AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Today Gold Price : सराफा बाजारात मोठी घडामोड, सोन्याचे दर खाली, आज 10 ग्रॅम सोनं…

Today Gold Price 24 April 2026 Latest News Updates in Marathi : सोनं आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. दिल्ली सराफा बाजारासोबतच एमसीएक्सवरही या मौल्यवान धातूंचे भाव नरम पडले आहेत. आज 10 ग्रॅम सोन्याचे दर किती आहेत ?

Today Gold Price : सराफा बाजारात मोठी घडामोड, सोन्याचे दर खाली, आज 10 ग्रॅम सोनं...
सोनं चांदी भावImage Credit source: PTI
| Updated on: Apr 24, 2026 | 9:59 AM
Share

अमेरिका-इराण या दोन्ही देशांतील शांतता चर्चेबाबत अजूनही अनिश्चितता असून त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय राजधानीच्या, अर्थात दिल्लीच्या सराफा बाजारात सोनं आणि चांदीच्या दरात घसरण दिसून आली. ऑल इंडिया सराफा असोसिएशनच्या माहितीनुसार, बुधवारी बाजार बंद होताना चांदीचा भाव प्रति किलो 2.55 लाख रुपयांवर पोहोचला, तर सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1.57 लाख रुपयांवर स्थिर होता. एमसीएक्सवरही दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये असाच कल दिसून आला. बुधवारी रात्री उशिरा सोने आणि चांदी तोट्यात व्यवहार करत होते, त्यामध्ये चांदीच्या भावातील घसरण अधिक तीव्र होती.

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या आकडेवारीनुसार, मागील सत्राच्या अखेरीस 24 -कॅरेट सोन्याचा भाव (3% जीएसटी आणि घडणावळीचे शुल्क वगळून) प्रति 10 ग्रॅम साठी 1 लाख 51 हजार 060 रुपये इतका होता.

दरम्यान, गुडरिटर्न्सच्या आकडेवारीनुसार, मागील सत्रात 24-कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,53,550 रुपये तर चांदीचा भाव 5 हजारांनी घसरून प्रति किलो 2,60,000 रुपयांवर आला होता.

सराफा बाजारात नरमी

ऑल इंडिया सराफा असोसिएशनच्या माहितीनुसार, बुधवारी बाजार बंद होईपर्यंत राष्ट्रीय राजधानीत चांदीचा भाव (सर्व करांसहित) 2700 रुपयांनी घसरून 2.55 लाख रुपये प्रति किलो झाला. त्याचप्रमाणे, 24-कॅरेट सोन्याचा भाव (सर्व करांसहित) 300 रुपयांनी घसरून 1,57,000रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला होता. .

जाणकारांचं म्हणणं काय ?

वरिष्ठ विश्लेषकांच्या सांगण्यानुसार, “बुधवारी सोन्याच्या दरात घसरण झाली. अमेरिका-इराण चर्चेच्या दुसऱ्या फेरीचे नियोजन अयशस्वी ठरले. मात्र, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधी वाढवली. मात्रम प्रगतीच्या अभावामुळे अनिश्चितता वाढली असून त्यामुळेच कच्च्या तेलाला आणि डॉलरला आधार मिळाला, पण मौल्यवान धातूंवर मात्र याचा नकारात्मक परिणाम झाला.” असं ते म्हणाले.

आता कोणत्या घटकांवर असेल लक्ष ?

या घडामोडींवर बाजारातील भागीदारांची प्रतिक्रिया येत राहील. मात्र जोपर्यंत अधिक स्पष्ट संकेत मिळत नाहीत, तोपर्यंत किमतींच्या हालचालींमध्ये सावध भूमिका तसेच ‘थांबा आणि पहा’ दृष्टिकोन दिसून येण्याची शक्यता आहे. “सीझफायर कायम राहण्याच्या आशेमुळे सोन्याची सुरुवात तेजीने झाली आणि ते सकारात्मक पातळीवर राहिलं होतं. मात्र शस्त्रास्त्रसंधी वाढवण्याबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जी परस्परविरोधी विधान केली त्यामुळे बाजारात अस्थिरता आहे,” असे एलकेपी सिक्युरिटीजच्या कमोडिटीज अँड करन्सीज, रिसर्च अँड ॲनालिसिस विभागाचे उपाध्यक्ष जतीन त्रिवेदी यांनी सांगितलं. जागतिक घडामोडींमधून जे संमिश्र संकेत मिळत आहेत, त्यामुळे सर्व मालमत्ता वर्गांमध्ये अनिश्चितता निर्माण होत आहे, ज्यामुळे सोन्याच्या किमतींमध्ये मोठे, पण अल्पकालीन चढ-उतार होत आहेत, असंही त्यांनी नमूद केलं.

शहर 24 कॅरेट सोन्याचे दर 22 कॅरेट सोन्याचे दर 18 कॅरेट सोन्याचे दर
दिल्‍ली ₹153700 ₹140900 ₹115310
मुंबई ₹153550 ₹140750 ₹115160
कोलकाता ₹153550 ₹140750 ₹115160
चेन्‍नई ₹154480 ₹141600 ₹118100
लखनऊ ₹153700 ₹140900 ₹115310
कानपुर ₹153700 ₹140900 ₹115310
पटना ₹153600 ₹140800 ₹115210
जयपुर 153700 ₹140900 ₹115310
इंदौर ₹153600 ₹140800 ₹115210
भोपाळ ₹153600 ₹140800 ₹115210

आंतराराष्ट्रीय बाजारातील स्थिती

आंतरराष्ट्रीय बाजारात, स्पॉट चांदी 1.46 टक्क्यांनी वाढून प्रति औंस 77.80 डॉलरवर पोहोचली, तर सोन्याचा भाव 0.48 ८ टक्क्यांनी वाढून प्रति औंस 4,742.97 अमेरिकन डॉलरवर पोहोचला आहे.

Follow Us
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती....
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती.....
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू...
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू....
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर.
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले....
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले.....
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध.
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत.
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड.
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.