PMSBY Scheme | 31 मेपर्यंत किमान 12 रुपये बँक खात्यात ठेवा, 2 लाखांचा नफा मिळवा!

PMSBY योजनेसाठी बँकेत अर्ज भरल्यास किंवा त्याच्या बँकेच्या नेटबँकिंगवर लॉगिन करून ऑनलाईन अर्ज करता येतो. (PMSBY Scheme All details)

मुंबई : बँक त्यांच्या बचत खातेधारकांना पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेत (PMSBY) प्रीमियम वजा करण्याबाबत एसएमएस (SMS) पाठवत आहेत. ज्यांनी PMSBY योजनेसाठी नावनोंदणी केली आहे. त्यांच्यासाठी बँक खाते डेबिट केले जाणार आहे. PMSBY योजनेसाठी बँकेत अर्ज भरल्यास किंवा त्याच्या बँकेच्या नेटबँकिंगवर लॉगिन करून ऑनलाईन अर्ज करता येतो. (PMSBY Scheme Pay Rs 12 Get An Insurance Cover of 2 Lakh Know Details)

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत (PMSBY) एखाद्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू आणि अपंगत्वाचा विमा प्रदान केला जातो. ही योजना एक वर्षासाठी असते. दरवर्षी याचे नूतनीकरण करणे गरजेचे आहे. ज्यांनी यापूर्वीच पीएमएसबीवाय योजनेसाठी नावनोंदणी केली आहे. त्यांच्या खात्यातून ऑटो डेबिट सुविधेद्वारे 12 रुपये (GST सह) प्रिमियम वजा केला जाईल. दरवर्षी 25 मे ते 31 मे दरम्यान हे पैसे डेबिट केले जातील.

पैसे कधी वजा केले जातात?

पॉलिसीच्या नूतनीकरणासाठी प्रीमियम 25 मे ते 31 मे दरम्यान आपोआप डेबिट केले जातील. जोपर्यंत एखादा खातेधारकाने बँकेला पॉलिसी रद्द करण्याची विनंती करत नाही. तोपर्यंत हे पैसे कापले जातात.

PMSBY योजनेचा कव्हरेज कालावधी दरवर्षी 1 जून ते 31 मे दरम्यान असतो. त्यामुळे जर कोणाला ही योजना सुरू ठेवायची असेल तर त्याचे नूतनीकरण प्रीमियम दरवर्षी मे महिन्यात भरला जाईल. योजनेत सामील होताना बँक खात्यात ऑटो-डेबिटसाठी संमती देणे बंधनकारक आहे.

18-70 वयोगटातील लोक PMSBY यासाठी अर्ज करू शकतात. या योजनेंतर्गत, विमा घेणार्‍याचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा संपूर्ण अपंगत्व असल्यास 2 लाख रुपयांचा अपघात विमा दिला जातो. कायमस्वरूपी आंशिक अपंगत्व आल्यास 1 लाख रुपयांचे कव्हर प्रदान केले जाते.

क्लेमची कसा कराल?

विम्याची रक्कम क्लेम करण्यासाठी, नॉमिनी (उमेदवार) किंवा संबंधित व्यक्तीने प्रथम बँक किंवा विमा कंपनीकडे जाणे आवश्यक आहे. जिथून पॉलिसी खरेदी केली आहे तिथे एक फॉर्म मिळेल, नॉमिनीला तो फॉर्म भरून जमा करावा लागेल. यामध्ये नाव, पत्ता आणि फोन नंबर यांसारखी माहिती त्यात भरावी लागेल.

सर्व संबंधित कागदपत्रांसह विमा कंपनीला भरलेला फॉर्म सबमिट करा. मृत्यू प्रमाणपत्र किंवा अपंगत्व प्रमाणपत्र समाविष्ट करणे आवश्यक आहे. यानंतर विमा कंपनी सर्व कागदपत्रांची तपासणी करेल. जर सर्व कागदपत्रे बरोबर असतील तर क्लेम रक्कम तुम्ही सांगितलेल्या बँक खात्यात जमा केली जाईल आणि अशा प्रकारे क्लेम सेटलमेंटची प्रक्रिया पूर्ण होईल.

संबंधित बातम्या : 

कोरोनामुळं कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास ‘ही’ कंपनी 5 वर्षांचा पगार देणार, वारसदारांचा 3 वर्षांचा विमा काढणार

30 जूनपूर्वी अपडेट करा IFSC कोड, ‘या’ सरकारी बँकेकडून अलर्ट जारी

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI