Bihar Election Results 2025: बिहारमध्ये मोठा ‘खेला’? शेअर बाजार सकाळच्या सत्रात दणकावून आपटला, मोठे संकेत काय?
Bihar Election Results 2025: बिहारमध्ये सध्या NDA 137 जागांवर आघाडीवर आहे. तर महाआघाडी ही 96 जागांवर आघाडीवर आहे. सुरुवातीच्या कौलमुळे काटें की टक्कर स्पष्ट दिसत आहे. त्यातच शेअर बाजाराने मोठे संकेत दिले आहेत. बिहारमध्ये 'खेला' होणार?

Stock Market Crashed : बिहार हे देशाच्या राजकारणाची दिशा ठरवते असे म्हटले जाते. तर बिहारची जनता नुसती राजकारणच खेळत नाही तर, पुढाऱ्यांशीच राजकारण खेळते अशी एक म्हण प्रसिद्ध आहेत. त्याची हळूहळू प्रचिती येत आहे. सुरुवातीचे जे कल येत आहेत. त्यात NDA 137 जागांवर आघाडीवर आहे. तर महाआघाडी ही 96 जागांवर आघाडीवर आहे. तर चाणक्य म्हटले जाणारे प्रशांत किशोर यांच्या पक्षाला चार जागांच्या आघाडीवर मजल मारता आली आहे. त्यामुळे हे संकेत बिहारमध्ये मोठा खेला होणार हे दाखवत आहेत. याचा परिणाम थेट सकाळच्या सत्रात शेअर बाजारावर दिसला. शेअर बाजार कोसळला. सकाळच्या सत्रात स्टॉक मार्केट दणकावून आपटला.
शेअर बाजाराचा लाल झेंडा
शुक्रवारी,14 नोव्हेंबर रोजी सकाळच्या व्यापारी सत्रात शेअर बाजार लाल रंगात न्हाऊन निघाला. आज बिहार विधानसभा निवडणूक 2025 चा निकाल हाती येत आहे. 243 जागांसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. सुरुवातीचे कल हाती येत आहेत. गुंतवणूकदारांचे लक्ष या निकालांवर आहे. शुक्रवारी BSE बेंचमार्क इंडेक्स सेन्सक्स सुरुवातीच्या व्यापारी सत्रात 418 अंकांनी कोसळला. सेन्सेक्स 84,060.14 वर उघडला. तर निफ्टी 50 इंडेक्सने 111 अंकांनी घसरून 25,767.90 वर कामकाजाला सुरुवात केली.
या शेअरमध्ये उसळी
आज सकाळच्या सत्रात ट्रेंट लिमिटेडमध्ये सर्वाधिक उसळी दिसली. ट्रेंटचा शेअर 0.65 टक्क्यांनी वधारला. हा शेअर 4349.95 रुपयांवर व्यापार करत होता. त्यानंतर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचा शेअर 0.52 टक्क्यांनी उसळला. हा शेअर 422.00 रुपयांवर ट्रेड करत होता. तिसऱ्या क्रमांकावर अदानी पोर्ट्सच्या शेअरमध्ये 0.49 टक्क्यांची तेजी दिसली. हा शेअर 1505.10 रुपयांवर ट्रेड करत आहे. बजाज फायनान्सने 0.44 टक्क्यांची तेजी दाखवली. हा शेअर 1009.60 रुपयांवर व्यापार करत आहे. एशियन पेंट्सचा शेअर 0.42 टक्क्यांसह 2891.25 रुपयांवर व्यापार करत आहे. तर काही शेअरमध्ये मोठी पडझड झाली आहे. येत्या एक दोन तासात निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर शेअर बाजाराचा मूड बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
243 जागांसाठी मत मोजणी सुरू
बिहारमधील 243 जागांसाठी मत मोजणीला आज सकाळीच सुरुवात झाली. सुरुवातीचे निकाल एनडीएच्या बाजूने तर महाआघडीही टफ फाईट देताना दिसत आहे. एक्झिट पोलने एनडीएच्या पारड्यात निकाल अगोदरच टाकलेले आहे. निकाल जस जसे बदलतील तस तसा बाजाराचा रंग खुलेल अथवा बदलेल. तज्ज्ञांच्या मते स्पष्ट बहुमत बाजाराला स्थिरता देईल. पण जर निकाल अनपेक्षित लागले तर बाजारात दुपारनंतरही मोठा भूकंप येऊ शकतो.
