AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ex Dividend Stocks | आज आनंदी आनंद झाला! या कंपन्या लावणार लॉटरी

Ex Dividend Stocks | कंपन्यांच्या दुसऱ्या तिमाहीचा हंगाम सुरु झाला आहे. कंपन्या प्रत्येक तिमाहीत त्यांच्या कामगिरीचा आढावा घेतात. किती मोठी उडी घेतली. काय उणे कुठे बाजी मारली याचा ताळेबंद मांडतात. अशावेळी सहाजिकच या कंपन्या फायदा झाल्यास गुंतवणूकदारांना पण त्यात वाटेकरी करुन घेतात. आता तोच आनंदाचा क्षण आला आहे...

Ex Dividend Stocks | आज आनंदी आनंद झाला! या कंपन्या लावणार लॉटरी
| Updated on: Oct 22, 2023 | 3:19 PM
Share

नवी दिल्ली | 22 ऑक्टोबर 2023 : पुढील आठवड्यात गुंतवणूकदारांना किती सांगू आणि कोणाला सांगू असा अनुभव येणार आहे. अनेक कंपन्या त्यांचा लेखाजोखा मांडणार आहे. दुसऱ्या तिमाहीचे निकाल यायला लागले आहेत. गेल्या आठवड्यात काही कंपन्यांनी त्यांची कामगिरी सर्वांसमोर मांडली. त्यात लाभांश, बोनस शेअरची उधळण करण्यात आली. गुंतवणूकदारांचा आनंद गगनात मावेनासा झाला. काहींना मोठी लॉटरी लागली. काही कंपन्या या आठवड्यात शेअरधारकांना आनंदाचा धक्का देतील. डिव्हिडेंड, बोनस आणि शेअर स्प्लिटच्या लाटेत गुंतवणूकदार हरकून जातील. त्यांना मोठा फायदा होणार आहे.

या कंपन्या करतील मालामाल

या आठवड्यात आयसीआयसीआय लोम्बार्ड, एलअँडटी टेक, इन्फोसिस या कंपन्या एक्स डिव्हिडंडच्या माध्यमातून कमाईची संधी देतील. बाजारात अनेक कंपन्याच्या घाडमोडींना वेग आला आहे. या आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीचे निकालात लाभांश, बोनस शेअर, शेअर स्प्लिटचे बक्षिस मिळू शकते. त्यासाठी तारीख निश्चित करण्यात येते. त्यालाच एक्स-डिव्हिडेंड डेट म्हणतात.

एक्स डिव्हिडेंड शेअर्सची यादी

  1. इन्फोसिस (Infosys) : आयटी क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची दिग्गज कंपनी इन्फोसिसच्या संचालक मंडळाने 18 रुपये प्रति शेअरचा लाभांश जाहीर केला आहे. हा शेअर 25 ऑक्टोबर रोजी एक्स-डिव्हिडंड देईल.
  2. केसोल्व्स इंडिया लिमिटेड (Ksolves India Ltd) : 7 रुपयांचा अंतरिम लाभांश, एक्स-डिव्हिडेंड डेट 26 ऑक्टोबर
  3. टीसीआय एक्सप्रेस लिमिटेड (TCI Express Ltd) : 3 रुपयांचा अंतरिम लाभांश, एक्स-डिव्हिडेंड डेट 26 ऑक्टोबर
  4. एस्ट्रल लिमिटेड (Astral Ltd) : 1.5 रुपयांचा अंतरिम लाभांश, एक्स-डिव्हिडेंड डेट 27 ऑक्टोबर
  5. आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (ICICI Lombard General Insurance Company Ltd) : 5 रुपयांचा अंतरिम लाभांश, एक्स-डिव्हिडेंड डेट 27 ऑक्टोबर
  6. आयसीआयसीआय सिक्योरिटीज लिमिटेड (ICICI Securities Ltd) : 12 रुपयांचा अंतरिम लाभांश, एक्स-डिव्हिडेंड डेट 27 ऑक्टोबर.
  7. जिंदल स्टेनलेस लिमिटेड (Jindal Stainless Ltd) : 1 रुपयांचा अंतरिम लाभांश, एक्स-डिव्हिडेंड डेट 27 ऑक्टोबर
  8. एलटीआय माइंडट्री लिमिटेड (LTI Mindtree Ltd) : 20 रुपयांचा अंतरिम लाभांश,एक्स-डिव्हिडेंड डेट 27 ऑक्टोबर
  9. एलअँडटी टेक्नोलॉजी सर्व्हिसेज लिमिटेड (L&T Technology Services Ltd) : 17 रुपयांचा अंतरिम लाभांश, एक्स-डिव्हिडेंड डेट 27 ऑक्टोबर

बोनस आणि स्प्लिट शेअरची यादी

  • श्री व्यंकटेश रिफायनरीज लिमिटेड (Shri Venkatesh Refineries Ltd) चा शेअर 27 ऑक्टोबर रोजी एक्स-बोनस देईल. त्याचे प्रमाण 1:1 आहे.
  • जय भारत मारुती लिमिटेड (Jay Bharat Maruti Ltd) चा शेअर 26 ऑक्टोबर रोजी एक्स-स्प्लिट होईल.
  • बीसीएल इंडस्ट्रीज लिमिटेड (BCL Industries Ltd) 27 ऑक्टोबर रोजी एक्स-स्प्लिट होईल.
  • शशिजीत इंफ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड (Shashijit Infraprojects Ltd) एक्स-स्प्लिट होईल.
  • टेलब्रोज ऑटोमेटिव्ह कम्पोनेंट्स लिमिटेड (Talbros Automotive Components Ltd) शेअर रोजी एक्स-स्प्लिट होईल.
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.