ICICI Bank-PNB Rate | आयसीआयसीआय आणि पीएनबीचा ग्राहकांना झटका, व्याजदर वाढले, कर्ज झाले महाग

ICICI Bank-PNB Rate | भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी रेपो दरात वाढ केल्यानंतर लागलीच आयसीआयसीआय आणि पीएनबी बँकेने ही व्याजदरात वाढ केली आहे.

ICICI Bank-PNB Rate | आयसीआयसीआय आणि पीएनबीचा ग्राहकांना झटका, व्याजदर वाढले, कर्ज झाले महाग
व्याजदर वाढला
Image Credit source: सोशल मीडिया
कल्याण माणिकराव देशमुख

|

Aug 06, 2022 | 10:47 AM

ICICI Bank-PNB Rate | शुक्रवारी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI)मौद्रिक नीती समितीने रेपो दरात (Repo Rate) वाढीचा निर्णय घेतल्याने कर्ज महागणार हे निश्चित झाले होते. महागाई आटोक्यात आणण्यासाठी केंद्रीय बँकेने हे पाऊल उचलले आहे. बँकेने रेपो दरात 0.50 टक्क्यांची वाढ केली. त्यामुळे रेपो दर कोविड काळातील 5.40 टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. या निर्णयानंतर लागलीच खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय (ICICI Bank)आणि सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेने (Punjab National Bank) व्याजदरात वाढीचा निर्णय जाहीर केला. विशेष म्हणजे 5 ऑगस्ट 2022 रोजीपासूनच या दोन्ही बँकेचा व्याजदर प्रभावी राहणार असल्याचे बँकांनी स्पष्ट केले. त्यामुळे ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. या दोन्ही बँकांच्या ग्राहकांना आता वाढीव व्याजदराने कर्ज (Loan) उपलब्ध होईल. या दोन बँकांनी व्याजदर वाढीचा निर्णय घेतल्यानंतर आता इतर बँकांही तातडीने व्याजदर वाढीचा निर्णय घोषीत करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कर्ज किती महागणार?

ICICI बँकेने व्याजदरवाढी विषयीची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार, ICICI बँक बाह्य मानक कर्ज दर म्हणजेच बाह्य बेंचमार्क आधारित कर्ज दर (I-EBLR) RBI च्या रेपो दरावर आधारीत आहेत. केंद्रीय बँकेच्या धोरणानुसार त्यात बदल होतो. रेपो दरात वाढ झाल्याने आयसीआयसीआय बँकेने कर्जावरील व्याज वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. I-EBLR आता वार्षिक 9.10 टक्के असून तो 5 ऑगस्ट 2022 पासून लागू असेल असे बँकेने दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेनेही दर वाढीबाबत माहिती दिली. त्यानुसार, आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर, 8 ऑगस्टपासून रेपो संबंधित कर्ज दर (RLLR) 7.40 टक्क्यांवरून 7.90 टक्के करण्यात आला आहे. हा वाढीव दर 8 ऑगस्ट 2022 पासून लागू असेल. रेपो दरावर कर्जाचे दर अवलंबून असतात. रेपोमधील कोणताही बदल झाला की त्यानुसार दर वाढतो किंवा कमी होतो. बँका त्याआधारे कर्जावरील व्याजदरात बदल करतात.

हे सुद्धा वाचा

रेपो दरात अर्धा टक्का वाढ

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने शुक्रवारी किरकोळ महागाई नियंत्रणासाठी रेपो दरात 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.4 टक्के केला. चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या पतधोरण आढाव्यात, नीती धोरणानुसार रेपो रेटमध्ये सलग तिसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. एकूणच, 2022-23 मध्ये रेपो दरात आतापर्यंत 1.4 टक्के वाढ झाली आहे. हा बदल कोविड काळातील रेपो दराच्या आसपास पोहचला आहे. फेब्रुवारी 2020 मध्ये रेपो दर 5.15 टक्के होता. त्याच वेळी, चलनविषयक धोरण समितीने (MPC) येत्या काही दिवसांत पुन्हा रेपो दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा परिणाम आता सर्वत्र दिसून येईल.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें