कोरोनामुळं कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास ‘ही’ कंपनी 5 वर्षांचा पगार देणार, वारसदारांचा 3 वर्षांचा विमा काढणार

कोरोना विषाणू संसर्गामुळे भारतात तीन लाखांपेक्षा जास्त व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. Mankind Pharma COVID protection Policy

कोरोनामुळं कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास ‘ही’ कंपनी 5 वर्षांचा पगार देणार, वारसदारांचा 3 वर्षांचा विमा काढणार
Cash-
Follow us
| Updated on: Jul 22, 2021 | 11:54 AM

नवी दिल्ली: कोरोना विषाणू संसर्गामुळे भारतात तीन लाखांपेक्षा जास्त व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. कोरोना वाढत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतातील विविध खासगी कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. टाटा, महिंद्रा, बजाज यानंतर मॅनकाईंड फार्मा या कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी कोविड प्रोटेक्शन पॉलिसी सुरू केली आहे. कंपनीच्या एखाद्या कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला पुढील पाच वर्ष त्याच्या पगाराइतकी रक्कम दिली जाईल. ही रक्कम 50 लाख रुपयांपर्यंत असू शकते. मॅनकाईंड फार्मा कंपनी त्या कर्मचाऱ्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींना तीन वर्षापर्यंतचा ग्रुप मेडिकल पॉलिसी देखील देण्याची शक्यता आहे.(Mankind Pharma announced COVID protection policy to support families of employee who died due to corona)

कर्मचाऱ्याच्या वारसदाराला 7 लाख रुपये मिळणार

मॅनकाईंड फार्मा कंपनीने कर्मचाऱ्यांना एम्पलोयी डिपॉझिट इन्शुरन्स स्कीम या अंतर्गत विमा संरक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या कायदेशीर वारसदाराला सात लाख रुपयांपर्यंतची रक्कम दिली जाईल.

मॅनकाईंड फार्मामध्ये 14 हजार कर्मचारी कार्यरत

दिल्ली येथील मॅनकाईंड फार्मा कंपनी मध्ये 14 हजार कर्मचारी काम करतात. मॅनकाईंड फार्माचे कार्यकारी अध्यक्ष आर.सी. जुनेजा यांनी या विषयी बोलताना कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर आर्थिक बोजा पडू नये यासाठी कंपनी थोडाफार प्रयत्न करत आहे, असं सांगितलं. कंपनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी कटिबद्ध असून त्यांचं संरक्षण करणं आपली जबाबदारी मानते, असंही ते म्हणाले.

आतापर्यंत कोणत्या कंपन्यांनी कर्मचार्‍यांना मदतीची घोषणा केली?

टाटा स्टील कंपनीने कोरोनाच्या संसर्गामुळे एखादा कर्मचारी मृत झाल्यास त्याच्या नातेवाईकांना 60 वर्षे म्हणजेच निवृत्तीच्या वयापर्यंत पूर्ण पगार देण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे टाटा मोटर्सने कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती पर्यंतच्या म्हणजेच किंवा 50 वर्षे वयापर्यंत मूळ पगार देण्याची घोषणा केली. बजाज ऑटो कंपनीने देखील त्यांच्या कंपनीतील कायम असलेल्या कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू झाल्यास दोन लाख रुपयांपर्यंतची सॅलरी देण्याचा आणि कर्मचाऱ्यांच्या मुलांचं बारावीपर्यंत शिक्षणाचा खर्च उचलणार असल्याचे देखील जाहीर केले आहे.

संबंधित बातम्या:

कोरोनामुळं कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास ‘ही’ कंपनी 2 वर्षांचा पगार देणार, मुलांच्या शिक्षणाचा खर्चही करणार

मोठा दिलासा! Tata Steel ने ऑक्सिजन पुरवठा वाढवला, आता दररोज 600 टन ऑक्सिजन तयार होणार

Mankind Pharma announced COVID protection policy to support families of employee who died due to corona

Non Stop LIVE Update
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.