AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ बँकांमध्ये तुमचं खातं आहे का, IFSC कोड झाला एक्पायर, नवीन कोड कसा मिळवाल?

IFSC Code | आयएफएससी कोड बंद झाल्यानंतर याचा थेट परिणाम खातेदारांवर होणार आहे. कारण, कुठल्याही ऑनलाईन व्यवहारासाठी तुम्हाला बँकेचा आयएफएससी कोड लागतो. यामुळे त्वरित तुमचा नवा कोड माहिती करून घ्या अन्यथा तुम्ही पैसे ट्रान्सफर करू शकत नाही.

'या' बँकांमध्ये तुमचं खातं आहे का, IFSC कोड झाला एक्पायर, नवीन कोड कसा मिळवाल?
आयएफएससी कोड
| Edited By: | Updated on: Jul 11, 2021 | 1:11 PM
Share

मुंबई: केंद्र सरकारच्या निर्णयानंतर सार्वजनिक क्षेत्रातील काही बँकांचे विलीनीकरण झाले आहे. त्यामुळे सिंडिकेट बँक, अलाहाबाद बँक आणि युनायटेड बँकेच्या IFSC कोडमध्ये बदल झालाय. त्यामुळे आता जुन्याच तपशीलाच्याआधारे व्यवहार करायला गेल्यास तुम्हाला ऑनलाईन आणि नेट बँकिंगच्या माध्यमातून व्यवहार करता येणार नाही. नवा IFSC कोड मिळवण्यासाठी एकतर तुम्हाला नजीकच्या शाखेशी संपर्क साधावा लागेल किंवा ऑनलाईन पद्धतीने नवा कोड मिळवता येईल. (How to get new ifsc code of banks)

ग्राहकांवर काय होणार परिणाम?

आयएफएससी कोड बंद झाल्यानंतर याचा थेट परिणाम खातेदारांवर होणार आहे. कारण, कुठल्याही ऑनलाईन व्यवहारासाठी तुम्हाला बँकेचा आयएफएससी कोड लागतो. यामुळे त्वरित तुमचा नवा कोड माहिती करून घ्या अन्यथा तुम्ही पैसे ट्रान्सफर करू शकत नाही.

नवा IFSC कोड मिळवण्यासाठी काय कराल?

नवा IFSC कोड मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या बँक स्टेटमेंटची एक प्रत जमा करावी लागेल. याशिवाय, तुम्ही रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून रिक्वेस्टही पाठवू शकता. बँकेत जाऊन IFSC कोड मिळवण्यासाठी तुम्हाला जुने पासबूक आणि चेकबूक सबमिट करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला नवा IFSC कोड असणारे चेकबूक आणि पासबूक दिले जाईल.

कोणत्या बँकाचे IFSC कोड रद्द?

सिंडिकेट बँक, अलाहाबाद बँक आणि युनायटेड बँक, विजया बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, आंध्रा बँक अँण्ड कॉर्पोरेशन या बँकांचे इतर बँकांमध्ये विलिनीकरण झाले आहे. त्यामुळे या बँकांचा जुना IFSC कोड रद्द झाला आहे.

आयएएफसी कोड(IFSC Code) म्हणजे काय?

आयएएफसी म्हणजे 11 अंकांचा एक कोड असतो. रिझर्व्ह बँकेकडून सर्व बँकांना हा कोड दिला जातो. अकरा अंकांच्या या कोडचा इलेक्ट्रिक पेमेंटसाठी वापर केला जातो. याच्या सुरुवातीच्या चार अंकांवरुन बँकेचे नाव कळते. यात पाचवा अंक शून्य असतो. नंतरच्या 6 अंकांवरुन बँक शाखेचा कोड कळतो.

संबंधित बातम्या:

ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करताना IFSC कोड चुकीचा टाकला? जाणून घ्या पुढे काय होईल…

बँकांचे IFSC Code बदलणार !

(How to get new ifsc code of banks)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.