2000 Rupees Note : 2000 रुपयानंतर आता 500 रुपयांच्या नोटांनी बिघडवला ‘खेळ’! आरबीआयची वाढली अशी डोकेदुखी

2000 Rupees Note : 2000 रुपयानंतर आता 500 रुपयांच्या नोटांनी आरबीआयच्या छातीत धस्स झाले आहे. आता नेमकं झाल आहे, ते पाहुयात..

2000 Rupees Note : 2000 रुपयानंतर आता 500 रुपयांच्या नोटांनी बिघडवला 'खेळ'! आरबीआयची वाढली अशी डोकेदुखी
Follow us
| Updated on: May 30, 2023 | 7:53 PM

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 19 मे रोजी 2000 रुपयांच्या नोटा (2000 Notes) माघारी बोलविण्याची घोषणा केली. त्यासाठी नागरिकांना चार महिन्यांची मुदत दिली. 2000 रुपयांच्या नोटानंतर आता 500 रुपयांच्या (Rs 500 Notes) नोटांनी आरबीआयचे टेन्शन वाढवले आहे. तुम्ही म्हणाल आता हे कसं शक्य आहे. गुलाबी नोटांची साठेबाजी झाल्याने त्याविरोधात आरबीआयने हे पाऊल टाकलं होतं. पण आता 500 रुपयांच्या नोटांमुळे अर्थव्यवस्थेवर कोणतं संकट कोसळलं असं तुम्हाला वाटत असेल. पण आरबीआयच्या छातीत या नोटांमुळे धस्स झालं आहे.

काय सांगतो अहवाल या नोटांनी आरबीआयच्या अडचणीत वाढ केली आहे. 500 रुपयांच्या नोटा आरबीआयसाठी डोकेदुखी ठरल्या आहेत. आरबीआयने वार्षिक अहवालात 500 रुपयांच्या नकली नोटांप्रकरणी (Fake 500 note) मोठा खुलासा केला आहे. आरबीआयच्या वार्षिक अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2023 मध्ये 500 रुपयांच्या जवळपास 91,110 नकली नोटा पकडण्यात आल्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या 14.6% जादा आहे. 500 रुपयांच्या नकली नोटांमध्ये सातत्याने तेजी दिसत आहे.

इतक्या सापडल्या नकली नोटा

हे सुद्धा वाचा
  1. आर्थिक वर्ष 2021 मध्ये 500 रुपयांच्या 39,453 नकली नोटा
  2. आर्थिक वर्ष 2022 मध्ये 500 रुपयांच्या 76,669 नकली नोटा
  3. आर्थिक वर्ष 2023 मध्ये 91,110 नकली नोटा मिळाल्या

2000 रुपयांच्या नकली नोटा 2000 रुपयांच्या नकली नोटा सापडल्या. या गुलाबी नोटांची संख्या 28% घसरुन 9,806 इतकी राहिली. आरबीआयच्या वार्षिक रिपोर्टनुसार, बँकिंग क्षेत्रात पकडण्यात आलेल्या नकली नोटांची एकूण संख्या 2,25,769 राहिली. गेल्या वर्षी 2,30,971 इतक्या नकली नोटा सापडल्या होत्या. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 20 रुपयांच्या नकली नोटांमध्ये 8.4% वाढ झाली. 10 रुपये, 100 रुपये आणि 2000 रुपयांच्या नकली नोटांमध्ये घसरण झाली. आरबीआयच्या अहवालानुसार, 10 रुपयांच्या नकली नोटांमध्ये 11.6 टक्क्यांची घट, 100 रुपयांच्या नकील नोटांची संख्या 14.7 टक्क्यांची घसरण, तर 2000 रुपयांच्या नकली नोटांमध्ये 27.9 टक्क्यांची घसरण दिसून आली.

नोटा छपाईवर किती खर्च नकली नोटा व्यतिरिक्त आरबीआयने वार्षिक अहवालात नोटा छापण्यासाठी किती खर्च करण्यात येतो, याची माहिती दिली आहे. आरबीआयने आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये नोटा छापण्यासाठी 4,682.80 कोटी रुपये खर्च केले होते. गेल्या वर्षी हा आकडा 4,984.80 कोटी रुपये होता. व्यवहारात सर्वाधिक 10 रुपये आणि 500 रुपयांच्या नोटा चलनात आहेत.

पोलिसांना खास प्रशिक्षण 2016 मध्ये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नोटबंदी करण्यात आली होती. भारताने NIA ची स्थापना केली. तसेच दहशतवाद्यांना वित्त पुरवठा आणि चलन शाखाही सुरु केली. पत्रसूचना कार्यालयानुसार, देशातील प्रत्येक राज्यातील पोलिसांना या बोगस नोटांचे जाळे ओळखण्यासाठी आणि त्यावर कारवाई करण्यासाठी संयुक्तरित्या प्रशिक्षण देण्यात येते. या एजन्सी एकमेकांसोबत सहकार्य करतात आणि कारवाई करुन त्यांचा डाव उधळून लावतात. भारताने बांग्लादेश आणि नेपाळसोबत या नकली नोटांना आळा घालण्यासाठी करारही केला आहे.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.