Pilot Duty Hours : किती तास काम करु शकतात पायलट आणि एअर होस्टेस ? आरामासाठी काय आहेत नियम…
इंडिगो एअरलाईनच्या विमानांचा गोंधळ अजूनही सुरु आहे. याच्या ऑपरेशन्समुळे पॅसेंजर वैतागले आहेत. हे अखेर का झाले. डीजीसीएने पायलट आणि एअर होस्टेसच्या कामाचे नियम कसे केले आहेत.

भारतात एव्हीएशन इंडस्ट्रीत कार्यरत एअर होस्टेस ( केबिन क्रू ) आणि पायलटच्या जॉब खूपच ग्लॅमर असून त्याला खूप मागणी आहे. परंतू या नोकरीच्या बाहेरील रंगावर न जात आतील नियम आणि कामाचे तास हे अत्यंत जबाबदारीचे काम आहे.कारण हजारो प्रवाशांचे प्राण या स्टाफच्या कामावर अवलंबून असते. नागरी उड्डयन महासंचालनालय (DGCA) या ड्यूटीचे तासांना नियंत्रण करणारी सर्वोच्च संस्था आहे.
फ्लाईंग क्रुकडून अत्यंत थकव्यामुळे कोणतीही चूक होऊ नये यावर लक्ष ठेवणे हा DGCA चा मुख्य उद्देश्य असतो. एक थकलेला पायलट वा एअर होस्टेस उड्डाणाच्या सुरक्षेसाठी मोठा गंभीर धोका ठरु शकतो. यासाठी कामाचे तासांना शास्रीय दृष्टीकोनातून डिझाईन केले आहे.ज्यात उड्डाणाची वेळ, ग्राऊंड ड्यूटी, तयारीचा वेळ आणि अनिर्वाय आरामाची वेळ याचा समावेश असतो.
DGCA चे नियमांना फ्लाईट ड्यूटी टाईम लिमिटेशन (FDTL) नियम म्हटले जाते. त्या क्रु मेंबर्सची कामे आणि आरामा यांची सीमा निर्धारित केलेली असते. हे नियम हे देखील ठरवतात की पायलट आणि एअरहोस्टेसना उड्डाणांच्या मध्ये किती काळ आराम मिळायला हवा.
एअर होस्टेस आणि पायलट किती तास ड्यूटी करतात ?
रात्रीची उड्डाणे, सलग ड्यूटी तास आणि लांबच्या प्रवासासाठी नियम आणखी कठोर असतात. सर्व एअरलाईनसाठी नियमांचे सक्तीने पालन करणे अनिर्वाय असते. क्रू मेंबर नेहमी शारीरिक आणि मानसिक रूपाने सतर्क रहावेत हे FDTL नियम सुनिश्चित करतात. त्यामुळे उड्डाणच्या दरम्यान कोणत्याही आपात्कालिन स्थितीला सांभाळण्यासाठी ते तयार असावेत असा प्रयत्न असतो.
पायलटसाठी DGCA FDTL नियम
| वेळेची मर्यादा | कमाल ड्यूटीचे तास |
|---|---|
| एका दिवसात | १० ते १३ तास ( ही वेळ उड्डाणाचे स्वरूप आणि दिवसाच्या वेळेवर अवलंबून असते) |
| एका आठवड्यात | कमाल ६० तासांपर्यंत |
| एका महिन्यात | कमाल १९० तासांपर्यंत |
| सलग उड्डाणादरम्यान सक्तीची विश्रांती | किमान ९ ते १२ तास |
| मजेशीर गोष्ट | जर एखाद्या पायलटला सलग सात दिवस ड्युटीवर ठेवले तर त्याला DGCA नियमांर्गत ३६ तासांची सक्तीचा आराम द्यावा लागतो |
एअर होस्टेस (केबिन क्रू)साठी नियम
एअर होस्टेसचे ड्यूटीचे तास देखील FDTL नियमांतर्गत येतात आणि पायलटसाठी समान असतात.त्यांना उड्डाण सुरक्षा सुनिश्चित करायची असते.
एअर होस्टेससाठी (क्रु मेंबर) DGCA FDTL नियम
| वेळेची मर्यादा | कमाल ड्यूटीचे तास |
|---|---|
| एका दिवसात ( उड्डाण ) | ८ ते १० तास ( लांबच्या उड्डाणासाठी एक्स्ट्रा क्रु असतो ) |
| एका महिन्यात | १०० तासांहून अधिक वेळ |
| मजेशीर तथ्य | केबिन क्रुला ड्युटी सुरु होण्यासाठी किमान एक तास आधी एअरपोर्टला पोहचावे लागते.यास रिपोर्टींग टाईम म्हणतात. याला ड्युटी अवर्स मध्ये मोजले जाते. |
डीजीसीएचे नियम का गरजेचे ?
DGCA चे नियम क्रु फटीग (Crew Fatigue) रोखण्यासाठी बनवले जाते. अत्यंत थकव्यामुळे रिएक्शन टाईम धीमा होतो. ज्यामुळे आपात्कालिन स्थिती धोका वाढतो. या नियमांचे उल्लंघन केल्यानंतर एअरलाईनवर मोठा दंड लावला जातो. हे नियम वेळोवेळी अपडेट होत असतात. परंतू ज्या बेसिक मर्यादा ( उदा. एका दिवसात कमाल ड्यूटी, साप्ताहिक आरामाची गरज ) आहेत. त्या प्रदीर्घ काळापासून उड्डाण क्रुच्या सुरक्षा आणि थकवा व्यवस्थापन (Fatigue Management) साठी मानक आहेत.
