LIC Policy: एलआयसीच्या प्रत्येक पॉलिसीची माहिती मिळणार एका क्लिकवर

एलआयसीशी संबंधित प्रत्येक माहिती तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी तुम्हाला भारतीय जीवन विमा महामंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर तुमचा मोबाईल क्रमांक अपडेट करावा लागेल. यासाठी तुम्हाला प्रथम LIC च्या अधिकृत वेबसाइट www.licindia.in वर जावे लागेल. त्याठिकाणी कस्टमर सर्व्हिस या पर्यायावर क्लिक करावे.

LIC Policy: एलआयसीच्या प्रत्येक पॉलिसीची माहिती मिळणार एका क्लिकवर
एलआयसी
Follow us
| Updated on: Oct 04, 2021 | 12:43 PM

नवी दिल्ली: एलआयसीची एखादी पॉलिसी खरेदी करायची असल्यास अनेकदा त्यांच्या कार्यालयात खेटे मारावे लागतात. एलआयसीच्या अनेक योजना असल्यामुळे आपल्यासाठी नक्की कोणती पॉलिसी योग्य आहे, हे अनेकांना कळत नाही. त्यामुळे अनेकांचा गोंधळ उडतो. मात्र, एका नव्या सुविधेमुळे तुमचे हे कष्ट वाचणार आहेत. आता पॉलिसीशी संबंधित कोणत्याही प्रकारची माहिती किंवा अपडेटससाठी एलआयसी एजंटला भेट देण्याची गरज नाही. आता तुम्हाला तुमच्या फोनवर एलआयसी पॉलिसी, कोणतीही नवीन स्कीम किंवा जुन्या स्कीममधील कोणतेही नवीन बदल संबंधित सर्व माहिती मिळेल. यासाठी तुम्हाला एका सोप्या प्रक्रियेचे पालन करावे लागेल.

काय असेल प्रक्रिया?

एलआयसीशी संबंधित प्रत्येक माहिती तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी तुम्हाला भारतीय जीवन विमा महामंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर तुमचा मोबाईल क्रमांक अपडेट करावा लागेल. यासाठी तुम्हाला प्रथम LIC च्या अधिकृत वेबसाइट www.licindia.in वर जावे लागेल. त्याठिकाणी कस्टमर सर्व्हिस या पर्यायावर क्लिक करावे.

या श्रेणीवर क्लिक केल्यानंतर, वापरकर्त्यांना स्क्रीनवर आणखी अनेक उपश्रेणी दिसतील. वापरकर्त्यांना या श्रेणींमध्ये तुमचे संपर्क तपशील अपडेट करा या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यावर क्लिक केल्यानंतर वापरकर्ता नवीन टॅब ओपन होईल. या पृष्ठावर, वापरकर्त्याला विनंती केलेली सर्व माहिती भरावी लागेल. सर्व माहिती भरल्यानंतर, वापरकर्त्याला डिक्लरेशनबद्दल विचारले जाईल आणि त्यानंतर माहिती समबिट करावी लागेल.

या प्रक्रियेनंतर, जर तुम्ही LIC चे ग्राहक असाल तर तुम्हाला तुमचा पॉलिसी नंबर विचारला जाईल. त्यानंतर पॉलिसीचे आणखी काही तपशील विचारले जातील. ही सर्व माहिती अपडेट झाल्यानंतर कोणतीही नवीन पॉलिसी किंवा जुन्या पॉलिसीमधील कोणतेही अपडेट तुमच्या फोनवर सूचना मिळू लागतील.

एलआयसीची पॉलिसी आधारकार्डाला लिंक केल्यास मिळतात ‘हे’ फायदे

आपण आतापर्यंत पॅनकार्ड, पीएफ अकाऊंट किंवा बँक अकाऊंट आधारशी लिंक करण्यासंदर्भातील सूचना अनेकवेळा ऐकल्या असतील. या सर्व गोष्टी आधारशी लिंक केल्याने अनेक फायदे मिळू शकतात. केंद्र सरकारकडून पॅनकार्ड, पीएफ अकाऊंट आणि बँक खाते आधारशी लिंक करणे सक्तीचे करण्यात आले आहे. अन्यथा भविष्यात तुम्हाला आर्थिक व्यवहार करणे जवळपास अशक्य होऊन बसेल.

मात्र, तुम्ही एलआयसी पॉलिसी आधारशी लिंक करण्यासंदर्भात कदाचित ऐकले नसले. परंतु, यामुळे अनेक फायदे मिळू शकतात. एलआयसी पॉलिसी आधारशी लिंक करणे बंधनकारक नाही. पण तसे केल्यास जेव्हा पॉलिसीच्या मॅच्युरिटीचा कालावधी पूर्ण होतो तेव्हा पैसे काढणे आणखी सुलभ होते.

संबंधित बातम्या:

बंद झालेली एलआयसी पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची संधी, विलंब शुल्कावर विशेष सवलत, जाणून घ्या संपूर्ण तपशील

एलआयसी पॉलिसीवरही ऑनलाईन कर्जाची सुविधा, कोणताही हप्ता भरावा लागणार नाही

एलआयसीची पॉलिसी आधारकार्डाला लिंक केल्यास मिळतात ‘हे’ फायदे

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.