Paytm | पेटीएमचे कारनामे आले समोर; 1000 बँक खाती 1 पॅनकार्डवर

Paytm | RBI ने पेटीएम पेमेंट्स बँकेवर कारवाईचा आसूड ओढला. पेटीएमला नवीन ग्राहक जोडता येणार नाही. तर या महिन्याच्या अखेरीस ग्राहकांना त्यांच्या खात्यात रक्कम जमा करता येणार नाही. अर्थात ज्यांच्या खात्यात रक्कम आहे, त्यांना खात्यातून ही रक्कम काढता येईल. त्यावर बंदी नाही.

Paytm | पेटीएमचे कारनामे आले समोर; 1000 बँक खाती 1 पॅनकार्डवर
Follow us
| Updated on: Feb 04, 2024 | 3:12 PM

नवी दिल्ली | 4 February 2024 : पेटीएम पेमेंट्स बँक सध्या चर्चेत आहे. बँकेची विविध कारनामे समोर आल्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने तिच्यावर बंदी आणली. कारवाईचा बडगा उगारला. या कारवाईचा ग्राहकांवर मोठा परिणाम होणार नाही. अनेकांना बँकेवर ही कारवाई कशामुळे करण्यात आली, याविषयी अजूनही संभ्रम आहे. पेटीएम बँक सातत्याने आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वांचे आणि निर्देशांचे उल्लंघन करत असल्याचे समोर आले होते. पण पेटीएमचे कारनामे यावरुनही मोठे होते.

मनी लाँड्रिंगची शंका

बँकेवर सर्वात मोठा ठपका मनी लाँड्रिंगचा करण्यात येत आहे. तर केवायसी न करता अनेक बँक खाती सुरु करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यात 1,000 हून अधिक बँक खाती केवळ एकाच पॅन कार्ड आधारे उघडण्यात आल्याचे निष्पन्न झाले. आरबीआय आणि लेखापालांनी बँकेचा अनुपालन अहवाल तपासल्यावर त्यात अनेक कारनामे समोर आले. त्यात आरबीआयला मनी लाँड्रिंगची शंका येत आहे.

हे सुद्धा वाचा

पीएमओपर्यंत पोहचली कागदपत्रे

आरबीआयने त्यांच्या तपासाात समोर आलेली माहिती, ईडी, गृह मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयाला पाठवली आहे. महसूल सचिव संजय मल्होत्रा ​​यांनी जागतिक वृत्तसंस्था रॉयटर्सला सांगितले की, या आरोपात तथ्य आढळल्यास अंमलबजावणी संचालनालय, ईडी पेटीएम पेमेंट्स बँकेची चौकशी करेल.

समूहातंर्गत अनेक शंकास्पद व्यवहार

पेटीएम समूहातंर्गत अनेक व्यवहार झाले आहेत. ते सध्या रडारवर आहेत. कारण या व्यवहारांमध्ये पारदर्शकता नाही. केंद्रीय बँकेने, या व्यवहारांमध्ये अनेक अनियमतता असल्याचे म्हटले आहे. पेटीएम पेमेंट्स बँक आणि मूळ कंपनी वन97 कम्युनिकेशन्स यांच्यात अनेक त्रुटी असताना व्यवहार झाल्याचे तपासात समोर येत आहे. तसेच पेटीएमच्या माध्यमातून करण्यात आलेल्या व्यवहाराचा डाटा सुरक्षीत नसल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे आरबीआयने पेटीएमवर कारवाईचा बडगा उगारला आहे. आरबीआयच्या कारवाईनंतर शुक्रवारी पेटीएमच्या शेअरमध्ये मोठी पडझड दिसून आली. दोन दिवसांत पेटीएमच्या शेअरमध्ये 36% घसण दिसली. या कंपनीचे बाजारातील मूल्य 2 अब्ज डॉलरने घसरले.

पेटीएमवर ही बंदी

  • RBI ने पेटीएमवर अनेक प्रकारचे प्रतिबंध लावले आहेत.
  • 29 फेब्रुवारीनंतर पेमेंट बँकेमध्ये ग्राहकांना रक्कम जमा करता येणार नाही
  • 11 मार्चनंतर ग्राहक जोडण्याची प्रक्रिया बंद होईल
  • ग्राहकांना सध्या बँकेतून रक्कम काढण्यास परवानगी आहे
  • पण बँकिंग सेवा अवघ्या महिना भरातच ठप्प होईल
Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.