HDFC Mutual Fund चा ‘Barni Se Azadi’ उपक्रम; गुतंवणुकीमधून महिलांना मिळतंय खरं आर्थिक स्वातंत्र्य
देशाला स्वातंत्र्य मिळून 79 वर्ष झाले आहेत, मात्र अजूनही देशातील महिला आर्थिकदृष्या पूर्णपणे स्वातंत्र्य झालेल्या नाहीत. महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याचा प्रवास अजूनही संपलेला नाही. परंतु आता पारंपारिक मार्गांपेक्षा पुढे जाऊन गुंतवणुकीद्वारे आपलं आर्थिक स्वातंत्र्याचं स्वप्न पूर्ण करण्याकडे महिलांचा कल वाढत आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळून 79 वर्ष झाले आहेत, मात्र अजूनही देशातील महिला आर्थिकदृष्या पूर्णपणे स्वातंत्र्य झालेल्या नाहीत. महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याचा प्रवास अजूनही संपलेला नाही. परंतु आता पारंपारिक मार्गांपेक्षा पुढे जाऊन गुंतवणुकीद्वारे आपलं आर्थिक स्वातंत्र्याचं स्वप्न पूर्ण करण्याकडे महिलांचा कल वाढत आहे. महिलांच्या याच स्वप्ननांना बळ देण्यासाठी आता एचडीएफसी म्युच्युअल फंडने त्यांची महत्वाकांक्षी योजना ‘बर्नी से आझादी’ची पाचवी आवृत्ती सुरू केली आहे. या योजने मागचा उद्देश हा महिलांना हे समजून देणे आहे की, खरे आर्थिक स्वातंत्र्य केवळ पैशांची बचत करून मिळणार नाही, तर बचत केलेला पैसा हा योग्यरित्या गुंतवून मिळते. “ही मोहीम आता एक सामाजिक चळवळ बनली आहे, जी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.” असं यावेळी HDFC AMC च्या एमडी आणि सीईओ नवनीत मुनोत यांनी म्हटलं आहे.
या मालिकेत मनी 9 लाईव्हने एक विशेष चर्चा आयोजित केली होती, या चर्चासत्रामध्ये अशा तीन प्रेरणादायी महिला सहभागी झाल्या होत्या, ज्यांनी केवळ त्यांच्या आयुष्यात ‘बर्नी’सारखी जुनी विचारसरणीच मोडली नाही तर इतर महिलांनाही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र बनण्याची प्रेरणा दिली. या चर्चेमध्ये नवनीत मुनोत यांच्यासोबत तात्विक आयुर्वेदच्या एमडी रिमझिम सैकिया, दिशा क्लोदिंगच्या संस्थापक दिशा गर्द आणि 11:11 स्लिमिंग वर्ल्डच्या फाउंडर प्रतिभा शर्मा सहभागी झाल्या होत्या.
महिलांच्या डोळ्यात नव्या भारताचं स्वप्न
चर्चेच्या सुरुवातीलाच नवनीत मुनोत यांनी बदलत्या भरातावर प्रकाशझोत टाकला, यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, आपल्याला आज महिलांच्या डोळ्यात आशा दिसत आहे, एक महत्वाकांक्षा दिसत आहे. काही तरी मोठं करून दाखवण्याचं त्यांचं स्वप्न आहे. त्यांनी आपल्या तीस वर्षांच्या अनुभवावरून सांगितलं की महिला या नेहमी पैशांची बचत करण्याच्या बाजुनं असतात. पहिल्या काळात महिला या महिनाभराच्या खर्चामधून बचत झालेले पैसे एखाद्या बरनीमध्ये, अलमारीमध्ये किंवा गादीच्या खाली लपवून ठेवायच्या, कुटुंबाला जेव्हा-केव्हा गरज पडेल तेव्हा हे पैसे कामी येतील असा या महिलांचा विचार असायचा. मात्र आता काळ बदलला आहे. आता महिलांना हे कळून चुकलं आहे की, बचत करून नाही तर पैशांची गुंतवणूक करून पैसा वाढवला जाऊ शकतो.
रिमझिम सैकिया – बदलाचं उदाहरण
तात्विक आयुर्वेद अॅण्ड वेलनेस लिमिटेडच्या एमडी रिमझिम सैकिया यांनी सांगितलं की, मी प्रदीर्घ काळ कॉर्पोरेट सेक्टरमध्ये एक आरामदायी नोकरी करत होते. मात्र मला त्यावेळी असं वाटलं की, असं काहीतरी केलं पाहिजे ज्यामुळे समाजामध्ये बदल घडेल. याच विचारातून मी तात्विक आयुर्वेदची सुरुवात केली, याच्या माध्यमातून आम्ही 22 प्रकारचे प्रोडक्स बनवतो, विशेष म्हणजे यांच्या कंपनीमध्ये 90 टक्के कर्मचारी या महिला आहेत.
दिशा गर्ग- गृहिणी ते उद्योजिका
दिशा क्लोदिंगची संस्थापिका दिशा गर्ग यांची कहाणीही प्रेरणादायक आहे. NIFT मधून पदवी घेतल्यानंतर अंगावर जबाबदाऱ्या पडल्याने त्यांनी पुढे करिअर केलं नाही. 10 वर्ष त्यांनी गृहिणी म्हणून घर सांभाळलं. त्यानंतर स्वत:चं बुटीक सेंटर उघडलं आणि आपल्या स्वप्नांना दिशा दिली.
प्रतिभा शर्मा- संकटालाच मानली संधी
11:11 स्लिमिंग वर्ल्डची संस्थापिका प्रतिभा शर्माने आव्हानांना संधीत रुपांतरीत करण्याची किमया केली आहे. आतापर्यंत एक हजाराहून अधिक ग्राहकांना सेवा दिल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल झाला आहे. बचत करण्याची सवय लावण्यामध्ये आईचा मोठा हात असल्याचं त्या सांगतात.
हीच विकसित भारताची ओळख
या संघर्ष गाथा ऐकून नवनीत मुनोत म्हणाले की, हीच विकसित भारताची खरी ओळख आहे. काळानुसार आर्थिक गोष्टीत महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं तर हे चित्र अधिकच चांगलं होईल.
गुंतवणूक आणि स्वातंत्र्याचा मार्ग
ती ज्या महिलांना आर्थिक सहकार्य देते, त्यांचं स्वतंत्र भविष्य कसं आकाराला येईल हे सुद्धा निश्चित करते हे जेव्हा रिमझिम सैकियाने विचारलं. तेव्हा मुनोत म्हणाल्या की, जागरुकता आणि योग्य दिशेने मार्गदर्शन होणं अत्यंत आवश्यक आहे. बरनीपासून स्वातंत्र्य हाच आमच्या मोहिमेचा हेतू आहे. महिलांना योग्य मार्गाला लावणं हेच आमचं काम आहे. आज जर तुम्ही भांडवली बाजारात पैसा लावत असाल तर काळानुसार तो वाढेल. त्यासाठी कमीत कमी पैशाचीही एसआयपी सुरू करता येते. पण त्यासाठी आर्थिक सल्लागारांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
योग्य गुंतवणुकीचा फॉर्म्युला
मुनोत यांच्या मते, महिलांना आर्थिक निर्णयाबाबत जागरूक आणि अपडेट राहिलं पाहिजे. गडगंज पैसा कमवायचा असेल तर योग्य गुंतवणूक हवी. संयम आणि दीर्घ काळ हवा. महिलांमध्ये संयम तर आहेच, पण दीर्घ विचार करण्याची क्षमताही आहे. या गोष्टी गुंतवणुकीत आल्या तर त्याचा रिझल्ट अधिकच चांगला होईल, असं त्या यावेळी म्हणाले. तसेच, हा बदल फक्त शहरांपुरता मर्यादित नाही. तर गाव खेड्यातील महिलाही आता गुंतवणूक करू लागल्या आहेत, असंही मुनोत यांनी यावेळी सांगितलं
पैशातून किती पैसे होतात हे महत्त्वाचं
आज महिलांसाठी कोणताच मार्ग कठीण नाहीये. मीडियापासून इतर क्षेत्रातही महिला काम करत आहेत. तुमच्याकडे किती संपत्ती आहे, याने काही फरक पडत नाही. तर तुमचा पैसा तुम्हाला किती पैसा कमावून देतो हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे केवळ बचत करून चालणार नाही. तर चांगला गुंतवणूकदारही बनलं पाहिजे, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
