अदानी विद्यापीठाचे ‘नवदीक्षा 2025’ सह इंडस्ट्री रेडी क्लस्टरचे उद्घाटन
अदानी विद्यापीठाने 'नवदीक्षा २०२५'या शैक्षणिक प्रेरण उपक्रमाचे उद्घाटन केले आहे, ज्यामध्ये त्यांच्या प्रमुख एकात्मिक बीटेक + एमबीए/एमटेक कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांच्या नवीन गटाचे स्वागत करण्यात आले आहे.

अहमदाबाद: अदानी विद्यापीठाने ‘नवदीक्षा २०२५’या शैक्षणिक प्रेरण उपक्रमाचे उद्घाटन केले आहे, ज्यामध्ये त्यांच्या प्रमुख एकात्मिक बीटेक + एमबीए/एमटेक कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांच्या नवीन गटाचे स्वागत करण्यात आले आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला आयोजित ‘नवदीक्षा २०२५’ उपक्रमाने भारतातील तरुणांना कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), शाश्वतता आणि राष्ट्र उभारणीने प्रेरित झालेल्या नवीन औद्योगिक युगासाठी सज्ज करण्यासाठी अदानी विद्यापीठ सज्ज झाले आहे.
या समारंभाच्या उद्घाटनावेळी भाषण करताना विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा.सुनील झा यांनी “भौतिक एआय” च्या युगात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणिताचे वाढते महत्त्व सांगितले. प्राध्यापक झा यांनी विद्यार्थ्यांना कोडिंगच्या पलीकडे पाहण्याचे आणि वास्तविक जगाचे यांत्रिकी समजून घेण्याचे आवाहन केले. “जसजसे एआय रोबोटिक्स आणि ऑटोमेशनशी एकत्रित होत जाईल, तसतसे भौतिक कायदे समजून घेणे ही यशाची नवीन परिभाषा बनेल”, असे ते म्हणाले.
प्रसिद्ध व्यवस्थापन सल्लागार आणि हार्वर्ड विद्यापीठाचे माजी विद्यार्थी डॉ.राम चरण यांनी विविध खंडांमधील त्यांच्या सहा दशकांच्या अनुभवाबद्दल आपले विचार मांडले. “तुमची देवाने दिलेली प्रतिभा शोधा, वचनबद्धतेने तिचा पाठलाग करा आणि कधीही शिकणे थांबवू नका”, असे ते म्हणाले. त्यांनी विद्यार्थ्यांना दररोज चिंतन करण्याचा, सतत प्रश्न विचारण्याचा आणि विद्यापीठाला उद्देश आणि आनंदाच्या प्राप्तीचे केंद्र मानण्याचा सल्ला दिला.
एकात्मिक बी.टेक+एमबीए/एम.टेक कार्यक्रम सरकारच्या राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) २०२० च्या अनुषंगाने डिझाईन केले आहेत. ते तंत्रज्ञान, ऊर्जा आणि पायाभूत सुविधांमध्ये वास्तविक जगात वापरल्या जाणाऱ्या अनुप्रयोगांमध्ये सखोल वैज्ञानिक कौशल्ये, बहुविद्याशाखीय शिक्षण आणि नेतृत्वाला प्रोत्साहन देण्याच्या विद्यापीठाच्या तत्त्वांचे देखील प्रतिबिंबित करते.
अदानी विद्यापीठाचे प्रोव्होस्ट डॉ. रवी पी.सिंग यांनी भारतातील विद्यार्थ्यांचे स्वागत केले आणि संगणक विज्ञान ते ऊर्जा अभियांत्रिकीपर्यंतचे एकात्मिक कार्यक्रम त्यांना वास्तविक जगात परिणामांसाठी तयार करतात यावर भर दिला. “तुमचे लक्ष एआय, शाश्वतता किंवा पायाभूत सुविधांवर असले तरी, तुम्ही योग्य वेळी योग्य ठिकाणी आहात,” असे ते म्हणाले. त्यांनी विद्यार्थ्यांना इतरांचे आंधळेपणाने अनुसरण करण्याऐवजी जीवनात स्वतःचा मार्ग तयार करण्याचे आणि शिक्षणाला राष्ट्र उभारणीचे कार्य म्हणून पाहण्याचे आव्हानही केले.
अदानी ग्रुपचे मुख्य परिवर्तन अधिकारी (सीटीओ) सुदीप्ता भट्टाचार्य यांनी भविष्यासाठी एक रोमांचक रोडमॅप सादर केला. त्यांनी एआय क्रांतीला मानवी आकलनाला आव्हान देणारी पहिला औद्योगिक बदल म्हणून संबोधले आणि विद्यार्थ्यांना धाडसी आणि जिज्ञासू नवोन्मेषक बनण्याचे आवाहन केले. “मशीन्स आता विचार करू शकतात. परंतु केवळ मानवच विश्वास ठेवू शकतात, सहयोग करू शकतात आणि हेतुपुरस्सर निर्मिती करू शकतात,” असेही ते म्हणाले. भट्टाचार्य यांनी तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांमध्ये अदानी ग्रुपची सुरू असलेली $90 अब्ज गुंतवणूक भविष्यातील व्यावसायिकांसाठी एक मोठी संधी असल्याचे त्यांनी सांगितले.
