AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EPFO कडून खास सुविधा! ‘या’ कामासाठी आता ऑनलाईन सेवा सुरू, तुम्हीही घ्या फायदा

ईपीएफओने आपल्या पोर्टलवर निवृत्तीवेतनासाठी अनेक सुविधा दिल्या आहेत. जिथे पेन्शनधारकांना पेन्शनशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील.

EPFO कडून खास सुविधा! 'या' कामासाठी आता ऑनलाईन सेवा सुरू, तुम्हीही घ्या फायदा
| Edited By: | Updated on: Mar 26, 2021 | 12:11 PM
Share

नवी दिल्ली : सेवानिवृत्तीनंतर कर्मचार्‍यांना निवृत्तीवेतनाशी संबंधित थोड्या माहितीसाठी कार्यालयांमध्ये जावे लागते. ही समस्या संपवण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेने लाखो पेन्शनधारकांना (EPFO Pensioners) मोठा दिलासा दिला आहे. ईपीएफओने आपल्या पोर्टलवर निवृत्तीवेतनासाठी अनेक सुविधा दिल्या आहेत. जिथे पेन्शनधारकांना पेन्शनशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील. (epfo News pension portal every important information will be available online)

लाइफ प्रूफ चौकशी

निवृत्तीवेतनधारकांना दरवर्षी पीएफ कार्यालयात एक जीवित प्रमाणपत्र सादर करावे लागते. ज्यामुळे अनेकजण कार्यालयात चक्कर मारताना दिसतात. परंतु, आता जीवन प्रमाणपत्र संबंधित प्रत्येक माहिती पोर्टलवरच उपलब्ध होईल.

पीपीओ क्रमांक जाणून घ्या

PPO क्रमांकाच्या सहाय्याने निवृत्तीनंतर निवृत्तीवेतनधारकांना पेन्शन (Pension) मिळते. ही 12 अंकांचा रेफरेंस नंबर असतो. निवृत्तीवेतनाच्या पासबुकमध्ये पीपीओ क्रमांक प्रविष्ट करणे आवश्यक आहे. पेन्शन खाते बँकेच्या एका शाखेतून दुसर्‍या शाखेत हस्तांतरित करण्यासाठी पीपीओ क्रमांक आवश्यक आहे. आता कर्मचार्‍यांना पोर्टलवरून ही माहिती मिळू शकेल. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, पीएफ क्रमांक किंवा नोंदणीकृत बँक खाते क्रमांक सादर करावा लागेल. त्यानंतर पीपीओ क्रमांक दिसेल.

पीपीओ संबंधित चौकशी

कर्मचार्‍यांना पीपीओविषयी माहिती मिळू शकेल. तसेच, देयकाशी संबंधित माहिती देखील इथे मिळेल.

निवृत्तीवेतनाची स्थिती

या मदतीने कर्मचार्‍यास त्याच्या पेन्शनची सद्यस्थिती सहज कळू शकेल. यासाठी त्यांना कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज नाही. निवृत्तीवेतनधारक पोर्टलवर जीवन प्रमाणपत्र, देय माहिती आणि त्यांच्या निवृत्तीवेतनाविषयीची माहिती मिळवण्यासाठी https://mis.epfindia.gov.in/PensionPaymentEnquiry/ वर ही माहिती द्यावी लागेल. (epfo News pension portal every important information will be available online)

संबंधित बातम्या – 

Gold Price today : होळीच्या आधी सोन्याच्या किंमती आणखी घसरल्या, वाचा ताजे दर

‘या’ 8 बँकांमध्ये खातं असेल तर होळीआधी करा महत्त्वाचं काम, अन्यथा नाही होणार व्यवहार

SBI चे 44 कोटी ग्राहकांना अलर्ट! मोबाईलवर SMS आल्यास त्वरित करा हे काम, अन्यथा…

Bank Holidays: बँकेची कामं लवकर आटपून घ्या; पुढचे 7 दिवस बँका बंद राहणार

(epfo News pension portal every important information will be available online)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.