फेस्टिव्हल सेलमध्ये स्मार्टफोन्सचा रेकॉर्डतोड खप, प्रत्येक मिनिटाला तब्बल दीड कोटींची उलाढाल

फेस्टिव्हल सेलच्या पहिल्या आठवड्यात ( 15-21 ऑक्टोबर) स्मार्टफोन्सची मोठ्या प्रमाणात विक्री झाली असून बाजारात प्रत्येक मिनिटाला तब्बल दीड कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.(smartphones worth of 1.5 crore has been sold every minute during festival season sale)

फेस्टिव्हल सेलमध्ये स्मार्टफोन्सचा रेकॉर्डतोड खप, प्रत्येक मिनिटाला तब्बल दीड कोटींची उलाढाल

दिल्ली : दिवाळी, दसरा सणांच्या पार्श्वभूमीवर आयोजित फेस्टिव्हल सेलमध्ये स्मार्टफोन्सची रेकॉर्डतोड विक्री झाल्याचं समोर आलं आहे. बंगळुरु स्थित मार्केट रिसर्च फर्म रेडसीरने दिलेल्या माहितीनुसार फेस्टिव्हल सेलच्या पहिल्या आठवड्यात ( 15-21 ऑक्टोबर) स्मार्टफोन्सची मोठ्या प्रमाणात विक्री झाली असून बाजारात प्रत्येक मिनिटाला तब्बल दीड कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.(smartphones worth of 1.5 crore has been sold every minute during festival season sale)

स्वस्त किंमत आणि नवनवीन फिचर्समुळे या वर्षीच्या फेस्टिव्हल सेलमध्ये वेगवेगळ्या मोबाईल कंपन्यांचा बोलबाला कायम राहिला. फेस्टिव्हल सेलच्या पहिल्या सात दिवसांत (15-21 ऑक्टोबर) एकूण खरेदीच्या 47 टक्के खरेदी नुसत्या स्मार्टफोन्सची झाली आहे. रेडसीर रिसर्च फर्मचे संचालक मृगांक गुटगुटिया यांनी सांगितलं की, “मागच्या वर्षीप्रमाणे या वर्षीदेखील फॅशन कॅटिगिरीमध्ये म्हणावी तेवढी विक्री झाली नाही. एकूण खरेदीच्या तुलनेत फॅशनेबल कपड्यांची खरेदी 14 टक्के राहिली. फेस्टिव्हल सिझनमध्ये घरातील सामान तसेच फर्निचर खरेदीही मोठ्या प्रमाणात झाली. यामध्ये प्राधान्याने वर्क फ्रॉम होम तसेच वर्क फ्रॉम ऑफिससाठी लागणाऱ्या सामानाची खरेदी करण्यात आली.”

या फेस्टिव्हल सेलच्या काळात सर्वात जास्त विक्री स्मार्टफोन्सचीच झाली. एमआय या कंपनीनने अ‌ॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि एमआय डॉट कॉम या संकेतस्थळांवरुन 7 दिवसांमध्ये तब्बल 50 लाख फोन विकले. तर चिनी मोबाईल कंपनी पोकोने याच कालावधीत 10 लाख स्मार्टफोन विकल्याची माहिती आहे. या वर्षी खरेदीसाठी ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याची माहिती आहे. फेस्टिव्हल सेलमध्ये फ्लिपकार्ट संकेतस्थळाला भेट देऊन मोबाईल खरेदी करण्याचेही प्रमाणही मोठे असल्याचे सांगण्यात आले. फेस्टिव्हल सेलमध्ये महागडे म्हणजेच प्रिमियम सेगमेंटमधील फोनच्या विक्रीत 3.2 पटीने वाढ झाली आहे. प्रिमियम सेगमेंटमध्ये गुगल, सॅमसंग, अ‌ॅपल या कंपन्यांच्या स्मार्टफोनना सर्वाधिक पसंती या फेस्टिव्हल सेलमध्ये मिळाली.

दरम्यान, काही कंपन्यांचे फेस्टिव्हल सेल अजूनही सुरुच आहेत. वेगवेगळ्या कंपन्यांकडून अजूनही आकर्षक सूट देण्यात येत आहे. विशेष म्हणजे स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणं खरेदी करण्यावर या कंपन्यांकडून मोठ्या सवलती देण्यात येत आहेत. ग्राहकांकडूनही या फेस्टिव्हल सेलना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

संबंधित बातम्या :

Home loan | अ‌ॅक्सिस बँकेकडून ‘दिल से ओपन सेलिब्रेशन’, गृहकर्जाच्या व्याजदरात मोठी कपात

आताच उघडा जनधन खातं, मोफत मिळणार 10 लाखांचा विमा; सोबत आहेत धमाकेदार ऑफर्स

PM SVAnidhi Yojana: विनातारण 10 हजारांपर्यंतचे कर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

(smartphones worth of 1.5 crore has been sold every minute during festival season sale)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *