AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ग्राहकांना अजून एक गुडन्यूज; LPG सिलेंडर स्वस्त होणार? GST कपातीचा मिळणार दिलासा?

LPG Cylinder Cheaper : कोट्यवधी एलपीजी ग्राहकांना 22 सप्टेंबरनंतर पुन्हा गुडन्यूज मिळेल का, याची चर्चा सुरू झाली आहे. कारण जीएसटी कपातीचा अनेक वस्तूंवर थेट परिणाम दिसणार आहे. 22 सप्टेंबरनंतर जीएसटीचे नवीन दर लागू होतील. तुमचा एलपीजी सिलेंडर स्वस्त होणार का?

ग्राहकांना अजून एक गुडन्यूज; LPG सिलेंडर स्वस्त होणार? GST कपातीचा मिळणार दिलासा?
जीएसटी बदलाचा होईल फायदा?
| Updated on: Sep 20, 2025 | 12:30 PM
Share

New GST Rates On LPG : 22 सप्टेंबरनंतर GST Reforms अंतर्गत अनेक बदल होतील. नवीन जीएसटी दर लागू होतील. त्याचा अनेक वस्तूंच्या किंमतींवर थेट परिणाम होईल. देशातील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळेल. खाद्यपदार्थांसह अनेक दैनंदिन वस्तू स्वस्त होतील. जीएसटी कपातीमुळे आता एलपीजी गॅस सिलेंडर सुद्धा स्वस्त होतील का? अशी चर्चा रंगली आहे. 22 सप्टेंबरनंतर एलपीजी गॅस सिलेंडरचा भाव (LPG Cylinder Price) खरंच कमी होतील का?

घरगुती आणि व्यावसायिक LPG सिलेंडरवर वेगवेगळा GST

एलपीजी सिलेंडर भारतीय घरांमध्ये, रेस्टॉरंट, हॉटेल आणि अन्न उद्योगात उपयोगी ठरतो. इंधन म्हणून गॅसचा वापर होतो. पण घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलेंडरवर वेगवेगळा जीएसटी लागू आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही घरातील स्वयंपाक घरात जेवण तयार करत असाल अथवा हॉटेलमध्ये जेवण तयार होत असेल तर त्यावर किती जीएसटी आकारल्या जातो, त्यावरुन ग्राहकांना किती अधिकची रक्कम मोजावे लागते हे गणित स्पष्ट होते.

घरगुती गॅसवर किती जीएसटी?

घरगुती गॅससाठी किती जीएसटी लागू होतो? हे अनेकांना माहिती नाही. 3 सप्टेंबर रोजी जीएसटी परिषदेच्या बैठकीत घरगुती एलपीजी सिलेंडवरील जीएसटी दरात कोणताही बदल झालेला नाही. 22 सप्टेंबर रोजी घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरवर 5 टक्क्यांचा जीएसटी लागेल. त्यामुळे ग्राहकांना कोणताही दिलासा मिळणार नसल्याचे दिसत आहे. गेल्या काही वर्षात एलपीजी गॅसच्या किंमती दुप्पट झाल्याने ग्राहक नाराज आहेत.

नवीन जीएसटी दर आता किती

  • घरगुती गॅस (सबसिडी) 5 टक्के
  • घरगुती गॅस (विना सबसिडी) 5 टक्के

व्यावसायिक गॅस सिलेंडवर किती जीएसटी?

3 सप्टेंबर रोजी जीएसटी परिषदेच्या बैठकीत घरगुती एलपीजी सिलेंडवरील जीएसटी दरात कोणताही बदल झालेला नाही. 22 सप्टेंबर रोजी घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरवर व्यावसायिक ग्राहकांना 18 टक्के जीएसटी द्यावा लागणार आहे. त्यामुळे व्यावसायिक ग्राहकांना सुद्धा जीएसटी परिषदेच्या जीएसटी कपातीचा कोणताही दिलासा मिळाला नसल्याचे दिसून येते. म्हणजे 22 सप्टेंबरनंतर घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल दिसणार नाही.

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.