AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Today Gold Rate : सोनं उच्चांकापेक्षा 50 हजारांनी स्वस्त, आजचे दर पाहून लगेच घ्याल धाव, 10 ग्रॅम सोन्याची किंमत…

Today Gold Rate 4 May 2026 Latest Updates in Marathi : गेल्या काही काळापासून सोन्याच्या दरात चढ-उतार होत आहे. देशभरातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या किमती घसरल्याने गुंतवणूकदार आणि सामान्य जनतेचे लक्ष वेधले गेले आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी आज सोन्याचे दर किती ?

Today Gold Rate  : सोनं उच्चांकापेक्षा 50 हजारांनी स्वस्त, आजचे दर पाहून लगेच घ्याल धाव, 10 ग्रॅम सोन्याची किंमत...
सोन्याची आजची किंमत
| Updated on: May 04, 2026 | 11:20 AM
Share

Gold Price Today In India : सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या सोन्याच्या किमती सतत वरखाली होत राहतात. अमेरिक आणि इराणच्या युद्धाचा फटका, डॉलरची किंमत या सर्व गोष्टींचा सराफा बाजारावर परिणाम होताना दिसतो. सोनं- चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांत मोठी घसरण झालेली दिसत आहे. सर्वकालीन उच्चांकापेक्षा सोनं 50-52 हजारांनी खाली आलं आहे. जगातील विविध घडामोडी, इराण-अमेरिका युद्ध,अशांतता यामुळे जागतिक बाजारपेठही अस्थिर असून त्याचा डायरेक्ट परिणाम सोनं आणि चांदीवर झाल्याचं दिसून आलंय. युद्धामुळे दोन्ही मौल्यवान धातूंचे दर अस्थिर झालेले दिसत आहेत. काही महिन्यांपूर्वी सोन्याने र्वकालीन उच्चांक गाठला, 10 ग्रॅम म्हणजेच एक तोळा सोन्याची किंमत ही 2 लाख रुपयांच्या आसपास होती. मात्र त्यानतंर सोन्याचे दर खाली घसरले. या आठवड्याच्या सुरूवातीला 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे दर खाली घसरलेले दिसून आले. जागतिक घडामोडींचा सोन्याच्या किमतींवर डायरेक्ट परिणाम दिसून आला.

कालप्रमाणेच आजही सोन्याचे दर खाली घसरले. सोमवार 4 में रोजी सोन्याची किंमत समोर आली आहे. आज 24 कॅरेट सोन्याच्या 1 ग्रॅमची किंमत 15,113 रुपये आहे तर 10 ग्रॅमसाठी 1,51,130 रुपये दर आहे. चांदीच्या दरातही घसरण सुरू असून, त्यामुळे बाजारात विविध कल दिसून येत आहेत. आंतरराष्ट्रीय दरांमध्येही किंचित घट दिसून येत आहे. चला तर मग, आज तुमच्या शहरातील सोन्याचा आणि चांदीचा भाव जाणून घेऊया.

MCX वर सोन्याची स्थिती

◉ MCX वर गोल्ड फ्यूचर्स (05 जून 2026) ची किंमत 1,51,130.00 रुपये इतकी आहे.

◉ त्यात 222 रुपये किंवा 0.15% ची घसरण झाली आहे.

◉ ओपन इंटरेस्ट विश्लेषणानुसार, बाजारात शॉर्ट बिल्ड-अप दिसून येत आहे, म्हणजेच किंमत कमी होत असताना नवीन शॉर्ट पोझिशन्स तयार केल्या जात आहेत.

◉ ट्रेडिंग व्हॉल्यूम ३५५ होता, तर बिड 1,51,185 रुपये आणि आस्क प्राईस अंदाजे 1,51,207 रुपयांच्या आसपास होती.

चांदी

◉ MCX वर सिल्व्हर फ्यूचर्स (03 जुलै 2026) ची किंमत 2,50,546.00 इतकी आहे.

◉ त्यामध्ये 391 रुपये किंवा 0.16 % घसरण झाली.

◉ ओपन इंटरेस्ट विश्लेषणानुसार, बाजारात ‘लॉन्ग अनवाइंडिंग’ होत आहे, म्हणजेच किंमत घसरत असताना पूर्वी घेतलेल्या लॉन्ग पोझिशन्स बंद केल्या जात आहेत.

◉ ट्रेडिंग व्हॉल्यूम 20,520 होता, तर बिड 2,50,566 रुपये आणि आस्क प्राइस 2,50,649 रुपयांच्या जवळपास आहे.

रिटेल मार्केटमध्ये सोनं -चांदी

Bullians.co.in च्या माहितीनुसार, आज भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदी या दोन्हींच्या दरात घट झाली आहे. सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,51,570 रुपये असून, त्यात 260 किंवा 0.17 % घट झाली आहे. चांदीचा भाव प्रति किलो 2,50,650 रुपयांपर्यंत घसरला असून, त्यात 570 रुपये किंवा 0.23% घट झाल्याचे दिसून आलं.

तुमच्या शहरात सोन्याचे भाव किती ? City wise Gold Price (1 Gram)

तुमच्या शहरात चांदीचे भाव किती ? City wise Price 

Follow Us
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक..
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत....
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर.
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही.
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक.
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले....
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले.....
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर...
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर....
जनतेला नियम आणि स्वतःला सूट?; मोदींच्या बचत आवाहनावर दमानिया आक्रमक
जनतेला नियम आणि स्वतःला सूट?; मोदींच्या बचत आवाहनावर दमानिया आक्रमक.
मोठी बातमी! आणखी एक MIM नेता कचाट्यात, गोवंश तस्करी प्रकरणी 3 लाख...
मोठी बातमी! आणखी एक MIM नेता कचाट्यात, गोवंश तस्करी प्रकरणी 3 लाख....
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राहुल गांधी आक्रमक; थेट म्हणाले. हे...
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राहुल गांधी आक्रमक; थेट म्हणाले. हे....