AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2000 Rupee Note:चलनातून बाद झाल्यानंतर 14 महिन्यांनी देखील 7409 कोटी रुपये बँकेत आलेच नाहीत

9 मे 2023 रोजी भारतीय रिझर्व्ह बँके ने 2000 रुपयांची नोट चलनातून मागे घेण्याची घोषणा केली होती. क्लीन नोट पॉलिसी अंतर्गत आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतला होता.

2000 Rupee Note:चलनातून बाद झाल्यानंतर 14 महिन्यांनी देखील 7409 कोटी रुपये बँकेत आलेच नाहीत
2000 note rbi new data
| Updated on: Aug 01, 2024 | 10:14 PM
Share

भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटांना चलनातून बाद केलेल्या घटनेला 14 महिन्यांहून अधिक दिवस झाले आहेत. तरीही अद्याप 7409 कोटी रुपयांच्या किंमतीच्या दोन हजाराच्या नोटा अद्याप बॅंकेत पोहचल्या नाहीत. दोन हजाराच्या नोटा बँकींग सिस्टीमध्ये पोहचलेल्या नाहीत. आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटांवर बंदी घातली होती. त्यानंतर या 2000 रुपयांच्या नोटांना बॅंकेत परत करण्याची मुदत दिली होती. परंतू 97.92 टक्के नोटा बॅंकेत परत आल्या आहेत. परंतू 2.08 टक्के नोटा अद्याप देखील बँकेत पोहचलेल्या नाहीत अशी माहिती आरबीआयच्या सूत्रांनी दिली आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने 19 मे 2023 रोजी 2000 रुपयांच्या नोटा चलनातून परत घेण्याची घोषणा केली होती. त्या दिवशी 3.56 लाख कोटी रुपयांच्या दोन हजाराच्या नोटा चलनात होत्या. 31 जुलै 2024 पर्यंत अनेकांनी आपल्याकडील या नोटांना बॅंकेत जमा केल्याने चलनातील 2000 रुपयांच्या नोटा घटून 7409 कोटी रुपयांपर्यत आल्या.  म्हणजेच चलनात असलेल्या 97.92 टक्के नोटा आरबीआयकडे परत आलेल्या आहेत. एकूण 3.48 लाख कोटी रुपयांच्या 2000 रुपयांच्या नोटा बँकिंग प्रणालीमध्ये परत आल्या आहेत. परंतु चलनात असलेल्या एकूण नोटांपैकी 2.08 टक्के नोटा अद्यापही बॅंकेत परत आलेल्या नाहीत.

2000 रुपयांच्या नोटा अजून जमा करु शकता

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अधिकृत केलेल्या कार्यालयात अजून व्यक्ती किंवा संस्थांकडून 2000 रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जात आहेत. या नोटा थेट बँक खात्यात जमा केल्या जात आहेत. अनेक लोक 2000 रुपयांच्या नोटा त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी भारतीय पोस्टद्वारे आरबीआयने जाहीर केलेल्या कार्यालयात त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यासाठी पाठवत आहेत. 2000 रुपयांच्या नोटा परत करण्यासाठी आरबीआयने जारी केलेल्या बँकात आता जाण्याची गरज नाही. 2000 रुपयांच्या नोटा अजून कायदेशीर चलन आहेत. त्यांना बँकेत आपल्या खात्यावर जमा करता येऊ शकते.

या 19 कार्यालयात नोटा जमा करण्याचे दिले होते आदेश

8 ऑक्टोबर 2023 नंतर आरबीआयने देशभरातील अहमदाबाद, बेलापुर, बंगळुर, भुवनेश्वर, भोपाल, चेन्नई, चंडीगढ़, हैदराबाद, गुवाहाटी, जम्मू, जयपुर, कोलकाता, कानपुर, मुंबई, लखनऊ, पटना, नई दिल्ली, नागपुर आणि तिरुवनंतपुरम येथील कार्यालयात जमा करण्याचे आदेश आरबीआयने दिले होते.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.