AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Price Today : 14 दिवसात 12 वेळा पेट्रोल डिझलेची दरवाढ, आतापर्यंत 8.40 रुपये वाढले, महागाईचा शॉक सुरुच

केंद्र सरकारनं पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किमतीवरील नियंत्रण हटवल्यानंतर देशातील ऑईल कंपन्यांकडून दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले जातात. ऑईल कंपन्या रोज सकाळी दरवाढ जाहीर करतात.

Petrol Diesel Price Today : 14 दिवसात 12 वेळा पेट्रोल डिझलेची दरवाढ, आतापर्यंत 8.40 रुपये वाढले, महागाईचा शॉक सुरुच
पेट्रोल-डिझेलवर केंद्र सरकार देणार नाही सवलतImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 04, 2022 | 7:18 AM
Share

मुंबई : केंद्र सरकारनं पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किमतीवरील नियंत्रण हटवल्यानंतर देशातील ऑईल कंपन्यांकडून दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले जातात. ऑईल कंपन्या रोज सकाळी दरवाढ जाहीर करतात. देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांमुळं ही प्रक्रिया थांबली होती. आता निवडणुका संपल्यानंतर दरवाढीचा शॉक सर्वसामान्यांना बसत आहे. गेल्या 14 दिवसांमध्ये तब्बल 12 वेळा इंधनदरवाढ (Fuel Rates hike) करण्यात आली आहे. आतापर्यंत 8 रुपये 40 पैशांनी डिझेल आणि पेट्रोलच्या किमती वाढल्या आहेत. दुसरीकडे वाढत्या महागाईवरुन विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतलीय. महाराष्ट्रात युवा सेनेकडून थाळी बजाव आंदोलन करण्यात आलं होतं. तर, उबरनं देखील त्यांच्या सेवेत दरवाढ करण्याचा निर्णय घेतलाय. मुंबई पेट्रोल 118.81 रुपये तर डिझेल 103.04 रुपयांना विकलं जातंय. तर, पुणे शहारत 118.29 रुपयांवर पोहोचलंय. तर डिझेल 101.01 रुपयांवर पोहोचलंय.

देशातील प्रमुख शहरांसह महाराष्ट्रातील शहरांचा भाव

  1. देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर 103.81 रुपयांवर पोहोचला आहे. तर, डिझेलचा दर 95.07 रुपयांवर पोहोचलाय.
  2. आर्थिक राजधानी मुंबईतील पेट्रोलचा दर 118.81 रुपये तर डिझेलचा दर 103.04 पैशांवर पोहोचला आहे. आज लीटरमागे 40 पैशांची वाढ झाली आहे.
  3. चेन्नईतील पेट्रोलचा दर 109.36 रुपयांवर डिझेलचा दर 99.44 वर पोहोचला आहे.
  4. कोलकातामधील पेट्रोलचे दर 113.43 रुपयांवर पोहोचले आहेत. तर डिझेल 98.22 रुपयांना विकलं जात आहे.
  5. पुण्यात पेट्रोलचे दर देखील वाढले आहेत. पेट्रोलचे दर 118.29 रुपयांवर पोहोचले आहेत. तर पॉवर पेट्रोलचे दर 122.79 रुपयांना विकलं जातंय. डिझेलचे पुण्यातील दर 101.01 वर पोहोचले आहेत. तर,सीएनजी गॅसची किंमत 62.20 रुपयांवर पोहोचले आहेत.

ट्विट

महाराष्ट्रातील प्रमुख शहरपेट्रोल डिझेल
ठाणे   118.08    100.88
सातारा 119.03   101.73
सांगली 118.74  101.48
कोल्हापूर 118.91 101.65
लातूर 119.66   102.35
औरंगाबाद 120.28 102.85
नागपूर 118.84  101.58

उबरकडून प्रवासी भाड्यात वाढ

इंधन दरवाढीमुळे ‘उबर’ने पुण्यातही प्रवासी भाड्यात 15 टक्क्यांनी वाढ केली आहे. कंपनीने नुकतीच याबाबतची घोषणा केली आहे. इंधनाचे दर सातत्याने वाढत असल्याने नाइलाजाने निर्णय घेतल्याचे उबरने स्पष्ट केलंय. इंधनदराच्या चढ-उतारावर कंपनीचे लक्ष आहे. त्यानुसार आगामी काळातही प्रवाशांसाठी आवश्यक ते निर्णय घेण्यात येतील, असेही कंपनीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले

इतर बातम्या :

IPL 2022, Orange Cap : ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आला लिविंगस्टोन आणि शिवम, परपल कॅपमध्येही बदल

Maharashtra News Live Update : राज ठाकरेंच्या भाषणानंतर वातावरण बदललं, भाजप मनसेची जवळीक वाढणार?

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.