संप मागे; बँका बुधवारी सुरु राहणार

मुंबई : बँक ग्राहकांसाठी एक चांगली बातमी आहे. वेतनवाढ आणि बँक ऑफ बडोदा, देना बँक आणि विजया बँक यांच्या विलिनीकरणाच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी 10 लाख बँक कर्मचाऱ्यांकडून 26 डिसेंबरला करण्यात येणारा संप मागे घेण्यात आला आहे. यासंबंधी गेल्या शुक्रवारी बँक अधिकाऱ्यांच्या युनियनने संप पुकारला होता. हा संप मागे घेण्यात आला असल्याने आता बँका 26 डिसेंबरला …

संप मागे; बँका बुधवारी सुरु राहणार

मुंबई : बँक ग्राहकांसाठी एक चांगली बातमी आहे. वेतनवाढ आणि बँक ऑफ बडोदा, देना बँक आणि विजया बँक यांच्या विलिनीकरणाच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी 10 लाख बँक कर्मचाऱ्यांकडून 26 डिसेंबरला करण्यात येणारा संप मागे घेण्यात आला आहे. यासंबंधी गेल्या शुक्रवारी बँक अधिकाऱ्यांच्या युनियनने संप पुकारला होता. हा संप मागे घेण्यात आला असल्याने आता बँका 26 डिसेंबरला बुधवारी सुरु राहणार आहेत.

सरकारने सप्टेंबर महिन्यात सार्वजनिक क्षेत्रातील विजया बँक आणि देना बँकेला रिझर्व्ह बँकेच्या प्रॉम्ट करेक्टिव अॅक्शन (पीसीए) अंतर्गत बँक ऑफ बडोदामध्ये विलिनीकरण करण्याची घोषणा केली होती. यामुळे देशातील तिसरी सर्वात मोठी बँक तयार होईल. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (यूएफबीयू)च्या मते, हे विलिनीकरण बँक आणि बँकेच्या ग्राहकांच्या फायद्याचे नाही, याने दोघांनाही नुकसान होईल.

यूएफबीयू ही 9 बँकांच्या युनियनची संघटना आहे. यामध्ये ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कन्फेडरेशन, ऑल इंडिया बँक एमप्लॉईज असोसिएशन, नॅशनल ऑर्गनॅझेशन ऑफ बँक वर्कर्स इत्यादी युनियन आहेत. या सर्व युनियन तर्फे 26 डिसेंबरला मोर्चा काढला जाईल आणि दक्षिण मुंबईच्या आझाद मैदानावर विरोध प्रदर्शन केले जाईल. पण बँका सुरु राहतील.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *