Sanjay Raut on Budget 2021 : गरिबाला आणखी गरीब करु नका, उद्योगांचा फास ढिला करा : संजय राऊत

देशातील उद्योगांना मुक्तपणे काम करु देण्याची गरज आहे. त्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा फास ढिला झाला पाहिजे. जेणेकरून अर्थकारणाला उभारी येईल, असेही संजय राऊत यांनी सांगितले. | Sanjay Raut

Sanjay Raut on Budget 2021 : गरिबाला आणखी गरीब करु नका, उद्योगांचा फास ढिला करा : संजय राऊत
sanjay raut

मुंबई: मोदी सरकारकडून मांडल्या जाणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात (Budget 2021) गरीब आणि मध्यमवर्गीयांना दिलासा देणारी घोषणा झाली पाहिजे. गरीब आणखी गरीब होता कामा नये, अशी अपेक्षा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली. (Budget 2021 LIVE News in Marathi)

ते सोमवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी वस्तू व सेवा कर कायद्याच्या (GST) परताव्याच्या पैशांवरून केंद्र सरकारला टोला लगावला. केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या वाट्याचे जीएसटीचे पैसे लवकरात लवकर द्यावेत. म्हणजे आम्हाला कोरोनाच्या संकटातून अर्थव्यवस्था बाहेर काढता येईल. तसेच कोरोनाची लस मोफत देण्यासंदर्भातही विचार झाला पाहिजे, असे संजय राऊत यांनी सांगितले.

‘उद्योग आणि व्यापाऱ्यांवरील केंद्रीय यंत्रणांचा फास सैल करा’

देशातील उद्योगांना मुक्तपणे काम करु देण्याची गरज आहे. त्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा फास ढिला झाला पाहिजे. जेणेकरून अर्थकारणाला उभारी येईल, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

Budget 2021 सादर होण्याआधीच सरकारला मिळाली Good News, जानेवारीत ‘असा’ झाला फायदा

जानेवारी 2021 मधील जीएसटी कलेक्शन मागच्या वर्षाच्या तुलनेत आठ टक्क्यांनी वाढलं आहे. यावेळी अर्थ मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, ’31 जानेवारी 2021 रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जीएसटी कलेक्शन 1,19,847 कोटी रुपये होतं. यामध्ये केंद्रीय जीएसटी (CGST) 21,923 कोटी रुपये, राज्ये जीएसटी (SGST) 29,014 कोटी, एकिकृत जीएसटी (IGST) रुपये 60,288 कोटी आणि सेर 8,622 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. इतकंच नाहीतर जीएसटी विक्री परतावा भरल्याची संख्या जास्त असल्यामुळे हा आकडा आणखी जास्त असू शकणार आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधी वाढणार

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सरकारने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा करण्यास सुरुवात केली. देशातील 14.5 कोटी शेतकऱ्यांना वर्षाला 6000-6000 रुपये शेतीसाठी दिले जात आहेत. आतापर्यंत 1,13,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले गेले आहेत. या योजनेतील रकमेमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संबंधित बातम्या:

Union Budget 2021 Marathi LIVE : केंद्रीय मंत्रिमंडळाची अर्थसंकल्पाला मंजुरी, काही क्षणांत बजेट संसदेत सादर होणार

Budget Marathi 2021 LIVE : सीतारमण यांच्याकडून राष्ट्रपतींकडे बजेटची प्रत सुपूर्द

Budget 2021 सादर होण्याआधीच सरकारला मिळाली Good News, जानेवारीत ‘असा’ झाला फायदा

Budget 2021: अर्थसंकल्पाच्या दिवशीच विमान प्रवाशांना धक्का; जेट इंधन महागले

(Budget 2021 LIVE News in Marathi)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI