Share Market : 4 जूनला निकाल येताच शेअर बाजार तोडेल सर्व रेकॉर्ड; पंतप्रधान नरेंद्र मोदी उघडपणे बोलले पहिल्यांदाच

PM Modi Share Market : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी पण भारतीय शेअर बाजार लवकरच सर्वकालीन उच्चांक गाठण्याकडे इशारा केला होता. आता त्यांनी उघडपणे 4 जूननंतर एक आठवडा शेअर बाजारात काय कमाल होते, याविषयी स्पष्ट भूमिका मांडली.

Share Market : 4 जूनला निकाल येताच शेअर बाजार तोडेल सर्व रेकॉर्ड; पंतप्रधान नरेंद्र मोदी उघडपणे बोलले पहिल्यांदाच
शेअर बाजारात येणार तुफान
Follow us
| Updated on: May 21, 2024 | 9:27 AM

देशात लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election 2024) सुरु झाल्यापासून शेअर बाजारात चढउताराचे सत्र सुरु आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी तर अगोदरच चंबुगबाळे उचलून पोबारा केला आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक निकालानंतर सरकारी शेअर तेजीत येण्याचे संकेत दिले होते. आता एका मुलाखतीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर बाजाराविषयी उघडपणे भूमिका घेतली आहे. 4 जूननंतर पुढील आठवडाभर शेअर बाजार नवीन उच्चांकावर असेल, असा दावा त्यांनी केला आहे.

शेअर ऑपरेट करणारे थकतील

  1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका टीव्ही न्यूज चॅनलला मुलाखत दिली. त्यात त्यांनी शेअर बाजाराविषयी भाकित केले. लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून 2024 रोजी लागेल. हा निकाल आल्यानंतर भारतीय शेअर बाजाराचे यापूर्वीचे सर्व रेकॉर्ड इतिहासजमा होतील. बाजार नवीन उच्चांक गाठेल. अनेक रेकॉर्ड मोडीत निघतील.
  2. ” तुम्ही पाहाच, निवडणुकीचे निकाल आल्यानंतर संपूर्ण आठवडा अशी काही ट्रेडिंग होईल की त्याला ऑपरेट करणारे थकतील.” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांनी एका दशकाच्या घौडदौडीची आकडेमोड समोर ठेवली. गेल्या 10 वर्षांत शेअर बाजार 25,000 रुपयांहून 75,000 रुपयांवर पोहचल्याचे त्यांनी निर्देशीत केले.
  3. हे सुद्धा वाचा

स्टॉक मार्केटमुळे अर्थव्यवस्थेला मजबुती

मोदींनी शेअर बाजार आणि अर्थव्यवस्थेविषयी पण भाष्य केले. शेअर बाजारात जोरदार तेजी येईल असे ते म्हणाले. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर सध्या घौडदौड करत आहेत. जितके अधिक गुंतवणूकदार शेअर बाजारात गुंतवणूक करतील. तितकी अर्थव्यवस्था मजबूत होईल. सरकारने अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी, गतिमान करण्यासाठी सर्वाधिक आर्थिक बदल केल्याचे त्यांनी नमूद केले. उद्योग वाढीला चालना देण्यासाठी आर्थिक धोरण लागू केले, त्याचा परिणाम स्पष्टपणे दिसत असल्याचे ते म्हणाले.

जोखीम घेण्याची क्षमता हवी

“नागरिकांमध्ये जोखीम घेण्याची क्षमता वाढली पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. काय होईल आणि मी काय करु? अशा विचाराने कोणतेही काम होत नाही. पूर्वी PSU शेअरमध्ये सातत्याने घसरण दिसत होती. पण आज या क्षेत्राने उसळी घेतली आहे. विरोधक HAL विषयी सर्वप्रकारच्या चर्चा करत होते. आज या कंपनीची परिस्थिती बदलली आहे. चौथ्या तिमाही निकालात या कंपनीचा नफा 4000 कोटी रुपयांच्या घरात पोहचला आहे.”, असे मोदींनी स्पष्ट केले.

बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...