Stop LIVE Update
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.