Dal Price : सर्वसामान्यांना मोठा दिलासा! यंदा डाळींच्या किंमती नाही होणार बेभाव, रामबाण ठरणार केंद्र सरकारचा हा उपाय

Dal Price : केंद्र सरकारच्या योजनेमुळे यंदा डाळीचे भाव गगनाला भिडणार नाहीत. त्यासाठी काय उपाय करण्यात आले आहेत?

Dal Price : सर्वसामान्यांना मोठा दिलासा! यंदा डाळींच्या किंमती नाही होणार बेभाव, रामबाण ठरणार केंद्र सरकारचा हा उपाय
डाळीचे भाव नियंत्रणात
Follow us
| Updated on: Jan 13, 2023 | 10:19 PM

नवी दिल्ली : देशातील महागाई (Inflation) नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने यंदा वर्ष सुरु होताच उपाय योजना केली आहे. या वर्षात डाळीच्या भावावरुन (Plus Rate) रान पेटणार नाही, याची काळजी केंद्र सरकारने अगोदरच घेतली आहे. त्यासाठी विविध उपाय योजना आखण्यात आल्या आहेत. देशात तूर डाळीचा (Tur Dal) साठा कमी होऊ नये यासाठी केंद्राने उपाय केल्या आहेत. त्यासाठी केंद्र सरकारने 10 लाख टन तूर डाळ आयात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाफेड खुल्या बाजारात हरभरा डाळ (Chana Dal) स्वस्तात विक्रीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे हरभरा डाळीच्या किंमती कमी ठेवण्यासाठी मदत मिळेल.

कृषी मंत्रालयाने याविषयीची आकडेवारी सादर केली. त्यानुसार, 2022-23 (जुलै-जून) या काळात डाळींचे उत्पादन किती झाले,याची माहिती दिली. मटारचे उत्पादन मागील वर्षातील 43.4 लाख टनांवरून 38.9 लाख टनांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे.

तूर डाळीचे उत्पादनात कर्नाटक अग्रेसर आहे. पण राज्यात अनेक ठिकाणी खराब हवामान आणि पीकांवरील रोगांमुळे तूर डाळीच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्याचा फटका  ग्राहकांना बसण्याची शक्यता होती.

हे सुद्धा वाचा

देशात गेल्या सत्रात हरबरा डाळीचे चांगले उत्पादन झाले होते. नाफेडने गेल्या हंगामात एमएसपीवर शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात हरबरा खरेदी केली होती. पण नाफेड खुल्या बाजारातून ठोक खरेदीदारांसाठी निविदा प्रक्रिया 4700 रुपये प्रति क्विंटल दराने विक्री होत आहे.

नाफेडने हरबरा डाळ विक्री केल्याने बाजारात डाळीच्या किंमती 4,800-4,900 रुपये प्रति क्विंटल सुरु आहे. 2022-23 च्या हंगामात हरबरा डाळीचा भाव 5,335 रुपये प्रति क्विंटल होता.  यंदा डाळीच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र कसोशिने प्रयत्न करत आहे.

गेल्या वर्षी डिसेंबर 2022 मध्ये भारताने 2 लाख टन तूर डाळ आयात केली. भारत आफ्रिकी देश आणि म्यानमारमधून सर्वाधिक तूर डाळ आयात करतो. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये भारताने एकूण 7.6 लाख टन तूरडाळ आयात केली होती.

Non Stop LIVE Update
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात.
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस.
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई.
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री.
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट.
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान.
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.