Foxconn-Vedanta | गुजरातमध्ये प्लँट, महाराष्ट्रात राजकारण तर चीनसहीत तैवानच्या डोक्याला ताप, एका प्रकल्पाचे तीन परिणाम..

Foxconn-Vedanta | वेदांताने गुजरातमध्ये चिप , सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प सुरु करण्याचा करार केला आणि त्यावरुन महाराष्ट्रात राजकीय घमासान सुरु असतानाच आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्याचे पडसाद उमटत आहे.

Foxconn-Vedanta | गुजरातमध्ये प्लँट, महाराष्ट्रात राजकारण तर चीनसहीत तैवानच्या डोक्याला ताप, एका प्रकल्पाचे तीन परिणाम..
प्रकल्प एक, परिणाम तीन Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 16, 2022 | 11:57 AM

Foxconn-Vedanta | वेदांता प्रकल्प (Vedanta Plant) राज्यबाहेर गेल्यावरुन महाराष्ट्रात राजकीय घमासान (Political War) सुरु आहे. तर आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनलाही (Chiana) यामुळे धडकी भरली आहे. तैवानच्याही (Taiwan) डोक्याला ताप झाला आहे. एकाच प्रकल्पाचे हे तीन परिणाम जाणून घेऊयात..

तैवान येथील फॉक्सकॉनसोबत भारतीय वेदांता ग्रुपने करार केला. या कंपन्या गुजरातमधील अहमदाबाद जवळ चिप, सेमीकंडक्टरचे उत्पादन सुरु करणार आहेत.

या प्रकल्पासाठी 1.54 लाख रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. या संयुक्त प्रकल्पात वेदांता समुहाचा 60 टक्के वाटा असेल. तर फॉक्सकॉन 40 टक्के भागीदार असेल.

हे सुद्धा वाचा

या प्रकल्पात सेमीकंडक्टर, डिस्प्ले ग्लास तयार करण्यात येतील. या प्रकल्पामुळे ऑटोमोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात आवश्यक चिपचे उत्पादन करण्यात येईल.

या प्रकल्पामुळे मात्र महाराष्ट्रात राजकारण तापले आहे. हा प्लँट अगोदर पुण्याजवळील तळेगाव येथे उभारण्यात येणार होता. यापूर्वीच्या सरकारसोबत सोपास्कारही झाला होता.

पण अचानक कंपनीने गुजरात राज्याकडे मोर्चा वळविला. त्यावरुन महाराष्ट्रात राजकारण तापले. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने नव्या सरकारची या मुद्यावरुन कोंडी केली.

माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी हे सरकार, स्वतःसाठी खोका आणि महाराष्ट्राला धोका देत असल्याचा जोरदार हल्ला चढवला. उद्योजकांना सरकारवर विश्वास नसल्यानेच प्रकल्प अचानक राज्यबाहेर गेल्याचा त्यांनी आरोप केला.

या प्रकल्पामुळे राज्यातील तरुणांना 1 लाख नोकऱ्यांची संधी होती. ही संधी राज्याने गमावल्याचा आरोप विरोधकांनी केला. तळेगाव जवळील 1,000 एकर जमीन या प्रकल्पासाठी देण्याचे ठरले होते. सर्व प्रक्रिया अंतिम टप्प्यात होती. परंतु, अचानक कंपनीने गुजरातचा रस्ता धरला.

प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने राज्य सरकारला मोठा झटका बसला आहे. तर विरोधकांना आयते कोलीत मिळाले आहे. राज्यात या मुद्यावरुन राजकारण तापलं आहे. या प्रकल्पाचे देशातंर्गत परिणाम आपण पाहिले. आता या प्रकल्पाचे आंतरराष्ट्रीय पडसादही पाहुयात..

चिप आणि डिस्प्ले उत्पादनात सध्या तैवान, चीन-हाँगकाँग, दक्षिण कोरिया यांचा दबदबा आहे. एकट्या तैवानचा सेमीकंडक्टर उत्पादनात 92 टक्के वाटा आहे. आता भारतात सेमीकंडक्टर आणि चिपचे उत्पादन सुरु होणार आहे. त्यामुळे या देशातील बाजारपेठेला धक्का बसणार आहे.

एका रिपोर्टनुसार, 2026 पर्यंत भारत सेमीकंडक्टर आणि चिपची 17 टक्के गरज देशातूनच पूर्ण करेल. त्यामुळे आयातीवरचा खर्च कमी होईल.इंडिया सेमीकंडक्टर मार्केट रिपोर्ट 2019-2026 नुसार, भारतात 300 अरब डॉलरची बाजारपेठ उभी राहील.

इलेक्ट्रॉनिक आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील चीनी कंपन्यांच्या वर्चस्वाला धक्का बसेल. त्यामुळे येत्या 5 वर्षातच त्यांना भारताशी स्पर्धा करावी लागणार आहे.

Non Stop LIVE Update
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.