AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GST 2.0 : आजपासून किती पैसे वाचणार ? दूध-पनीर, ते एसीपर्यंत… या गोष्टी होणार स्वस्त ! वाचा एका क्लिकवर

भारतात आजपासून नवीन जीएसटी 2.0 लागू झाले आहेत. सरकारने करप्रणाली सोपी करून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. या बदलाचा परिणम बाजारावर दिसून येणार आहे. जपासून अनेक गोष्टींच्या किमती कमी होणार असून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

GST 2.0 :  आजपासून किती पैसे वाचणार ? दूध-पनीर, ते एसीपर्यंत... या गोष्टी होणार स्वस्त !  वाचा एका क्लिकवर
GST 2.0Image Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: Sep 22, 2025 | 8:32 AM
Share

भारताच्या कर प्रणालीत आजपासून एक मोठा बदल लागू झाला आहे. नवीन वस्तू आणि सेवा कर (जीएसटी 2.0) आता देशभरात लागू करण्यात आला आहे. सामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी आणि वस्तू स्वस्त करण्यासाठी सरकारने संपूर्ण कर रचना सुलभ केली आहे. केंद्र सरकारने आज, (22 सप्टेंबर) नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून जीएसटी सुधारणा (जीएसटी 2.0०) लागू केल्या आहेत. सप्टेंबरच्या सुरुवातीला जीएसटी कौन्सिलने या बदलाला मान्यता दिली होती. त्याचा थेट परिणाम बाजारावर होईल. आजपासून, जेव्हा तुम्ही वस्तू खरेदी करायला जाल, तेव्हा त्या पूर्वीपेक्षा स्वस्त झालेल्या दिसतली, तर काही वस्तू अशाही आहेत, ज्यांचे दर वाढलेले दिसतील.

सरकारने नवीन टॅक्स स्ट्र्क्चरची रचना अशा प्रकारे केली आहे की जीवनावश्यक वस्तू आणि सामान्य ग्राहक उत्पादने स्वस्त होतील, जेणेकरून महागाईशी झुंजणाऱ्या सामान्य कुटुंबांना दिलासा मिळू शकेल. मात्र त्याच वेळी, चैनीच्या वस्तू आणि हानिकारक गोष्टींवर कर वाढवून महसूल वाढवण्याचा आणि वापर नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

आता फक्त दोन टॅक्स दर

यापूर्वी, पूर्वी, जीएसटीमध्ये अनेक कर स्लॅब होते: 5%, 12%, 18% आणि 28%. यामुळे केवळ व्यवसायच नव्हे तर सामान्य लोकही गोंधळात पडले, ज्यामुळे त्यांना कोणत्या वस्तूवर किती कर आकारला जातो हे माहित नव्हते. आता, सरकारने ही प्रणाली सोपी आणि सुलभ केली आहे. आता फक्त 5 टक्के आणि 18 टक्के असे दोन टॅक्स स्लॅब्स असतील. मात्र, सरकारने काही वस्तूंवर जास्त कर लादला आहे, ज्याला “सिन टॅक्स” म्हणतात. हे आरोग्यासाठी हानिकारक मानले जाणारे पदार्थ आहेत, उदा- तंबाखू, अल्कोहोल आणि पान मसाला. यावर 40% कर आकारला जाईल. तर काही वस्तूंवरील जीएसटी दर हाँ शून्य करण्यात आला आहे.

कोणत्या वस्तूंवर शून्य जीएसटी ?

अनेक वस्तू आणि सेवा पूर्णपणे जीएसटी मुक्त (०%) करण्यात आल्या आहेत.

खाण्याचे पदार्थ : UHT दूध, चीज, पिझ्झा, सर्व प्रकारची ब्रेड, रेडी टू ईट पोळी आणि पराठा.

शैक्षणिक साहित्य: पेन्सिल, नोटबुक, ग्लोब, चार्ट, सराव पुस्तके, प्रयोगशाळेच्या नोटबुक.

आरोग्य क्षेत्र : 33 जीवनरक्षक औषधे (३ कर्करोगाच्या औषधांसह), वैयक्तिक आरोग्य आणि जीवन विमा पॉलिसी.

5 % जीएसटी स्लॅब अंतर्गत येणाऱ्या वस्तू

अन्नपदार्थ : वनस्पती तेल, लोणी आणि तूप, साखर, मिठाई, पास्ता, बिस्किटे, चॉकलेट, रस, नारळ पाणी.

पर्सनल केअर प्रॉडक्ट्स : शाम्पू, हेअर ऑईल, टूथपेस्ट, साबण, शेव्हिंग क्रीम

घरगुती वापराची उत्पादने : स्वयंपाकघरातील भांडी, बाळाच्या दुधाच्या बाटल्या, छत्र्या, मेणबत्त्या, शिलाई मशीन, नॅपकिन्स/डायपर, हँडबॅग्ज, फर्निचर.

शेती उपकरणे : ट्रॅक्टर, कृषी यंत्रसामग्री, स्प्रिंकलर, ठिबक सिंचन, पंप.

हेल्थ प्रॉडक्ट्स : थर्मामीटर, ग्लूकोमीटर, मेडिकल ग्रेड ऑक्सीजन, चश्मा, रबर ग्लोव्ह्ज

कापड आणि पोशाख: तयार कपडे (2,500 रुपयांपर्यंत), ज्यूट/कापसाच्या पिशव्या, कृत्रिम धागा.

इतर: कोरीव कला उत्पादने, हस्तनिर्मित कागद आणि चित्रे, बांधकाम साहित्य (विटा, फरशा).

18 % जीएसटी स्लॅबमध्ये येणाऱ्या वस्तू

इलेक्ट्रॉनिक उत्पादने : एअर कंडिशनर, वॉशिंग मशीन, एलईडी/एलसीडी टीव्ही, मॉनिटर्स, प्रोजेक्टर.

वाहने: लहान कार, तीन चाकी वाहने, रुग्णवाहिका, 350 सीसी पेक्षा कमी मोटारसायकली, व्यावसायिक वाहने.

इंधन आणि पंप उपकरणे : ट्रॅक्टरसाठी हायड्रॉलिक पंप, इंधन पंप.

सर्व्हिस सेक्टर : टेल्स (दररोज 75000 रुपयांपेक्षा कमी ), चित्रपटगृहे (तिकिटे 100 रुपयांपेक्षा कमी), सौंदर्य सेवा.

विमाही स्वस्त

विमा प्रीमियम देखील सूट देण्यात आला आहे. पूर्वी, विमा सेवांवर 18% कर आकारला जात होता, ज्यामुळे व्यक्तींसाठी आरोग्य आणि जीवन विमा खरेदी करणे अधिक महाग झाले. सरकारने आता हा कर दर कमी केला आहे. काही विमा योजना कमी कर दराने सुरू करण्यात आल्या आहेत, तर काही पूर्णपणे करमुक्त करण्यात आल्या आहेत. यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांना परवडणाऱ्या विमा पॉलिसी मिळतील आणि अधिकाधिक लोकांना आरोग्य आणि जीवन विम्याचे फायदे घेता येतील.

या गोष्टी महगाणार

तंबाखू, बिडी आणि पान मसाल्यावरील कर 40 टक्के राहील. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अद्याप जीएसटीच्या अधीन नसल्याने त्या कायम आहेत. त्यामुळे इंधनाच्या किमतींमध्ये कोणताही दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे. दरम्यान, लक्झरी कार आणि एसयूव्हीवरील कर 40 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. शिवाय, 350 जास्त क्षमतेच्या बाईकवरील कर देखील वाढतील, ज्यामुळे किंमती वाढतील. शिवाय, शीतपेये आणि फ्लेवर्ड वॉटर सारख्या थंड पेयांच्या किमती देखील वाढतील.

Follow Us
CBSE च्या पोर्टलवर मोठ्या सायबर हल्ल्याचा प्रयत्न, फक्त दोनच मिनिटांत
CBSE च्या पोर्टलवर मोठ्या सायबर हल्ल्याचा प्रयत्न, फक्त दोनच मिनिटांत.
कचऱ्याने हैराण नागरिक आक्रमक; MIDC कार्यालयाबाहेर टाकला कचऱ्याचा ढीग,
कचऱ्याने हैराण नागरिक आक्रमक; MIDC कार्यालयाबाहेर टाकला कचऱ्याचा ढीग,.
ठाकरेंचा विश्वासू नेता हे काय बोलून गेला, बड्या खासदाराविषयी केलं सूचक
ठाकरेंचा विश्वासू नेता हे काय बोलून गेला, बड्या खासदाराविषयी केलं सूचक.
महागाईविरोधात ठाकरे सेनेचा एल्गार! भायखळ्यात रस्त्यावर उतरले शिवसैनिक
महागाईविरोधात ठाकरे सेनेचा एल्गार! भायखळ्यात रस्त्यावर उतरले शिवसैनिक.
आता हातभट्टीला सरकारने थेट...पुण्याच्या दारुकांडानंतर रामदास आठवलेंची
आता हातभट्टीला सरकारने थेट...पुण्याच्या दारुकांडानंतर रामदास आठवलेंची.
विखे लवकरच भिकेला लागणार, संजय राऊतांचा विखे-पाटलांवर घणाघात
विखे लवकरच भिकेला लागणार, संजय राऊतांचा विखे-पाटलांवर घणाघात.
सर्वात मोठी घडामोड! 447.27 कोटींचा तो आदेश रद्द... रिलायन्सला सर्वोच्च
सर्वात मोठी घडामोड! 447.27 कोटींचा तो आदेश रद्द... रिलायन्सला सर्वोच्च.
NEET घोटाळ्याविरोधात रस्त्यावर उतरली युवा काँग्रेस; सरकारविरोधात....
NEET घोटाळ्याविरोधात रस्त्यावर उतरली युवा काँग्रेस; सरकारविरोधात.....
काँग्रेसची शाल घालून सुप्रिया सुळेंच स्वागत; म्हणाल्या, माझा काँग्रेस
काँग्रेसची शाल घालून सुप्रिया सुळेंच स्वागत; म्हणाल्या, माझा काँग्रेस.
लाडक्या बहिणींनी लगेच लक्ष द्या! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय
लाडक्या बहिणींनी लगेच लक्ष द्या! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय.