AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EPS | कर्मचारी पेन्शन योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय, तब्बल 65 लाख पेन्शनधारकांवर काय परिणाम?

कर्मचारी पेन्शन स्कीम (EPS) आणि इन्फ्लेशन इंडेक्स (महागाई निर्देशांक) सोबत जोडली जाणार नाही. (EPS not to linked with Inflation Index)

EPS | कर्मचारी पेन्शन योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय, तब्बल 65 लाख पेन्शनधारकांवर काय परिणाम?
पेन्शन फंड
| Updated on: Mar 13, 2021 | 1:03 PM
Share

नवी दिल्ली : कर्मचारी पेन्शन योजना (EPS) आणि इन्फ्लेशन इंडेक्स (महागाई निर्देशांक) सोबत जोडण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. काही दिवसांपूर्वी विमा नियामक (IRDAI) अशाप्रकारे एक उत्पादन लाँच करण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. ज्यामुळे पेन्शनधारकांना मोठा फायदा होईल, असे बोलले जाते होते. मात्र केंद्राने असे कोणताही निर्णय घेतला नाही.(EPS not to linked with Inflation Index)

सरकारकडून EPS 1995 संबंधित जोडलेल्या पेन्शनर्सच्या अनेक मागण्या येत होत्या. या मागणीसाठी सरकारकडून समिती गठीत करण्यात आली होती. कामगार मंत्रालयाच्या तज्ज्ञ समितीने याबाबतची कोणतीही सूचना केलेली नाही. त्यामुळे कर्मचारी पेन्शन स्कीम (EPS) आणि इन्फ्लेशन इंडेक्स (महागाई निर्देशांक) सोबत जोडली जाणार नाही.

पेन्शन वाढवून देण्याची मागणी 

EPFO बोर्डाचे सदस्य विरजेश उपाध्याय यांनी दिलेल्या माहितीनुसार, या समितीने कर्मचारी पेन्शन स्कीम (EPS) आणि इन्फ्लेशन इंडेक्स (महागाई निर्देशांक) सोबत जोडण्याबाबत कोणताही सूचना केलेली नाही. पेन्शनधारकांना सध्या 1 हजार रुपये मुलभूत पेन्शन दिली जाते. मात्र ती वाढवून 3 हजार रुपये देण्यात यावे, अशी मागणी पेन्शनधारकांनी केली आहे.

या मागणीबाबत कोशियारी समितीने काही सूचना सरकारला पाठवल्या आहेत. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अंतिम निर्णय झालेला नाही. पेन्शनधारकांचा संबंध महागाई निर्देशांकाशी जोडला पाहिजे. यामुळे पेन्शनधारकांना चांगला दिलासा मिळू शकेल. मात्र असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. जर असा कोणताही प्रस्ताव लागू करण्यात आला तर याचा थेट फायदा EPS-95 च्या 65 लाख पेन्शनधारकांना मिळू शकतो.

IRDAI कडून सूचना 

कर्मचारी पेन्शन योजनेला महागाई निर्देशांक किंवा सरकारी सिक्युरिटीजसोबत जोडलं जाऊ शकतं, असा अंदाज इन्शुअरन्स रेग्युलेटर IRDAI ने व्यक्त केला होता. या नवीन योजनेचा फायदा महागाई वाढल्यानंतर पेन्शनधारकांना अधिक पैसे मिळण्यासाठी होणार आहे.

भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरण (आयआरडीएआय) चे अध्यक्ष सुभाषचंद्र खुंटिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवृत्ती वेतनधारकांना दर महिन्याला नियमित उत्पन्न मिळेल, अशी योजना असली पाहिजे. यासाठी फ्लोटिंग रेट अ‍ॅन्युइटीसारखे उत्पादन आणले जाऊ शकते. ज्यात महागाई निर्देशांकाशी जोडले जाऊ शकते. (EPS not to linked with Inflation Index)

संबंधित बातम्या : 

EPFO खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी; मोठा नियम झाला सोपा; झंझटीशिवाय काढा पैसे

आता IMPS च्या माध्यमातून NPS खात्यात पैसे जमा करता येणार, होणार मोठा फायदा

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.